एक्स्प्लोर

Fastag Compulsory Rule : 'फास्टॅग' सक्तीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका, एक मार्गिका 'कॅशलेन' म्हणून ठेवण्याची मागणी

देशभरातील टोलनाक्यांवर जारी केलेल्या 'फास्टॅग' सक्तीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र एक मार्गिका 'कॅशलेन' म्हणून ठेवण्याची प्रमुख मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.

मुंबई : ज्या गाड्यांवर 'फास्टॅग' नाही त्या बेकायदेशीर आहेत का?, देशातील सगळे महामार्ग हे केवळ फास्टॅग लावलेल्या वागनांसाठीच असा त्याचा अर्थ आहे का?, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला केली आहे. मात्र 4 डिसेंबरच्या अधिसूचनेत सर्व टोल नाक्यांवरील सर्व लेन फास्टॅग करण्याची अनुमती देण्यात आल्याची केंद्र सरकारच्यावतीनं हायकोर्टाला देण्यात आली. यासंदर्भात आठवड्याभरात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देत हायकोर्टानं सुनावणी 7 एप्रिलपर्यंत तहकूब केली आहे.

देशभरातील टोलनाक्यांवर जारी केलेल्या 'फास्टॅग' सक्तीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र एक मार्गिका 'कॅशलेन' म्हणून ठेवण्याची प्रमुख मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. कारण कायद्यानं 'फास्टॅग'च्या रांगेत विनाटॅगची गाडी आल्यास दुप्पट टोल आकारण्याची मुभा असताना सरसकट दुप्पट टोल आकारणी बेकायदेशीर असल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे. तसेच कायद्यानं टोल भरण्यासाठी पर्याय उपलब्ध (कार्ड, कॅश, टॅग) असताना केवळ फास्टॅगची सक्ती अयोग्य असल्याचा दावाही याचिकेतून करण्यात आला आहे. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी सुरु आहे.

पाहा व्हिडीओ : Fastag सक्तीविरोधात दाखल याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी 

भारतापासून चार तासांच्या अंतरावर असलेल्या सिंगापूरमध्ये ही प्रणाली साल 1994 पासून लागू आहे. मात्र ती भारतात यायला किती वर्ष लागली? याचाही विचार करा, असा सल्ला न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांनी दोन्ही पक्षांना दिला. पुण्यातील व्यावसायिक अर्जुन खानपुरे यांनी अॅड. उदय वारूंजीकर यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात जनहित याचिका दाखल केली आहे. केंद्रीय वाहतूक मंत्रालयानं 12 आणि 14 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार ज्या वाहनांना फास्टॅग नसेल अशा वाहनांकडून दुप्पट टोल आकारला जात आहे. बऱ्याच वाहनांना फास्टॅग नसल्यानं टोल नाक्यावर दुप्पट पैसे आकारले जात आहेत. त्यामुळे चालक आणि टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांमध्ये वाद होत असल्याच्याही घटना घडत आहेत. 

तसेच अजुनही अनेक लोकं कैशलेस पेमेंटला सरावलेली नाहीत. ते व्यवहार रोखीनंच करणं पसंत करतात. तसेच हायवेवर खेडेगावच्या ठिकाणी जिथं नेटवर्कची समस्या असते तिथंही बऱ्याचदा फास्टटॅग असूनही टोल रोखीनं स्वीकारला जातो. त्यामुळे हे प्रकार थांबवण्यासाठी टोल नाक्यावर एक मार्गिका रोखीने पैसे भरणाऱ्यांसाठी आरक्षित ठेवा अशी मागणी होताना दिसत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19 वा दिवस
Maharashtra Live News Updates: दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19 वा दिवस
Mumbai Local News: मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
High Court On BMC: उघड्यावर थुंकणे आता मुंबईकरांना महागात पडणार; 250 रू दंड आता थेट 2000 रुपयांपर्यंत वाढणार, हायकोर्टाचे BMC ला आदेश
उघड्यावर थुंकणे आता मुंबईकरांना महागात पडणार; 250 रू दंड आता थेट 2000 रुपयांपर्यंत वाढणार, हायकोर्टाचे BMC ला आदेश
Kandivali Crime: गिफ्ट देण्याच्या बहाणा, डोळे बंद करायला लावले अन् प्रियकराने जागीच...; क्राइम पेट्रोल बघून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, एकतर्फी प्रेमप्रकरणात धक्कादायक माहिती उघड
गिफ्ट देण्याच्या बहाणा, डोळे बंद करायला लावले अन् प्रियकराने जागीच...; क्राइम पेट्रोल बघून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, कांदिवलीतील एकतर्फी प्रेमप्रकरणात धक्कादायक माहिती उघड

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinayak Raut: अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
Mumbai Local News: मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
High Court On BMC: उघड्यावर थुंकणे आता मुंबईकरांना महागात पडणार; 250 रू दंड आता थेट 2000 रुपयांपर्यंत वाढणार, हायकोर्टाचे BMC ला आदेश
उघड्यावर थुंकणे आता मुंबईकरांना महागात पडणार; 250 रू दंड आता थेट 2000 रुपयांपर्यंत वाढणार, हायकोर्टाचे BMC ला आदेश
Gashmeer Mahajani On Pravin Tarde: '100 कोटींची मेहनत...', 'देऊळ बंद 2'च्या यशानंतर गश्मीर महाजनीची पोस्ट, प्रवीण तरडेंना टॅग करत म्हणाला...
'100 कोटींची मेहनत...', 'देऊळ बंद 2'च्या यशानंतर गश्मीर महाजनीची पोस्ट, प्रवीण तरडेंना टॅग करत म्हणाला...
Kandivali Crime: गिफ्ट देण्याच्या बहाणा, डोळे बंद करायला लावले अन् प्रियकराने जागीच...; क्राइम पेट्रोल बघून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, एकतर्फी प्रेमप्रकरणात धक्कादायक माहिती उघड
गिफ्ट देण्याच्या बहाणा, डोळे बंद करायला लावले अन् प्रियकराने जागीच...; क्राइम पेट्रोल बघून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, कांदिवलीतील एकतर्फी प्रेमप्रकरणात धक्कादायक माहिती उघड
Beed Crime Vilas Ghule Case: बीडमधील विलास घुले प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; उमेश मानेवर अत्याचाराचा गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
बीडमधील विलास घुले प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; उमेश मानेवर अत्याचाराचा गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
'द कपिल शर्मा शो'चं टॉप सीक्रेट अखेर सर्वांसमोर आलंच, 'बच्चा यादव'नं केला भांडाफोड; थेट कपिल शर्माचं नाव घेत म्हणाला...
'द कपिल शर्मा शो'चं टॉप सीक्रेट अखेर सर्वांसमोर आलंच, 'बच्चा यादव'नं केला भांडाफोड; थेट कपिल शर्माचं नाव घेत म्हणाला...
Nagpur Crime: आधी दारूच्या नशेत तरुणांसोबत राडा, नंतर नाकाबंदी दरम्यान पळून जाताना कारला धडकला; पोलिसांच्या तपासात तरुण नागपुरातील तडीपार आरोपी निघाला
आधी दारूच्या नशेत तरुणांसोबत राडा, नंतर नाकाबंदी दरम्यान पळून जाताना कारला धडकला; पोलिसांच्या तपासात 'तो' तरुण नागपुरातील तडीपार आरोपी निघाला
Embed widget