एक्स्प्लोर

माजी केंद्रीय गृह सचिव राम प्रधान यांचं वृद्धापकाळाने निधन

राम प्रधान यांच्या सेवेचा बराचसा काळ हा केंद्र सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर किंवा परदेशात गेला. त्यांनी सरकारी सेवेत काम करताना आलेले अनुभव राजकारण्यांशी संबंध यावर आधारित त्यांनी बियॉन्ड एक्सपेक्टेशन हे आत्मचरित्रही लिहिले होते.

मुंबई : माजी केंद्रीय गृह सचिव राम प्रधान यांचे शुक्रवारी वयाच्या 92व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे.  36 वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेत अनेक केंद्रीय आणि राज्यातील नेत्यांशी अत्यंत चांगले संबंध जुळले होते. यशवंतराव चव्हाण यांच्याशी त्यांचे उत्तम संबंध होते. पंजाबमधील ऑपरेशन ब्ल्यूस्टारनंतर पंजाबमध्ये शांती निर्माण करण्यापासून ते मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्याचा अहवाल सादर करण्यापर्यंत त्यांनी विविध भूमिका बजावल्या होत्या. त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकीय इतिहासातील एक चालता-बोलता अध्याय संपला आहे. राम प्रधान जीनिव्हात असताना त्यांना बाबासाहेब भोसले यांनी फोन करून  महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. तेव्हा आपण कधी भेटलेलो नाही वा आपले कधी नावही ऐकलेले नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोलत आहे यावर विश्वास कसा ठेवणार असा प्रतिप्रश्न विचारणारे अधिकारी म्हणजे राम प्रधान. १९५२ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी राम प्रधान यांनी संरक्षण मंत्रालय, व्यापार मंत्रालय, राज्याचे गृहसचिव, जहाजबांधणी विभागाचे महासंचालक, जिनिव्हात संयुक्त राष्ट्रसंघ, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव, केंद्रीय गृहसचिव ते अरुणाचल प्रदेशचे राज्यपालपद अशी विविध पदे भूषवली आहेत. राम प्रधान यांच्या सेवेचा बराचसा काळ हा केंद्र सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर किंवा परदेशात गेला. मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या सरकारमध्ये गृह सचिव असताना त्यांना सरकार पाडण्याच्या हालचाली सुरू असल्याचा सुगावा लागला. ही बाब त्यांनी वसंतदादा पाटील यांच्या कानावर घातली परंतु त्यांचा शरद पवार यांच्यावर विश्वास असल्याने त्यांनी लक्ष दिले नाही आणि एक आठवड्याभरातच दादांचे सरकार गेले. राजीव गांधी पंतप्रधान असताना लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराकरिता मुंबईत आले होते. विमानतळावरच त्यांनी राम प्रधान यांना दिल्लीत काम करण्यास सांगितले. राम प्रधान यांनी गृहसचिवपदाचा पदभार स्वीकारला तेव्हा पंजाब, आसाम आणि मिझोराम या तीन राज्यांमध्ये हिंसाचार सुरू होता. पंजाब-प्रश्नावर तोडगा काढण्याची जबाबदारी राजीव गांधी यांनी त्यांच्यावर सोपवली होती. तेव्हा त्यांनी राज्यपाल बदलण्याची आणि तेथे राजकीय व्यक्तीची राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्याची सूचना केली. अर्जुनसिंग यांची राज्यपालपदी निवड झाली. पुढे पंजाबमध्ये शांततेसाठी करारही झाला. आसामचा तिढा सोडविण्यातही त्यांनी यश मिळवले होते. 30 जून 1986 हा निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी त्यांनी भारत सरकार आणि मिझो बंडखोरांमध्ये शांतता करार घडवून आणला होता. सरकारी सेवेत काम करताना आलेले अनुभव, राजकारण्यांशी संबंध यावर आधारित त्यांनी बियॉन्ड एक्सपेक्टेशन हे आत्मचरित्रही लिहिले होते.

महत्त्वाच्या बातम्या

CJP PM Modi and Sandeep Deshpande: झुरळांनी बेगॉनला हरवलं! धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर संदीप देशपांडेची भाजपच्या जखमेवर मीठ चोळणारी पोस्ट
झुरळांनी बेगॉनला हरवलं! धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर संदीप देशपांडेची भाजपच्या जखमेवर मीठ चोळणारी पोस्ट
Mumbai Tiranga Morcha: 'जेन झी'ने दिल्ली जिंकली, आता मुंबईत ठाकरे बंधूंचा एल्गार, राज-उद्धव ठाकरेंच्या तिरंगा मोर्चात तरुणाईची ताकद दिसणार
'जेन झी'ने दिल्ली जिंकली, आता मुंबईत ठाकरे बंधूंचा एल्गार, राज-उद्धव ठाकरेंच्या तिरंगा मोर्चात तरुणाईची ताकद दिसणार
मुंबईत अमली पदार्थ तस्करावर कठोर कारवाई, कुख्यात ड्रग्ज तस्कर उस्मान अब्दुल कादर शेखला अटक 
मुंबईत अमली पदार्थ तस्करावर कठोर कारवाई, कुख्यात ड्रग्ज तस्कर उस्मान अब्दुल कादर शेखला अटक 
धक्कादायक! अंधेरीतील शॉपिंग मॉलला भीषण आग, मॉलमधील अनेक दुकाने व गाळे जळून खाक, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल
धक्कादायक! अंधेरीतील शॉपिंग मॉलला भीषण आग, मॉलमधील अनेक दुकाने व गाळे जळून खाक, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Update:बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
Akola Crime: अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
Embed widget