एक्स्प्लोर

'अबू सालेमसोबत सोनू निगमचे संबंध होते', दिव्याचा इन्स्टाद्वारे पलटवार

भूषणकुमार यांची पत्नी दिव्या खोसला-कुमारने सोनू निगमच्या व्हिडीओला आणि त्याने सुरू केलेल्या कॅम्पेनला उत्तर दिलं आहे. आता तिच्या या वक्तव्यावर सोनू काय म्हणतो हे पाहाणं कुतुहलाचा विषय आहे.

मुंबई : 'भूषणकुमार तुझ्याकडे आले आणि म्हणाले, सोनू मला अबू सालेमपासून वाचव. तसं ते म्हणाले असतील तर ते तुझ्याकडे आले कारण तुझे आणि अबू सालेमचे संबंध होते. सोनू आणि अबू यांचे कसे संबंध होते याचा तपास झाला पाहिजे. मरीना कुंवरच्या व्हिडीओची धमकी तू आम्हाला देतोस. पण मरीनाचा तो हवाला खोटा होता. हे पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. मी टू मुव्हमेंटवेळी अनेक मुलींनी अनेकांवर पैशासाठी खोटे आरोप केले. इतकंच कशाला, आत्ता मी करू का तुझ्यावर मी टूचा आरोप?' असे खणखणीत बोल सुनावत भूषणकुमार यांची पत्नी दिव्या खोसला-कुमारने सोनू निगमच्या व्हिडीओला आणि त्याने सुरू केलेल्या कॅम्पेनला उत्तर दिलं आहे. आता तिच्या या वक्तव्यावर सोनू काय म्हणतो हे पाहाणं कुतुहलाचा विषय ठरलं आहे. सोनूने केलेल्या आरोपांचं खंडन दिव्याने आपल्या व्हिडीओत केलं आहे. 'सोनू दिल्लीच्या जत्रेत पाच रूपयांसाठी गात होता. त्यानंतर गुलशन कुमार यांनी त्याला विमानाचं तिकीट काढून दिलं, मुंबईत आणलं आणि सोनूला मोठं केलं. परंतु त्यानंतर 1990 च्या सुमारास टी सीरीज डगमगू लागली. त्यावेळी ज्यांनी ब्रेक दिला त्यांच्या पाठिशी उभं राहायचं सोडून सोनू दुसऱ्या कंपनीला जाऊन मिळाला. त्यानंतर भूषणने कंपनी टेकओव्हर केली. सोनू दुसऱ्या कंपनीला जाऊन मिळाला होता. त्यामुळे भूषण यांनी सोनूला गाणं गाण्याची विनंती केली. शिवाय, स्मिता ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांना भेटव असं सांगण्यामागे त्याच्या ओळखी होत्या म्हणून सांगितलं. त्याच न्यायाने भूषणकुमार सोनूला अबू सालेमपासून वाचव असं सोनूला का म्हणाले, याचा विचार व्हावा. कारण सोनू आणि अबूचे संबंध होते. उलट या संबंधांची चौकशी व्हायलाच हवी,' असं दिव्याने सांगितलं. सोनू निगमने मरीना कुंवरचा उल्लेखही आपल्या व्हिडीओत केला. त्याचाही समाचार दिव्याने घेतला आहे. ती म्हणाली, मी टू मुव्हमेंट खूप चांगली आहे. पण तिचा गैरफायदाही अनेक मुलींनी घेतला. मरीना ही त्यापैकीच एक होती. भूषणवर तिने आरोप केल्यानंतर त्याची पोलीस चौकशी झाली. त्यात ते आरोप फाजिल असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे सोनूने आम्हाला धमक्या देऊ नयेत. असे फाजिल आरोप मीही सोनूवर करू का? असा सवाल तिने विचारला आहे. सोनूच्या या कॅम्पेननंतर अनेक गायक-कलाकार आम्हाला फोन करून त्रास देऊ लागले आहे. भूषणला मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या आहेत. माझ्यावरही बलात्कार करू अशा धमक्या येऊ लागल्यात. माझ्या मुलालाही मारण्याच्या धमक्या येऊ लागल्यात. हे मी कधीही सहन करणार नाही असं ती सांगते. गायक सोनू निगम, टी-सीरीजचे भूषण कुमारमधील वाद पेटला टी सीरीजने अनेकांना ब्रेक दिला आहे. पण येणारी मंडळी इतकी असतात की प्रत्येकाला ब्रेक देणं शक्य होत नाही. पण ती मंडळी दुखावली जातात. याचा विचार आपण सगळ्यांनीच करायला हवा असं ती या व्हिडिओत सांगते. सोनू निगमने सुशांत सिंगने आत्महत्या केल्यानंतर दोन व्हिडीओ केले. पैकी एकात कुणाचंही नाव न घेता त्याने संगीतसृष्टीत सुरू असलेल्या दडपशाहीबाबत वाचा फोडली. त्यानंतर आलेल्या प्रतिक्रिया पाहून त्याने दुसऱ्या व्हिडीओत भूषणकुमार यांचं नाव घेत त्यांना मरीना कुंवरची आठवण करून देत धमकावलं. त्यावेळी भूषणकुमार कसा आपल्याकडे आला होता.. आपली ओळख करून दे म्हणून आग्रह धरतानाच अबू सालेमपासून मला वाचव असं कसं आपल्याला म्हणत होता याचा व्हिडीओ त्याने करून टाकला. त्यानंतर सोनूच्या पाठिशी सुनील पाल, अदनान सामी असे अनेक लोक उभे राहिले. पण त्यावेळी दिव्या खोसला-कुमारने केवळ इन्स्टा स्टोरी पोस्ट करून सोनूची ही स्टंटबाजी करत असल्याचं म्हटलं होतं. परंतु दोन दिवसांनंतर दिव्याने इन्स्टा लाईव्ह करून सोनूच्या आरोपांचं खंडन केलं आहे. याचा दाखला देण्यासाठी तिने त्यांचा कूक जो कुमार यांच्याकडे 1988 पासून आहे, त्यालाही या व्हिडिओत आणलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

वडिलांच्या चपला घालण्याचा ‘तो’ क्षण अन् मोठं होण्याचा प्रवास; सोनाली बेंद्रेंच्या ‘सोहळा’चा ट्रेलर चर्चेत
वडिलांच्या चपला घालण्याचा ‘तो’ क्षण अन् मोठं होण्याचा प्रवास; सोनाली बेंद्रेंच्या ‘सोहळा’चा ट्रेलर चर्चेत
Bigg Boss 20 Qazi Tauqeer: 'बिग बॉस 20' मधून रॉकस्टार काजी तौकीर बाहेर? महिनाभरात खेळ संपला? गायकाच्या टीमची पोस्ट व्हायरल
'बिग बॉस 20' मधून रॉकस्टार काजी तौकीर बाहेर? महिनाभरात खेळ संपला? गायकाच्या टीमची पोस्ट व्हायरल
Miranda Warning Marathi Movie: 'एक चेहरा… एक नजर… आणि हजार प्रश्न'; जान्हवी किल्लेकरचा आगामी सिनेमातला लूक व्हायरल, आदिनाथ कोठारेसोबत मुख्य भूमिकेत
'एक चेहरा… एक नजर… आणि हजार प्रश्न'; जान्हवी किल्लेकरचा आगामी सिनेमातला लूक व्हायरल, कोड्यात टाकणारं पोस्टर पाहिलंत?
Zee Marathi TV Serials: झी मराठीच्या मालिकांमध्ये मोठा ट्विस्ट; आठवडाभर रंगणार खास मनोरंजन, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
झी मराठीच्या मालिकांमध्ये मोठा ट्विस्ट; आठवडाभर रंगणार खास मनोरंजन, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

व्हिडीओ

Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Mandhana : स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
Drought Action Plan Maharashtra : राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
Embed widget