एक्स्प्लोर
'साहेबांवर 92 गुन्हे, माझ्यावर एक गुन्हा दाखल केल्यानं मला काय फरक पडतो'
!['साहेबांवर 92 गुन्हे, माझ्यावर एक गुन्हा दाखल केल्यानं मला काय फरक पडतो' Fir File On Mns Organizer Avinash Jadhav 'साहेबांवर 92 गुन्हे, माझ्यावर एक गुन्हा दाखल केल्यानं मला काय फरक पडतो'](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/25165324/avinash-MNS-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ठाणे: सुप्रीम कोर्टाचे नियम धाब्यावर बसवत ठाण्यातील नौपाड्यात जय जवान मंडळानं नऊ थर रचले. याप्रकरणी जय जवान मंडळ आणि मनसेचे दहीहंडी आयोजक अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अविनाश जाधव यांना यासंदर्भात नोटीसही तात्काळ धाडण्यात आली आहे. यावेळी एबीपी माझाशी बोलताना आयोजक अविनाश जाधव यांनी आपला संताप व्यक्त केला. 'माझ्या साहेबांवर तर 92 गुन्हे दाखल आहेत. तर माझ्यावर एक गुन्हा दाखल केल्यानं काय फरक पडणार?' असं आयोजक अविनाश जाधव म्हणाले.
तुरुंगात जाण्याची मी आधीपासूनच मनापासून तयारी केली आहे. पण आपले मराठी सण साजरे झालेच पाहिजेत. कोणत्याही परिस्थिती हे सण बंद होता कामा नये. असंही अविनाश जाधव म्हणाले.
राज ठाकरेंचा अविनाश जाधवांना फोन
दहीहंडीआधी तुम्हाला राज ठाकरेंचा काही फोन आला होता का? या प्रश्नावर बोलताना अविनाश जाधव म्हणाले की 'होय काल संध्याकाळी मला राज ठाकरेंचा फोन आला होता. सर्व सुरक्षेचे उपाय केले आहेत की नाही याची त्यांनी विचारपूसही केली.'
संबंधित बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
करमणूक
क्राईम
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)