एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
घानात “जय महाराष्ट्र”चा जयघोष! फुटबॉलपटूनं मानले महाराष्ट्राचे आभार
घाना मधील एका फुटबॉलपटूने व्हिडिओद्वारे 'जय महाराष्ट्र' म्हणत महाराष्ट्राने केलेल्या मदतीचे आभार मानले आहे.
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात मुंबईत अडकलेला फुटबॉलपटू घानामध्ये जाऊन जय महाराष्ट्राचा जयघोष करतोय. त्याला महाराष्ट्र आणि मुंबईनं दिलेल्या प्रेमाबद्दल तो घानामध्ये जाऊन स्तुतीसुमनं उधळतोय. सुरुवातीच्या काळात प्रत्येकजण कुठे ना कुठे अडकला होता. याच लॉकडाऊनचा फटका घानाचा फुटबॉलपटू रॅन्डी जुआन म्युलरला बसला होता. तब्बल पाच महिन्यानंतर मुंबईत अडकलेला हा खेळाडू सुखरूप घरी पोहचला आहे.
लॉकडाऊन घोषित होताच म्युलर मुंबई विमानतळावर अडकला होता. त्यानंतर आपल्याला लॉकडाऊनचा फटका बसल्याचं त्यानं ट्वीटरच्या माध्यमातून दुःख व्यक्त केलं होतं. युवा सेनेने याची तातडीनं दखल घेतली आणि त्याला मदतीचा हात दिला. म्युलरनं मायदेशात परताच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व युवासेना कार्यकारिणी सदस्य राहुल कनाल यांचे आभार मानले. त्याने एका व्हिडिओद्वारे 'जय महाराष्ट्र' म्हणत महाराष्ट्राने केलेल्या मदतीचे आभार मानले.
अकरावी प्रवेशाची मुंबई विभागाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर; नामवंत कॉलेजचा कट ऑफ नव्वदीपार
भारत सरकारने आंतरराष्ट्रीय विमानसेवा रद्द केल्यावर 74 दिवस रॅन्डी जुआन म्युलरने मुंबई विमानतळावर अडकला होता. त्यानंतर त्यांची वांद्र्यातल्या एका हॉटेलमध्ये राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. विमानसेवा सुरु झाल्यानंतरच युवासेनेनं याचा संपूर्ण खर्च उचलत त्याला मायदेशी रवाना केलं.
म्यूलरनं असे ढकलले दिवस
फुटबॉलपटू म्युलर विमानतळावरच्या कर्मचाऱ्यासोबत वेळ घालवायचा, मुंबई विमानतळावरच्या कर्मचा-यांनी त्याला खुप मदत केली. त्यांच्याशी बातचीतसह खाण्यापिण्याच्या गोष्टी शेअर करत होते. जेव्हा त्याचे पैसै संपले तेव्हाही कर्मचारी त्याला समोसे, वडे जसं जमेल ते पदार्थ पुरवत होते. या काळात म्युलरनंही कोणत्याही खाण्याची मागणी केली नाही. काही लोकांनी त्याला पुस्तकं वाचायला दिली जी वाचून म्युलर आपला वेळ घालवत होता. एक दिवस त्यानं ट्वीटवरवरून मदतीचा हात मागितला आणि युवा सेनेच्या राहुल कनाल यांनी त्यांची चांगलीच व्यवस्था केली.
राहुल कनाल कोण आहेत?
युवा सेना प्रमुख आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासातले मित्र म्हणून राहुल कनाल यांची ओळख आहे. आदित्य ठाकरेंना आलेले ट्वीट युवा सेनेच्या टीमबरोबर खास जबाबदारी राहुल यांच्या खांद्यावर सोपावण्यात येते. युवा सेनेतर्फे आतापर्यंत गरजूंना अन्नधान्य, मास्क आणि सॅनिटाजर पुरवण्याचे काम कनाल यांनी केले आहे. तसेच रुग्णालयात गरजूंना आर्थिक व पुथपातवर अभ्यास करून पास झालेलं अस्माला देखील शिक्षणासाठी आर्थिक हातभार लावला होता. राज्यपाल नियुक्त सदस्य निवडीमध्ये राहुल कनाल यांचे नाव चर्चेत आहे. काही दिवसांपुर्वी नितेश राणे यांनी कनाल याचं नाव माझाला दिलेल्या मुलाखतीत घेतलं होतं. शिवसेनेत युवा सेना विरुद्ध शिवसेना असा वाद सुरु आहे, असा आरोप केला होता.
Ghana football player | घानात “जय महाराष्ट्र”चा जयघोष! फुटबॉलपटूकडून महाराष्ट्राचे आभार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्रीडा
करमणूक
निवडणूक
Advertisement