इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी परिसरात एका 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

रायगड : सध्या तरुणाईला ट्रेकिंगं वेड लागल्याचं पाहायला मिळतं, कधी मित्रांच्या ग्रुपसोबत तर कधी सोलो ट्रीप म्हणूनही तरुण एकटेच ट्रेकिंगसाठी जातात. अनेकदा गड किल्ल्यांवर, उंच टेकड्यांवर जाऊन ट्रेकिंगचा आनंद घेतात. मात्र, कधीकधी हेच ट्रेकिंग पर्यटकांच्या (Tourist) जीवावर बेतल्याच्याही घटना घडल्या आहेत. ट्रेकिंगसाठी आलेल्या 20 वर्षीय तरुणाचा रायगड (Raigad) जिल्ह्यातील इर्शाळवाडी परिसरात मृत्यू झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. उष्माघात अथवा हृदयविकाराचा धक्क्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. डोंबिवली (dombivali) येथून 7 जणांचा ग्रुप ट्रेकिंगसाठी इर्शाळवाडीत आला होता, त्यामधील रितेश कोणका या 20 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे.
रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी परिसरात एका 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रितेश कोणका असं या तरुणाचे नाव असून तो आपल्या 6 मित्रांसोबत डोंबिवलीवरून ट्रेकिंगसाठी इर्शालवाडीला आला होता, येथील ट्रेकिंगदरम्यान त्याचा मृत्यू झाला. उष्माघात अथवा हृदयविकाराचा धक्क्याने त्याचं निधन झालं असावं, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. रितेश हा डोंबिवली पश्चिम कोपर परिसरातील रहिवाशी असूनतो एस.आय. कॉलेज डोंबिवली येथे शिक्षण घेत होता. या घटनेचा अधिक तपास खालापूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन पवार प्रभारी पोलिस विशाल पवार करत आहेत.
दरम्यान, पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने युवकाचा मृतदेह बाहेर काढला असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
हेही वाचा
Before You Go
Sanjay Raut Arvind Sawant : फुटणाऱ्या आमदार-खासदारांना रस्त्यात तुडवा, ठाकरेंच्या शिवसेनेचा ॲक्शन प्लॅन ठरला






















