एक्स्प्लोर

पब्जी खेळण्यामुळे वाद, होणाऱ्या भाऊजीवर मेव्हण्याने वार केले

कुत्रं ओमच्या भावी पत्नीनं पाळलेलं असल्यानं भावा-बहिणींमध्ये जोरदार वाद झाला. त्यातच संतापलेल्या भावानं किचनमधून चाकू आणून बहिणीच्या लॅपटॉपची वायर कापून टाकली. यामुळे ओमने त्याला जाब विचारला असता त्याने ओमच्या पोटावर चाकूने वार केले.

कल्याण : पब्जी खेळण्याच्या वादातून एका तरुणाने आपल्या बहिणीच्या भावी पतीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेच्या 6 दिवसांनी पोलिसांना गुन्हा नोंदवण्यासाठी जाग आली असून आरोपीला अजूनही अटक करण्यात आलेली नाही. अंबरनाथच्या लोकनगरी भागात राहणाऱ्या ओम बावधनकर यांचं कल्याण पूर्वेत राहणाऱ्या एका मुलीशी लग्न ठरलं असून साखरपुडाही झाला आहे. 7 फेब्रुवारी रोजी ओम हा त्याच्या भावी पत्नीच्या घरी होता. यावेळी तिचा भाऊ पब्जी गेम खेळत असताना त्याच्या मोबाईलची बॅटरी डाऊन झाली. त्यामुळं त्यानं चार्जर घेतलं असता चार्जरची वायर घरातल्या पाळीव कुत्र्यानं खाल्ल्याचं त्याला दिसलं. हे कुत्रं ओमच्या भावी पत्नीनं पाळलेलं असल्यानं भावा-बहिणींमध्ये जोरदार वाद झाला. त्यातच संतापलेल्या भावानं किचनमधून चाकू आणून बहिणीच्या लॅपटॉपची वायर कापून टाकली. यामुळे ओमने त्याला जाब विचारला असता त्याने ओमच्या पोटावर चाकूने वार केले. या घटनेनंतर ओमवर आधी उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटल आणि मग कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र 7 फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडूनही कोळसेवाडी पोलिसांनी 6 दिवसांनी गुन्हा दाखल केला. तर त्यानंतर तीन दिवस उलटूनही अद्याप आरोपी मेहुण्याला पोलिसांनी अटक केलेली नाही. त्यामुळं कोळसेवाडी पोलीस मॅनेज झाले आहेत का? असा प्रश्न जखमी ओम बावधनकर यांनी विचारला आहे. तर पोलिसांनी मात्र तपास योग्य दिशेनं सुरू असल्याचं सांगत कारवाईचं आश्वासन दिलं आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Julia Ain: 'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो
निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासी समाजाला वन विभागाची नोटीस; घरं रिकामं करण्यास सांगण्यात आलं, बस सेवा बंद केल्याचा आरोप
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासी समाजाला वन विभागाची नोटीस; घरं रिकामं करण्यास सांगण्यात आलं, बस सेवा बंद केल्याचा आरोप

व्हिडीओ

Raju Patil On Shiv Sena Mns Alliance In KDMC :राज ठाकरेंनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश दिले, राजू पाटलांची महिती
Samadhan Sarvankar Mumbai :भाजपच्या टोळीने पराभव केला,सरवणकर ठाम;सायबर विभागात तक्रार करणार
Anil Galgali On Mumbai Mayor :मुंबई महापौर पदासाठी 114 चा ‘जादुई आकडा’ आवश्यक नाही, वस्तुस्थिती काय?
Mahesh Sawant On Samadhan Sarvankar : भाजपच्या टोळीमुळे पराभव झाल्याचा आरोप करणाऱ्या सरवणकरांना सावंतांनी सुनावलं
Harshwardhan Sapkal Buldhana: प्रतिभा धानोरकर-विजय वडेट्टीवार वादावर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Julia Ain: 'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो
निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासी समाजाला वन विभागाची नोटीस; घरं रिकामं करण्यास सांगण्यात आलं, बस सेवा बंद केल्याचा आरोप
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासी समाजाला वन विभागाची नोटीस; घरं रिकामं करण्यास सांगण्यात आलं, बस सेवा बंद केल्याचा आरोप
KDMC Election 2026 Shivsena MNS Alliance: आधी एकमेकांच्या लाजा काढल्या, आता मनसेचे राजू पाटील लाज सोडून म्हणतात, 'सत्तेला चिकटलो तर काहीतरी मिळेल!'
आधी एकमेकांच्या लाजा काढल्या, आता मनसेचे राजू पाटील लाज सोडून म्हणतात, 'सत्तेला चिकटलो तर काहीतरी मिळेल!'
शिंदेंच्या शिवसेनेला मनसेचा पाठिंबा; बाळा नांदगावकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात काहीही होऊ शकतं
शिंदेंच्या शिवसेनेला मनसेचा पाठिंबा; बाळा नांदगावकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात काहीही होऊ शकतं
भाजपकडून तानाजी सावंतांना दे धक्का; पक्षप्रवेश न होताच जिल्हा परिषदेसाठी पुतण्याला उमेदवारी
भाजपकडून तानाजी सावंतांना दे धक्का; पक्षप्रवेश न होताच जिल्हा परिषदेसाठी पुतण्याला उमेदवारी
Kalyan Dombivli Shivsena and MNS Yuti: कल्याण डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाचा भाजपला 'मनसे' कात्रजचा घाट; आता काँग्रेस नगरसेवकांच्या निर्णयानं भूवया उंचावल्या
कल्याण डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाचा भाजपला 'मनसे' कात्रजचा घाट; आता काँग्रेस नगरसेवकांच्या निर्णयानं भूवया उंचावल्या
Embed widget