एक्स्प्लोर
मुंबईच्या महापौरपदासाठी गीता गवळींचा भाजपला पाठिंबा
मुंबई : अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका आणि डॉन अरुण गवळीची मुलगी गीता गवळी मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपला पाठिंबा देणार आहेत. गीता गवळी यांनी गुरुवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'वर्षा' बंगल्यावर भेट घेतली.
गीता गवळी आज कोकण भवनात जाऊन गटनोंदणी करणार असल्याचं कळतं. त्यामुळे गीता गवळी यांना आपल्या बाजूने वळवण्यात मुख्यमंत्र्यांना यश आलं आहे.
महापौर निवडणूक आणि आकड्यांचं गणित
याआधी गीता गवळी या शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याचं सांगण्यात येत होतं. त्यांनी गुरुवारी शिवसेना भवनातही हजेरी लावली होती. मात्र मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे शिवसेना भवनात गीता गवळी आणि एकनाथ शिंदे, अनिल देसाई यांच्यातील बोलणी फिसकटली. त्यामुळे गीता गवळी निर्णय न घेताच सेनाभवनातून परतल्या.
त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गीता गवळी यांना चर्चेसाठी काल 'वर्षा' बंगल्यावर बोलवलं होतं. गीता गवळींना स्थायी समितीचं सदस्यपद आणि आरोग्य विभागाचं चेअरमनपद देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. या मागण्या मान्य केल्याने गीता गवळी आता महापौरपदासाठी भाजपला पाठिंबा देणार आहेत. गीता गवळी यांना आपल्या बाजूने घेण्यासाठी थेट अरुण गवळी यांच्याकडून मध्यस्थीचा प्रयत्न केल्याचं म्हटलं जात होतं. संबंधित बातम्या गीता गवळींना वळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची अरुण गवळींकडे सेटिंग? ...म्हणून उद्धव ठाकरे दानवेंच्या मुलाच्या लग्नाला जाणार नाहीत! BMC election result : मुंबई महापालिका वॉर्डनिहाय निकाल मुंबईत 30-35 जागांवर शिवसेनेला मनसे फॅक्टर महागात शिवसेनेच्या गळाला चौथा अपक्ष, सेनेला 88 नगरसेवकांचं बळ मुख्यमंत्री दिल्ली दरबारी, शिवसेनेसोबतच्या कोंडीवर चर्चा? शिवसेनेच्या गळाला चौथा अपक्ष, सेनेला 88 नगरसेवकांचं बळ दगाफटक्याची चिंता नाही, महापौर शिवसेनेचाच : अनिल परब शिवसेना-भाजप युतीसाठी मी पुढाकार घेईन: आठवले युती होणार का? आशिष शेलार म्हणतात… राज ठाकरेंच्या ‘सात’ची ‘साथ’ शिवसेनेला की भाजपला? तिसरा अपक्ष नगरसेवक शिवसेनेच्या गळाला, संख्याबळ 87 युतीबाबत अजून विचार केलेला नाही, उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरणअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement