एक्स्प्लोर

Ganeshotsav 2023: गणेशोत्सव मंडळांना दिलासा; कार्यकर्त्यांची धावपळ संपणार, परवानगीसाठी ऑनलाईन ‘एक खिडकी’ची सुविधा

Ganesh Chaturthi 2023 : गणेशोत्सव मंडळांना मुंबई महापालिकेने मोठा दिलासा दिला आहे. परवानगीसाठी पोलीस, वाहतूक पोलीस, अग्निशमन दलाकडे वेगळा अर्ज करण्याची गरज नसून ऑनलाईन पद्धतीने एक खिडकी योजना सुरू करण्यात येणार आहे.

Ganeshotsav 2023:   आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने (BMC) गणेशोत्सव मंडळांना (Ganesh Mandal) मोठा दिलासा दिला आहे. मु्ंबई महानगरपालिकेकडून यंदाच्या गणेशोत्सोवासाठी गणेशोत्सव मंडळांना मंडप परवानगीसाठी ‘एक खिडकी’ पद्धतीतून (single window system) ऑनलाईन अर्जाची (Online Application) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबई महानगरातील गणेशोत्सव मंडळांसाठी 1 ऑगस्ट 2023 पासून ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे  गणेश मंडळांना पोलीस, वाहतूक पोलीस व मुंबई अग्निशमन दल यांच्याकडे परवानगीसाठी वेगळे अर्ज करण्याची गरज नाही.

विविध उत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक पद्धतीने आयोजित केले जावेत आणि याबाबतची परवानगी प्रक्रिया अधिकाधिक सुटसुटीत व्हावे, या उद्देशाने  महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशांनुसार, तसेच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनानुसार विविध उपक्रम सातत्याने राबवले जातात. याच अंतर्गत गणेशोत्सवासाठी श्री गणेश मंडळांच्या मंडप परवानगीची प्रक्रिया अधिक सुटसुटीत व्हावी, यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘एक खिडकी’ योजना येत्या 1 ऑगस्ट पासून कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी माहिती उप आयुक्त (परिमंडळ – 2)  रमाकांत बिरादार यांनी दिली. 

असा करा ऑनलाईन अर्ज 

गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीच्या परवानगीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता यावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 1 ऑगस्ट 2023 पासून संगणकीय एक खिडकी पद्धतीने अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या सुविधे अंतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर > नागरिकांकरिता टॅब >अर्ज करा >मंडप (गणेश/नवरात्रोत्सव) > Ganpati/Navaraytri Mandap Application मध्ये नमूद केलेल्या लिंकवर एक ऑगस्टपासून 13 सप्टेंबर 2023 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.

एकाच ठिकाणी अर्ज, कार्यकर्त्यांची धावपळ वाचणार 

याठिकाणी पोलीस, वाहतूक पोलिस तसेच अग्निशमन दलाच्या परवानगीचेही अर्ज असल्याने यासाठी त्यांच्याकडे स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नसेल. सदर मंडपांसाठी मंडळांना परवानगीकरिता शुल्क भरणे आवश्यक नाही. मंडप परवानगी नि:शुल्क देण्यात येणार आहे. मात्र, एक हजार रुपये सुरक्षा अनामत रक्कम भरणे आवश्यक आहे. तसेच यावर्षीदेखील गणेश मंडळांना अर्जासोबत हमीपत्रही द्यावे लागणार आहे. या हमीपत्राचा नमूना संकेतस्थळावरून डाऊनलोड करून संबंधितांच्या स्वाक्षरीसह अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. गणेश मंडळांना मंडप उभारणी परवानगीबाबत काही अडचण आल्यास आपापल्या विभागातील सहाय्यक आयुक्त यांच्याशी संपर्क साधावा, असेही उपायुक्त तथा गणेशोत्सवाचे समन्वयक रमाकांत बिरादार यांनी कळविले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप, नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप, नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
घरी मुलीच्या लग्नाची तयारी अन् पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू
घरी मुलीच्या लग्नाची तयारी अन् पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Aaditya Thackeray Majha Vision : Eknath Khadse यांचा फोन आला...म्हणाले,Aaditya Thackeray Majha Vision : खिचडीचा घोटाळा झाला की नाही? आदित्य ठाकरे म्हणतात... ABP MajhaAaditya Thackeray Majha Vision : आम्ही बोलायचो ते भाजपला टोचायचं, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल...ABP Majha Headlines : 05 PM : 14 May  2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप, नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप, नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
घरी मुलीच्या लग्नाची तयारी अन् पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू
घरी मुलीच्या लग्नाची तयारी अन् पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू
3 जागा, 6 संघ... प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा नेमकं समीकरण
3 जागा, 6 संघ... प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा नेमकं समीकरण
प्लेऑफमध्ये कोणते संघ, चेन्नई की आरसीबीला स्थान मिळणार, भज्जी-कैफनं कुणाला दिली पसंती? 
प्लेऑफमध्ये कोणते संघ, चेन्नई की आरसीबीला स्थान मिळणार, भज्जी-कैफनं कुणाला दिली पसंती? 
Kartiki Gaikwad Pregnancy News :  'लिटिल चॅम्प'च्या घरी इवलुशा पावलांनी आला पाहुणा; कार्तिकी-रोनित झाले आई-बाबा
'लिटिल चॅम्प'च्या घरी इवलुशा पावलांनी आला पाहुणा; कार्तिकी-रोनित झाले आई-बाबा
Marathi Serial Update Zee Marathi Bharat Jadhav : भरत जाधवचे टीव्ही मालिकेत कमबॅक,  'या' मालिकेत साकारणार खलनायकी भूमिका
भरत जाधवचे टीव्ही मालिकेत कमबॅक, 'या' मालिकेत साकारणार खलनायकी भूमिका
Embed widget