एक्स्प्लोर
प्रसिद्ध गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट अमित मायदेव पालिका रुग्णालयांमध्ये गरिबांसाठी सेवा देणार
परळच्या ग्लोबल हॉस्पिटलचे प्रख्यात पोटविकारतज्ञ डॉ. अमित मायदेव यांच्यावर केईएमची जबाबदारी सोपवण्यात आलीय. त्याचप्रमाणे डॉ. सुलतान प्रधान, डॉ. लकडावाला , डॉ. बोरूडे यांच्यासारखी विविध आजारातील तज्ञ मंडळी आता सर्वसामान्यांना परवडणाऱ्या पालिका आणि सरकारी रुग्णालयात तिथल्या डॉक्टरांना मार्गदर्शन करणार आहेत

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये मुंबईतील खासगी रुग्णालयातील स्पेशलिस्ट आणि नामांकित अशा पाच डॉक्टरांनी सेवा देण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महापालिकेच्या एका अभिनव उपक्रमांतर्गत प्रतिष्ठीत डॉक्टर ज्यांच्याकडून उपचार घेण्यासाठी अनेक जण लाखो रुपये मोजायला तयार असतात, ती निष्णात मंडळी आता बेताची परिस्थिती असणाऱ्यांनाही पालिका रुग्णालयांमध्ये सेवा देणार आहेत. केईएम, सायन, जेजे रुग्णालयांमध्ये हे डॉक्टर सेवा देणार आहेत. यासंदर्भात परळच्या ग्लोबल हॉस्पिटलचे प्रख्यात पोटविकारतज्ञ डॉ. अमित मायदेव यांच्यावर केईएमची जबाबदारी सोपवण्यात आलीय. त्याचप्रमाणे डॉ. सुलतान प्रधान, डॉ. लकडावाला , डॉ. बोरूडे यांच्यासारखी विविध आजारातील तज्ञ मंडळी आता सर्वसामान्यांना परवडणाऱ्या पालिका आणि सरकारी रुग्णालयात तिथल्या डॉक्टरांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच तिथल्या रुग्णांनाही आपली सेवा पुरवणार आहेत. ज्या खाजगी रुग्णालयात ही जेष्ठ आणि तज्ञ मंडळी आपली सेवा देतात तिथे उपचार घेण्याचा विचार पालिका रुग्णालयातील रुग्ण कदाचित स्वप्नातही करत नाहीत. कारण लाखो रुपये खर्चून अत्याधुनिक उपकरणांसह बड्या डॉक्टरांकडून स्वत:चा किंवा कुटुंबियांचा उपचार करणं प्रत्येकाला परवडतच असं नाही. मात्र हिच सर्जन मंडळी आता पालिका रुग्णालयात आपली अद्ययावत महागडी उपकरणंही घेऊन जाणार आहेत, असं डॉ. मायदेव एबीपी माझाशी बोलताना सांगितले. स्थूलपणा घटवण्याचा नवा पर्याय, बेरिअॅट्रिक एण्डोस्कोपी केंद्र सुरु केईम, सायन, नायर, जेजे यांच्यासारख्या पालिका रुग्णालयात नेहमीच सर्वसामान्य रुग्णांची गर्दी पाहायला मिळते. इथली व्यवस्था, डॉक्टरांची उपलब्धता काहीशी बेताचीच असली तरी खिशाकडे पाहून सर्वसामान्य मुंबईकर इथेच जाणं पसंत करतो. कारण लिलावती, वोकहार्ट, अंबानी यांसारख्या थ्रीस्टार हॉटेलप्रमाणे सेवा देणाऱ्या हायफाय रुग्णालयात जाऊन उपचार करणं सर्वांनाच परवडत असं नाही. मात्र मुंबईतील अश्याच बड्या हॉस्पिटलमधील सर्जन मंडळी आता पालिका रुग्णालयातही आपली सेवा देणार आहेत
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























