एक्स्प्लोर

Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांकडून भरभरून दान; पहिल्याच दिवशी इतक्या रक्कमेची नोंद

Lalbaugcha Raja : मुंबईतील लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांनी पहिल्याच दिवशी भरभरून दान दिले असल्याचे समोर आले आहे. आज रात्री पहिल्या दिवशीची मोजदाद संपली. त्यानंतर मंडळाने आकडा जाहीर केला.

मुंबई : राज्यात उत्साहात गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. मुंबईत (Mumbai) लालबागच्या (Lalbaugcha Raja News) राजाच्या दर्शनासाठी पहिल्याच दिवशी भक्तांनी आदल्या दिवसापासूनच रांग लावली होती. भक्तांनी यंदाही राजाच्या चरणी भरभरून दान दिले आहे. भक्तांनी रोख रकमेत आणि सोन्याचांदीच्या दागिन्यांच्या रुपात राजाला दान दिलं आहे. त्याची मोजदाद आजपासून सुरु झाली. भक्तांनी रोख रकमेत मोठ्या प्रमाणात दान दिले आहे. 

पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जवळपास 20 लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. पहिल्याच दिवशी सामान्य नागरिकांसह अनेक बॉलिवुड कलाकार, राजकीय नेत्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. आज उशिरापर्यंत लालबागचा राजा मंडळाकडून पहिल्या दिवशी दान आलेली रोख रक्कम, वस्तूंची मोजदाद पूर्ण करण्यात आली. 

लालबागच्या राजाच्या चरणी पहिल्या दिवशी भाविकांनी अर्पण केलेल्या दानाची आज (बुधवार, 20 सप्टेंबर) दिवसभर मोजदात करण्यात आली. यामध्ये भाविकांकडून 42 लाख रुपयांची रोख रक्कम जमा करण्यात आली. त्याशिवाय, 198.550 ग्रॅम सोने आणि 5440 ग्रॅम चांदीच्या वस्तू राजाच्या चरणी अर्पण करण्यात आल्या आहेत.

लालबागच्या राजाच्या दानपेटीत आलेल्या सोन्याचांदीच्या या वस्तूंचा नंतर लिलाव केला जातो. त्यातून जमा होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जातात. 

दरम्यान, मुंबईतील गिरणगावात गणेशोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत असल्याचे चित्र आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासह गणेश गल्लीतील मुंबईचा राजा, चिंचपोकळी येथील चिंतामणी, तेजुकाया गणेशोत्सव मंडळाचे गणपती पाहण्यासाठी गर्दी उसळली आहे. 

दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप 

आज राज्यभरात दीड दिवसांच्या गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला. दीड दिवसांच्या घरगुती गणपतीचे आज विसर्जन (Ganesh Visarjan) पार पडले  आहे. मुंबईत महापालिकेच्यावतीने (BMC) गणेश विसर्जनाची (Ganesh Immersion) तयारी करण्यात आली आहे. कृत्रिम तलाव आणि सार्वजनिक नैसर्गिक विसर्जन स्थळांवर दीड दिवसांच्या बाप्पांना निरोप दिला जात आहे. राज्यातही विविध ठिकाणी स्थानिक प्रशासनांकडून विसर्जनासाठी योग्य ती तयारी केली आहे. तर, दुसरीकडे गणेश भक्तांकडून बाप्पांना वाजत, गाजत निरोप देण्यात येत आहे. कोकणात पारंपरीक पद्धतीने बाप्पाला निरोप देण्यात आला. 

इतर संबंधित बातमी :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, काँग्रेसच्या माजी ZP अध्यक्षांची इमारत भुईसपाट, बंदोबस्तात कारवाई
पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, काँग्रेसच्या माजी ZP अध्यक्षांची इमारत भुईसपाट, बंदोबस्तात कारवाई
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 फेब्रुवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 फेब्रुवारी 2026 | गुरुवार

व्हिडीओ

Manoj Jarange Patil : सातारा,मिरज,कोल्हापूर संस्थानचे गॅझेटिअर लागू करा अन्यथा, मनोज जरांगेंचा इशारा
Babanrao Taywade Nagpur : ओबीसींची जनगणना जातीनिहाय व्हावी, बबनराव तायवाडे यांची मागणी
Gosekhurd Dam Issue : गोसेखुर्द बॅकवॉटरमुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान? Special Report
Sambhajinagar Phulambri : इंग्रजी शाळेतलं भयंकर कृत्य, संभाजीनगर हादरलं Special Report
Mumbai Mayor : रितू तावडेंनी स्वीकारला महापौरपदाचा पदभार Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, काँग्रेसच्या माजी ZP अध्यक्षांची इमारत भुईसपाट, बंदोबस्तात कारवाई
पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, काँग्रेसच्या माजी ZP अध्यक्षांची इमारत भुईसपाट, बंदोबस्तात कारवाई
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 फेब्रुवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 फेब्रुवारी 2026 | गुरुवार
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले,सुधीरभाऊंचा बंगला 1000 कोटीचा, मुनगंटीवारांनी दिली ऑफर, कितीला विकत घेता?
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले,सुधीरभाऊंचा बंगला 1000 कोटीचा, मुनगंटीवारांनी दिली ऑफर, कितीला विकत घेता?
अजित दादांनी झापलं, शेकडो कोटींचं कंत्राट रद्द करण्यावरुन वाद; रोहित पवारांनी सांगितला बारामतीतील किस्सा
अजित दादांनी झापलं, शेकडो कोटींचं कंत्राट रद्द करण्यावरुन वाद; रोहित पवारांनी सांगितला बारामतीतील किस्सा
Share Market : शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी बुडाले
शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी बुडाले
Nashik News: नाशिकमध्ये भुताचा वावर, सोशल मीडियावर फोटो-व्हिडीओ व्हायरल, नागरिकांनी रात्रीच्या वेळी गस्त घातली अन्...; नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये भुताचा वावर, सोशल मीडियावर फोटो-व्हिडीओ व्हायरल, नागरिकांनी रात्रीच्या वेळी गस्त घातली अन्...; नेमकं काय घडलं?
Embed widget