एक्स्प्लोर

वेब सीरिज सेन्सॉरशिपखाली आणावी; माजी ब्रिगेडियर आणि लोकसभेचे माजी खासदार सुधीर सावंत यांची मागणी

एकता कपूरच्या वेब सीरिजमध्ये भारतीय सैन्याचा अवमान केल्याची दृश्ये दाखवल्यानंतर माजी ब्रिगेडियर आणि लोकसभेचे माजी खासदार सुधीर सावंत यांनी वेब सीरिज सेन्सॉरशिपखाली आणण्याची मागणी केली आहे.

मुंबई : निर्माती एकता कपूरच्या वेब सीरिजमध्ये भारतीय सैन्याचा अवमान केल्याची दृश्ये दाखवल्यानंतर देशभरातून विशेषत: सैन्य अधिकारी, सैनिकांकडून एकता कपूरच्या अटकेची मागणी केली जात आहे. अशा परिस्थितीत आता भविष्यात या सारख्या अश्लील, अशोभनीय, अपमानास्पद वेब सीरिज प्रसारित होणार नाहीत, म्हणूनच वेब सीरिज सेन्सॉर बोर्डाच्या अधिपत्याखाली आणाव्यात अशी मागणी केली जात आहे. आता ही मागणी भारतीय सैन्याचे माजी ब्रिगेडियर आणि लोकसभेचे माजी खासदार सुधीर सावंत यांनी केली. सावंत यांनी या प्रकरणात महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांची भेट घेऊन एकता कपूर यांच्या अटकेची मागणी केली आहे. सावंत हे आता राज्यपाल तसेच केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री यांना भेटणार आहेत आणि सेन्सॉर बोर्डाने वेब सीरिजही सेन्सॉर करणार करावी अशी मागणी ते यावेळी करणार आहेत. सावंत म्हणाले, 'एकता कपूरने जे काही केले तो गुन्हा आहे आणि अशा गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे. त्याच वेळी, हा अशा प्रकारचा अश्लीलपणा देशातील नागरिकांमध्ये पसरू नये, म्हणून आम्ही वेब सिरीज सेन्सॉर बोर्डाच्या अधिपत्याखाली आणण्याची मागणी करणार आहोत. जेणेकरून भविष्यात एकता कपूर सारखे कोणी व्यक्ती अशी अश्लीलता दाखवत देशाचे वातावरण खराब करू नये.' 'अबू सालेमसोबत सोनू निगमचे संबंध होते', दिव्याचा इन्स्टाद्वारे पलटवार यासंदर्भात मुंबईच्या खार पोलीस ठाण्यासह देशातील इतर काही पोलीस ठाण्यांमध्ये एकता कपूर आणि अल्ट (ALT) बालाजी यांच्याविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या तक्रारींचा पोलीस तपास करत आहेत. सुधीर सावंत म्हणतात की, 'भारतीय सैन्य, देशाच्या सैन्याशी जोडलेला प्रत्येक नागरिक आणि पती पत्नीच्या पवित्र संबंधांची बदनामी करणारा हा प्रकार असल्याने यामध्ये एकता कपूर यांना अटक करावी अशी आमची मागणी आहे'. भारतीय जवानांविषयी आक्षेपार्ह दृष्य या विषयात, एकता कपूरने यापूर्वीच सैन्यांची माफी मागितली आहे आणि हे दृश्य हटविले आहे. एकता कपूरच्या वेब मालिका XXX 2 मधील एक दृश्य जोरदार व्हायरल झालं होतं, हे पाहून लोक एकता कपूरविरोधात खूप भडकले होते, त्यांचा याविरोधात संताप पाहायला मिळाला. माजी सैन्य अधिकारी जवान आणि सध्याचे सैन्य अधिकारी जवान यांनीही याबाबत आक्षेप नोंदविला. या मालिकेचा एक भाग सैनिक आणि त्यांच्या वर्दीचा अपमान करतो. या आक्षेपार्ह दृश्यबद्दल एकता कपूर यांनी भारतीय सैन्यदलाची माफी मागितली आणि म्हटले - "आम्ही देशाच्या सैन्याचा आदर करतो." आमचे कल्याण आणि सुरक्षिततेत त्यांचे योगदान मोठे आहे. आम्ही चुकल्याबद्दल दिलगीर आहोत.' सोशल मीडियातून बलात्काराच्या धमक्या पण तरीही संतप्त लोकांनी एकता कपूर यांना पद्मश्री परत देण्याची मागणी केली. सोशल साइटवरही या प्रकरणात त्यांना धमक्या देण्यात आल्या. याची खंत व्यक्त करताना एकता म्हणाल्या, त्यांची आई, त्यांना आणि आपल्या मुलाला बलात्काराच्या धमक्या सोशल मीडियावर जाहीरपणे दिल्या. परंतु, या धमक्यांपासून त्या घाबरणार नाही आणि त्यांना सामोरे जाणार आहेत. एकता कपूर यांनी सोशल मीडियावरुन धमकी दिल्याबद्दल मुंबई पोलिसातही तक्रार केली आहे. Usha Jadhav on Fair & Lovely | 'सावळ्या रंगाचा भेद वाईट', अभिनेत्री उषा जाधव

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Sugar Price Hike: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Mumbai Auto Taxi Rate Hike Marathi News: 1 सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार; मुंबई, ठाणेसह कुठेकुठे भाडे वाढणार?, A टू Z माहिती
1 सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार; मुंबई, ठाणेसह कुठेकुठे भाडे वाढणार?, A टू Z माहिती

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Sugar Price Hike: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Embed widget