एक्स्प्लोर
महापालिकेच्या युतीसाठी शिवसेना-भाजपमध्ये आज पहिली बैठक
मुंबई : युतीसंदर्भात भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आज पहिली बैठक होणार आहे. मात्र चर्चेआधीच दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत.
सेना-भाजपमधील युतीसंदर्भात चर्चा कोणत्या नेत्यांमध्ये होणार?
मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये युतीचा निर्णय घेण्यासाठी शिवसेनेकडून 3 तर भाजपकडून 2 नेत्यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेनेकडून अनिल परब, अऩिल देसाई आणि रवींद्र मिर्लेकर उपस्थित राहणार आहेत. यंदा शिवसेनेने प्रस्थापितांना बाजुला ठेवून मिर्लेकरांना संधी दिलेली दिसते आहे. तर भाजपाकडून आशिष शेलार आणि विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळं आता बैठकीत काय निर्णय होतो याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
'मातोश्री'वर काल शिवसेनेच्या उमेदवार पडताळणीसाठी बैठक पार पडली. त्या बैठकीत घाटकोपर म्हणजेच किरीट सोमय्यांच्या मतदारसंघातील शिवसैनिकांना कपटी आणि चाणाक्ष मित्रापासून सावध राहण्याचा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
दुसरीकडे किरीट सोमय्यांनी शिवसेनेवरची आगपाखड सुरुच ठेवली आहे. जागावाटपाच्या चर्चेपूर्वी शिवसेनेनं सद्यपरिस्थितीचं भान आणि ज्ञान ठेवावं अशी शेलकी टीका किरीट सोमय्यांनी केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्रिकेट
शेत-शिवार
राजकारण
Advertisement