एक्स्प्लोर

Kolhapur Police : कोल्हापुरात गौतमी पाटीलला नो एन्ट्री; मनोरंजन विभागासह पोलिसांनी परवानगी नाकारली

Gautami Patil : कोल्हापूर पोलिसांसह मनोरंजन विभागानेही परवानगी नाकारली आहे. 22 आणि 24 सप्टेंबरला कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात गौतमी पाटीलचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

कोल्हापूर : जिथं नाच तिथं वाद आणि राडा असं समीकरण झालेल्या नर्तकी गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) कोल्हापुरातील प्रस्तावित दोन्ही कार्यक्रमांना कोल्हापूर पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. गणेशोत्सव सुरक्षेचा ताण पाहता पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. जेव्हा जेव्हा गौतमीचे राज्यात इतरत्र कार्यक्रम पार पडले आहेत त्या ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा पोलिसांनी द्यावी लागली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गणेशोत्सव काळामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात होणारे गौतमीचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. कोल्हापूर पोलिसांसह मनोरंजन विभागानेही परवानगी नाकारली आहे. 22 आणि 24 सप्टेंबरला कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात गौतमी पाटीलचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. उत्सव काळात कार्यक्रमासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त देऊ शकत नसल्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितले. 

माझ्या कार्यक्रमात गोंधळ होत नाही

दुसरीकडे, तीन दिवसांपूर्वी बारामतीमध्ये बोलताना गौतमीने "माझ्या कुठल्याही कार्यक्रमात गोंधळ होत नाही", असं भाष्य केलं होतं. गौतमी म्हणाली की,"माझ्या सगळ्याच कार्यक्रमात गोंधळ होत नाही. परंतु, एखाद्या कार्यक्रमात गोंधळ झाला की लोक तेच धरून बसतात. बारामती तालुक्यातील झारगडवाडीकरांनी चांगल्या पद्धतीने नियोजन केल्यामुळे दहीहंडीचा माझा कार्यक्रम शांततेत पार पडला. काही अपवाद वगळता माझे सर्वच कार्यक्रम शांततेच पार पडतात".

दुसरीकडे, गौतमीच्या 'घुंगरू' या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. या सिनेमाच्या माध्यमातून गौतमी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. या सिनेमात अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहे. बाबा गायकवाड यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'लावणी क्वीन'ला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 'घुंगरू' या सिनेमात प्रेक्षकांना राजकारणासह थरार-नाट्य पाहायला मिळणार आहे.

सात हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाया

दुसरीकडे, गौतमीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारतानाच कोल्हापूर पोलिसांनी तब्बल सात हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवात व्यत्यय निर्माण करण्याची शक्यता आहे अशा 3816 जणांना नोटीसा  बजावण्यात आल्या आहेत. 2219 जणांकडून चांगल्या वर्तणुकीच्या जामीनासह बॉन्ड घेण्यात आले आहेत. 171 जणांकडून चांगल्या वर्तणुकीचे बॉन्ड घेणेत आलेले आहेत. तिघांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. सणाच्या कालावधीत हद्दीमध्ये, मंडळाजवळ अथवा मिरवणुकीमध्ये प्रवेश करणेस 641 जणांवर मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. अशा एकुण 6 हजार 850 जणांविरुद्ध फौजदारी प्रक्रियेनुसार कारवाई करण्यात आली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Elections 2024 : अखेर माण खटावमधील दोन भावांचा संघर्ष मिटला, जयकुमार गोरेंच्या विजयासाठी बंधू शेखर गोरे प्रचाराच्या मैदानात
अखेर माण खटावमधील दोन भावांचा संघर्ष मिटला, जयकुमार गोरेंच्या विजयासाठी बंधू शेखर गोरे प्रचाराच्या मैदानात
Kartiki Ekadashi 2024 Wishes : कार्तिकी एकादशीच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; करा विठुनामाचा जागर, पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश
कार्तिकी एकादशीच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; करा विठुनामाचा जागर, पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश
Raj Thackeray: उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेला, आता फक्त खान उरलेत, वर्सोव्यात मुस्लीम उमेदवार, राज ठाकरेंची घणाघाती टीका
उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेला, आता खान उरलेत, वर्सोव्यात मुस्लीम उमेदवार, राज ठाकरेंची टीका
मोठी बातमी: सोलापुरात आडम मास्तरांच्या घरावर दगडफेक, काँग्रेस कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप
मोठी बातमी: सोलापुरात आडम मास्तरांच्या घरावर दगडफेक, काँग्रेस कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Narendra Modi Sabha महाराष्ट्रात मोदी, शाहांच्या सभांचा धडाका;चिमूर,सोलापूर, पुण्यात मोदींची सभाTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 12 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaTop 100 Headlines | सकाळी 6 च्या शंभर हेडलाईन्स | 6 AM 12 November 2024 | ABP MajhaCM Eknath Shinde : साकीनाक्यात मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला, संतोष कटके नावाच्या व्यक्तीने अडवला ताफा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Elections 2024 : अखेर माण खटावमधील दोन भावांचा संघर्ष मिटला, जयकुमार गोरेंच्या विजयासाठी बंधू शेखर गोरे प्रचाराच्या मैदानात
अखेर माण खटावमधील दोन भावांचा संघर्ष मिटला, जयकुमार गोरेंच्या विजयासाठी बंधू शेखर गोरे प्रचाराच्या मैदानात
Kartiki Ekadashi 2024 Wishes : कार्तिकी एकादशीच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; करा विठुनामाचा जागर, पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश
कार्तिकी एकादशीच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; करा विठुनामाचा जागर, पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश
Raj Thackeray: उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेला, आता फक्त खान उरलेत, वर्सोव्यात मुस्लीम उमेदवार, राज ठाकरेंची घणाघाती टीका
उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेला, आता खान उरलेत, वर्सोव्यात मुस्लीम उमेदवार, राज ठाकरेंची टीका
मोठी बातमी: सोलापुरात आडम मास्तरांच्या घरावर दगडफेक, काँग्रेस कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप
मोठी बातमी: सोलापुरात आडम मास्तरांच्या घरावर दगडफेक, काँग्रेस कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप
RSS वर बंदी, पोलीस भरतीत मुस्लिमांना प्राधान्य द्या, उलेमा बोर्डाने मविआला धाडलं पत्र, विहिंप आक्रमक
RSS वर बंदी, पोलीस भरतीत मुस्लिमांना प्राधान्य द्या, उलेमा बोर्डाने मविआला धाडलं पत्र, विहिंप आक्रमक
Mumbai Crime: गोराईत 7 तुकडे केलेला मृतदेह सापडला, हातावरच्या टॅटूने गूढ वाढलं, मुंबई पोलीस संभ्रमात
गोराईत 7 तुकडे केलेला मृतदेह सापडला, हातावरच्या टॅटूने गूढ वाढलं, मुंबई पोलीस संभ्रमात
Babanrao lonikar on Maratha Community: या गावात मराठा समाजाची मतं कांड्यावर मोजण्याइतकी... आष्टीतील VIDEO व्हायरल होताच बबनराव लोणीकर सावध, म्हणाले....
या गावात मराठा समाजाची मतं कांड्यावर मोजण्याइतकी... बबनराव लोणीकरांचा आष्टीतील VIDEO व्हायरल
Kartiki Ekadashi 2024: सोहळा कार्तिकीचा, गजर हरीनामाचा! कार्तिकी एकादशीनिमित्त पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत कुलकुंजवार यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा
पंढरीत रंगला, सोहळा कार्तिकीचा; पुण्याच्या विभागीय आयुक्तांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न
Embed widget