भिवंडीत कारखान्याची धोकादायक इमारत कोसळून पाच जण जखमी; एकाची प्रकृती गंभीर
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका हद्दीतील पांजरापोळ परिसरात निशाण हॉटेलच्या पाठीमागे तळ अधिक एक मजल्याचा लूमचा कारखाना आहे.
भिवंडी : भिवंडीत कारखान्याची पुन्हा एक मजली धोकादायक इमारत कोसळल्याची घटना पांजरापोळ परिसरात निशाण हॉटेलच्या पाठीमागे घडली आहे. या दुर्घटनेत पाच जण जखमी झाले असून त्यातील एक जण गंभीर जखमी असल्याने त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
भिवंडीत जखमी झालेल्यांची नावे समोर आली आहे. मोहम्मद निजामुद्दीन शेख (20),सर्ताज मोह.अश्फाक शेख (26),मोह.शकील मोह.मेहरुद्दिन शेख (25),मोह.मसूर नाजिमुद्दिन शेख (30),मोह.जहांगीर मोह.आलम शेख (32) अशी जखमींची नावे असून यापैकी मोहम्मद जहांगीर याची प्रकृती चितांजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका हद्दीतील पांजरापोळ परिसरात निशाण हॉटेलच्या पाठीमागे तळ अधिक एक मजल्याचा लूमचा कारखाना आहे. या कारखान्याची इमारत अत्यंत धोकादायक असल्याने ती रिकामी करण्यात आली होती. मात्र ही धोकादायक इमारत मंगळवारी सकाळच्या सुमारास कोसळली. यामुळे त्याच्या बाजूला असलेल्या खोलीमध्ये एक व्यक्ती अडकली होती. त्या व्यक्तीला अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. त्याचबरोबर या घटनेत आणखी चार व्यक्ती जखमी झालेल्या आहेत. या चौघांवर रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर, एकजण गंभीर जखमी झाला असल्याने त्याला सिराज रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
राज्यभरात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सुरु असल्याने अपघातांच्या बातम्या समोर येत आहेत. भिंत आणि इमारती कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे वेळीच सतर्क होणे गरजेचे आहे. यासोबतच अनेक ठिकाणी नद्यांना पूर आले आहेत. अशा वेळी अनेक जण जीव धोक्यात घालून प्रवास करतात. काही जण वाहत्या पाहण्यात पोहायला जातात. यामुळे पाण्यात वाहून जाण्याच्या घटना देखील वाढल्या आहेत. यामुळे सतर्क राहणे गरजेचे आहे.
संबंधित बातम्या :