एक्स्प्लोर

पत्नीशी जबरदस्तीनं शारिरीक संबंध बेकायदेशीर नाही, आरोपी पतीला जामीन, मुंबई सेशन कोर्टाचा निर्णय

पत्नीसोबत जबरदस्तीनं, इच्छेविरुद्ध शारिरीक संबंध प्रस्थापित करणं बेकायदेशीर नाही, असा निर्वाळा देत मुंबई सेशन कोर्टानं आरोपी पतीला जामीन मंजूर केला आहे.

मुंबई : पत्नीसोबत जबरदस्तीनं, इच्छेविरुद्ध शारिरीक संबंध प्रस्थापित करणं बेकायदेशीर नाही, असा निर्वाळा देत मुंबई सेशन कोर्टानं आरोपी पतीला जामीन मंजूर केला आहे. मुंबई सेशन कोर्टाच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश संजश्री घरत यांनी म्हटलं आहे की,  एक महिलेने आपल्या पतीविरुद्ध तिच्या इच्छेच्या विरोधात जाऊन जबरदस्तीनं शारिरीक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप केला आहे. मात्र हे कोणत्याही कायदेशीर चौकशीचं प्रकरण नाही, असं न्यायाधीशांनी म्हटलं आहे. 

तक्रारकर्त्यांच्या म्हणण्यानुसार सदर महिलेचं मागील वर्षी 22 नोव्हेंबर रोजी लग्न झालं होतं. त्या महिलेनं तक्रार दाखल केली होती. यात म्हटलं आहे की, लग्नानंतर सदर महिलेवर पती आणि सासरच्या लोकांनी अनेक बंधनं घालायला सुरुवात केली. सोबतच टोमणे मारणे, शिविगाळ करत पैशांची मागणी देखील केली. महिलेनं आरोप केला आहे की, लग्नाच्या एका महिन्यानंतर पतीनं तिच्यासोबत जबरदस्ती शारिरीक संबंध प्रस्थापित केले. तिनं म्हटलं की,   2 जानेवारीला ते दोघे महाबळेश्वरला गेले होते. तिथं पतीनं जबरदस्तीनं शारिरीक संबंध प्रस्थापित केल्यानं तिला अस्वस्थ वाटू लागलं आणि ती डॉक्टरांकडे गेली. त्यावेळी डॉक्टरांनी तिची तपासणी केल्यानंतर तिच्या कमरेखालील भागात लकवा मारल्याचं सांगितलं, असं महिलेनं तक्रारीत म्हटलं आहे.  

यानंतर या महिलेनं पती आणि अन्य लोकांच्या विरोधात मुंबईत तक्रार दाखल केली. यानंतर तिच्या पतीनं अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला. सुनावणी दरम्यान पती आणि त्याच्या परिवारानं सांगितलं की, आमच्यावर खोटे आरोप केले जात आहेत. आम्ही हुंड्याची वगैरे मागणी कधीच केली नाही.  

न्यायधीशांनी यावर सांगितलं की, पती होण्याच्या नात्यानं यात त्यानं काही चुकीचं केलेलं नाही. न्यायाधीशांनी म्हटलं की, महिलेनं हुंडा मागितल्यासंदर्भात तक्रार केली आहे. मात्र किती हुंडा मागितला याची माहिती दिलेली नाही. तसेच जबरदस्ती शारिरीक संबंधाला काही कायदेशीर आधार नाही. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! साताऱ्यात जमिनीच्या वादातून एकावर जीवघेणा हल्ला, परिसरात भीतीचं वातावरण 
धक्कादायक! साताऱ्यात जमिनीच्या वादातून एकावर जीवघेणा हल्ला, परिसरात भीतीचं वातावरण 
Dadar Power Cut : ऐन दिवाळीत दादर माहीमध्ये बत्ती गुल, नागरिकांनी मेणबत्त्या पेटवल्या, कंदिलाची  अंधारात विक्री
ऐन दिवाळीत दादर माहीमध्ये बत्ती गुल, नागरिकांनी मेणबत्त्या पेटवल्या, कंदिलाची अंधारात विक्री
मुंबईत जाऊन 30 वर्षे लाटा मोजल्या नाहीत; रामराजेंनी कार्यकर्त्यांना सांगितलं कोणत्या पक्षात जाणार?
मुंबईत जाऊन 30 वर्षे लाटा मोजल्या नाहीत; रामराजेंनी कार्यकर्त्यांना सांगितलं कोणत्या पक्षात जाणार?
पडक्या घरातच पूरग्रस्त लाडक्या बहिणीनं केलं पालकमंत्र्याचं स्वागत; जयकुमार गोरे म्हणाले घर बांधून देतो
पडक्या घरातच पूरग्रस्त लाडक्या बहिणीनं केलं पालकमंत्र्याचं स्वागत; जयकुमार गोरे म्हणाले घर बांधून देतो
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Kinnar : गोवंडीत बांग्लादेशी 'किन्नर गुरू' अटकेत, मोठे रॅकेट उघड
Sadhavi Pradnya Controversy: मुली दुसऱ्या धर्मात गेल्या तर तंगड्या तोडा', साध्वी प्रज्ञांचं वादग्रस्त विधान
Special Report Shaniwarwada : शनिवारवाड्यात नमाज पठण, खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक
Vedic Education in ITI: 'हा तर पौरोहित्य परंपरेला छेद'; नाशिकमध्ये सरकारच्या निर्णयाला पुरोहित संघाचा कडाडून विरोध
Special Report Solapur Politics: मी नव्हे, माझा नातू येईल; सोलापूरच्या राजकारणात कलगीतुरा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! साताऱ्यात जमिनीच्या वादातून एकावर जीवघेणा हल्ला, परिसरात भीतीचं वातावरण 
धक्कादायक! साताऱ्यात जमिनीच्या वादातून एकावर जीवघेणा हल्ला, परिसरात भीतीचं वातावरण 
Dadar Power Cut : ऐन दिवाळीत दादर माहीमध्ये बत्ती गुल, नागरिकांनी मेणबत्त्या पेटवल्या, कंदिलाची  अंधारात विक्री
ऐन दिवाळीत दादर माहीमध्ये बत्ती गुल, नागरिकांनी मेणबत्त्या पेटवल्या, कंदिलाची अंधारात विक्री
मुंबईत जाऊन 30 वर्षे लाटा मोजल्या नाहीत; रामराजेंनी कार्यकर्त्यांना सांगितलं कोणत्या पक्षात जाणार?
मुंबईत जाऊन 30 वर्षे लाटा मोजल्या नाहीत; रामराजेंनी कार्यकर्त्यांना सांगितलं कोणत्या पक्षात जाणार?
पडक्या घरातच पूरग्रस्त लाडक्या बहिणीनं केलं पालकमंत्र्याचं स्वागत; जयकुमार गोरे म्हणाले घर बांधून देतो
पडक्या घरातच पूरग्रस्त लाडक्या बहिणीनं केलं पालकमंत्र्याचं स्वागत; जयकुमार गोरे म्हणाले घर बांधून देतो
बदलापुरात शहराबाहेरील 17 हजार मतदार; शिंदेंच्या शिवसेनेचे शहरप्रमुख पुढे, म्हणाले, बोगस लोकांना चोप देऊ
बदलापुरात शहराबाहेरील 17 हजार मतदार; शिंदेंच्या शिवसेनेचे शहरप्रमुख पुढे, म्हणाले, बोगस लोकांना चोप देऊ
FPI: दिवाळीपूर्वी भारतासाठी गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, तीन महिन्यानंतर शेअर बाजारात मोठी गुंतवणूक
दिवाळीपूर्वी भारतासाठी गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, 3 महिन्यानंतर शेअर बाजारात कोट्यवधी गुंतवले
Team India : टॉप ऑर्डर फेल ते सरावाचा अभाव, टीम इंडियाचं पहिल्या वनडेत नेमकं काय चुकलं? पराभव 'या' कारणामुळं 
Team India : टॉप ऑर्डर फेल ते सरावाचा अभाव, टीम इंडियाचा  पहिल्या वनडेत पराभव 'या' कारणामुळं, जाणून घ्या 
Credit Score :  कर्ज लवकर मंजूर करुन घ्यायचं असल्यास क्रेडिट स्कोअर कसा वाढवायचा? जाणून घ्या सोपे पर्याय
कर्ज लवकर मंजूर करुन घ्यायचं असल्यास क्रेडिट स्कोअर कसा वाढवायचा? जाणून घ्या सोपे पर्याय
Embed widget