एक्स्प्लोर
Advertisement
डोंबिवलीत पोलिसाच्या पत्नीची तोतया पोलिसाकडून फसवणूक
काही दिवसांपूर्वी डोंबिवलीच्या नांदिवली भागात राहणाऱ्या एका पोलिसाच्या पत्नीशी तिने फेसबुकवर मैत्री केली.
डोंबिवली : स्वतःला निलंबित पोलिस अधिकारी सांगून पोलिसाच्याच पत्नीची फसवणूक करणाऱ्या एका महिलेला डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. भक्ती उर्फ सारिका शिंदे असं या भामटीचं नाव आहे.
भक्ती ही निलंबित महिला पोलीस अधिकारी म्हणून डोंबिवलीत वावरत होती. काही दिवसांपूर्वी डोंबिवलीच्या नांदिवली भागात राहणाऱ्या एका पोलिसाच्या पत्नीशी तिने तीन महिन्यांपूर्वी फेसबुकवर मैत्री केली. यानंतर आपण निलंबित असल्याचं सांगत तिच्याकडे मदतीची याचना केली. त्यानंतर या महिलेच्या घरी जाऊन तिने दागिन्यांची चोरी केली.
हा प्रकार लक्षात येताच पीडित महिलेने भक्तीला पुन्हा एकदा भेटायला बोलावलं आणि पोलिसांच्या मदतीने तिला पकडलं. तिच्या चौकशीत तिच्यावर यापूर्वी नवी मुंबईतही अशाचप्रकारचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
क्रिकेट
राजकारण
Advertisement