एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तेव्हाच झाला असता दाऊदचा 'गेम', 'या' खासदारामुळे थोडक्यात बचावला
लकडावाला 20 वर्षे मुंबई पोलिसांना गुंगारा देत होता. त्या दरम्यान त्यानं आधी दाऊद व नंतर छोटा राजन गँगसोबत काम केलं. बनावट पासपोर्ट प्रकरणात गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात मुलगी शिफाला अटक झाल्यानंतर लकडावाला पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला आज भारतासह अनेक देशांचे पोलीस शोधत आहेत. मात्र दहशत माजवणारा डॉन आज आपल्याला जिवंत दिसलाच नसता. '1998 मध्येच त्याचा खेळ खल्लास झाला असता. कारण त्याचा दुश्मन छोटा राजनचे शूटर त्याला मारण्यासाठी त्याच्या घराजवळ पोहोचले होते. दाऊद त्यांच्या निशाण्यावर येणारच होता मात्र ऐनवेळी नेपाळच्या एका खासदारांकडून मिळालेल्या माहितीमुळे तो बचावला', असा खळबळजनक खुलासा मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेल्या गँगस्टर एजाज लकडावाला याने केला आहे. विशेष म्हणजे लकडावाला हा त्यावेळी त्या शूटरांच्या टीममध्ये सोबत होता, असंही त्यानं सांगितलं आहे.
दाऊदचा गेम करण्यासाठी कराचीतील एका दरग्याहबाहेर आम्ही 10 जणांनी कित्येक दिवस फिल्डिंग लावली होती. पण नेपाळचा खासदार मिर्झा दिलशाद बेग यानं ऐनवेळी टीप दिल्यानं हा प्लान फसला, अशी माहिती एजाज लकडावाला यानं दिली आहे.
एकेकाळी दाऊदचा विश्वासू साथीदार असलेला आणि नंतर छोटा राजनच्या गटात गेलेला लकडावाला याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आठ जानेवारी रोजी पाटण्यातून अटक केली होती. सध्या त्याची चौकशी सुरू आहे. या चौकशी दरम्यान त्यानं अंडरवर्ल्डमधील अनेक कारवायांची माहिती पोलिसांना दिली. लकडावालाने सांगितलं की, भारतीय गुप्तचर संस्थांच्या मदतीनं 1998 साली छोटा राजन यानं दाऊदचा काटा काढण्याचा प्रयत्न केला होता. दाऊदच्या मुलीचा, मारियाचा मृत्यू झाल्यानंतर काही धार्मिक विधी पार पाडण्यासाठी तो कराचीच्या एका दरग्यात जाणार होता. तिथंच त्याला मारायचा प्लान ठरला होता.
त्यासाठी दहा जणांची एक टीम बनवण्यात आली होती. त्यात फरिद तनाशा, बाळू डोकरे, विनोद मटकर, संजय घाटे, बाबा रेड्डी आणि मी स्वत: होतो. नानाचा खास शूटर विकी मल्होत्रा हा आमचा म्होरक्या होता. आम्ही सर्वांनी दरग्याहच्या बाहेर तळ ठोकला होता. मात्र, मिर्झा बेगनं दाऊदला शेवटच्या क्षणी याबाबत माहिती दिली आणि आमचा प्लान फसला, असं त्यानं सांगितलं.
छोटा राजनला या विषयी ज्यावेळी माहिती मिळाली त्यावेळी त्याने आपले शुटर नेपाळला पाठवून खासदार बेगची हत्या केली.यानंतर दाऊदला माहिती मिळाली की त्याला मारण्यासाठी बनवलेल्या टीममध्ये लकडावाला देखील होता. त्यावेळी त्याने छोटा शकीलला त्याचा शोध घेण्याबाबत सांगितलं. 2002 मध्ये एजाज लकडावालावर शकीलच्या शूटर्सनी बँकॉकमध्ये फायरिंग केली होती. यामध्ये लकडावाला गंभीर जखमी झाला होता. मात्रा त्यावेळी त्याचा जीव वाचला आणि तो कॅनडाला पळून गेला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रायगड
क्रिकेट
करमणूक
निवडणूक
Advertisement