एक्स्प्लोर

Mumbai News: शेअर बाजारात नुकसान झाल्याने कर्जाचा डोंगर, समोर लोकल ट्रेन दिसताच डोकं रुळावर ठेवून बापलेकाने आयुष्य संपवलं

Mumbai News: भाईंदरमध्ये पितापुत्राची लोकल ट्रेनखाली आत्महत्या, विदारक घटनेने खळबळ. या दोघांनी स्वत:ला ट्रेनसमोर झोकून दिले. भाईंदर रेल्वे स्थानकातील घटना. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून पुढील तपास

मुंबई: पश्चिम रेल्वेमार्गावरील भाईंदर स्थानकात वडील आणि मुलाने स्वत:ला लोकल ट्रेनसमोर (Mumbai Local Train) झोकून देत एकत्रित आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या प्रकाराबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. लोकल ट्रेनखाली येऊन आत्महत्या (Mumbai Suicide) करणाऱ्या पितापुत्रांची ओळख पटली आहे. हरिश मेहता (वय 60) आणि त्यांचा मुलगा जय मेहता (वय 32)  अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांनी कर्जबाजारीपणाच्या (Loan)समस्येमुळे आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. 

मृत हरिश मेहता हे पूर्वी मुंबईतील शेअर मार्केटमध्ये (Share Market) कामाला होते. तर जय मेहता हा डीटीपी ऑपरेटर होता. ते वसईला राहायला होते. वर्षभरापूर्वीच जयचे लग्न झाले होते. हरिश आणि जय मेहता यांना शेअर बाजारातील गुंतवणुकीत प्रचंड नुकसान झाल्याने त्यांच्या डोक्यावर कर्ज होते. याच चिंतेने ग्रासल्यामुळे या बापलेकाने आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

एकमेकांचा हात धरुन धावत्या लोकलसमोर गेले, रुळावर डोकं ठेवून आयुष्य संपवलं

हरिश आणि जय मेहता हे दोघेही भाईंदर स्थानकातून रेल्वे ट्रॅकपर्यंत चालत जातानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये बापलेक फलाटावरून चालत जात रेल्वे रुळांवर उतरल्याचे दिसत आहे. रेल्वे ट्रॅकवर उतरल्यानंतर हे दोघेही विरारच्या दिशेने चालू लागले. त्यावेळी या दोघांना फास्ट ट्रॅकवरुन चर्चगेटला जाणारी ट्रेन येताना दिसली. या ट्रेनच्या मोटरमनला अंदाज येऊ नये, यासाठी वडील आणि मुलगा दोघेही सुरुवातील शेजारच्या ट्रॅकवरुन चालत होते. मात्र, चर्चगेट लोकल अगदी जवळ आल्यानंतर बापलेक एकमेकांचा हात धरुन ट्रेनसमोर गेले आणि ट्रॅकवर झोपले.

या दोघांनाही रेल्वे ट्रॅकवर झोपताना आपापलं डोकं रुळांवर ठेवलं होतं. त्यामुळे लोकल ट्रेन या दोघांच्या डोक्यावरुन गेल्याने त्यांचा चेंदामेंदा झाला. सोमवारी सकाळी 10 वाजता या दोघांचे मृतदेह रेल्वे ट्रॅकवर पडल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाली. मात्र, डोके छिन्नविछिन्न झाल्याने या दोघांची ओळख पटत नव्हती. अखेर पोलिसांनी त्यांच्या खिशात मिळालेल्या आधार कार्डावरुन या दोघांची ओळख पटवली. या दोघांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी याप्रकरणी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

आणखी वाचा

बापलेक एकमेकांशी बोलत प्लॅटफॉर्मवरून रेल्वे ट्रॅकवर उतरले अन् घट्ट मिठी मारत स्वतःला लोकल ट्रेनसमोर झोकून दिलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 19 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 10 PM 19 September 2024 : ABP MajhaAmit Thackeray Special Report : आणखी एक ठाकरे निवडणूक लढवणार? अमित ठाकरेंची जोरदार चर्चाBalasaheb Thorat on CM : मविआच्या सरकारमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल, बाळासाहेब थोरातांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Guru Vakri 2024 : अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Embed widget