एक्स्प्लोर
अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर होणार
मुंबईतील दोन लाख 31 हजार 140 विद्यार्थ्यांची नावं सर्वसाधारण गुणवता यादी मध्ये जाहीर करण्यात आली.
![अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर होणार First merit list of FYJC entrance on thursday latest update अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर होणार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/29090649/Student-result.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर होणार आहे. वेळापत्रकानुसार सकाळी 11 वाजता ही यादी जाहीर होणार असल्याचं शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आलं. अकरावी प्रवेशाची सर्वसाधारण यादी 29 जूनला जाहीर झाली होती.
यावर्षी मुंबईतील दोन लाख 31 हजार 140 विद्यार्थ्यांची नावं सर्वसाधारण गुणवता यादी मध्ये जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये 16 हजार 463 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण असल्याने यंदा नामांकित महाविद्यालयाचा कट ऑफ नव्वदी पारच पाहायला मिळणार आहे.
सीबीएसई, आयसीएसई आणि राज्य मंडळाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेणारे विद्यार्थी मागच्या वर्षीच्या तुलनेत जास्त असल्यामुळे यावर्षी महविद्यालयाच्या प्रवेशासाठी चुरस पाहायला मिळणार आहे.
पहिली गुणवत्ता यादी उद्या जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी 6 ते 9 जुलैला सकळी 11 ते सायंकाळी 5 दरम्यान आपले प्रवेश मिळालेल्या कॉलेजमध्ये जाऊन निश्चित करायचे आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
राजकारण
बातम्या
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)