एक्स्प्लोर

मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर गाडीतून बंदूक दाखवणाऱ्या आरोपींना जामीन

मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर बंदूक दाखवणाऱ्या आरोपींना अटक केल्यानंतर सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये आरोपींकडे एक पिस्तुल आणि एक सिगारेट लायटर असल्याची माहिती देण्यात आली आहे.

रायगड : मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर बंदूक दाखवणाऱ्या आरोपींना अटक केल्यानंतर सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये आरोपींकडे एक पिस्तुल आणि एक सिगारेट लायटर असल्याची माहिती देण्यात आली आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर बोर घाटामध्ये प्रवास करताना गाडीतील दोन प्रवाशांनी पिस्तुल दाखवल्याची घटना समोर आली होती. यासंदर्भात खोपोली पोलीसांनी केलेल्या दोन आरोपींना अटक केली होती. दरम्यान, आज या आरोपींना खालापूर येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी सुमारे दीड तास झालेल्या सुनावणीनंतर या दोन्ही आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये, आरोपी विजयप्रकाश मिश्रा आणि विकास कांबळे यांना 15 हजार रुपयांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. यावेळी केवळ राजकीय द्वेषामुळे आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तर या आरोपींकडे एक पिस्तुल आणि एक सिगारेट लायटर आढळून आले. तर , हे दोन्ही आरोपी हे मुंबईतील सांताक्रूझ आणि मालाड येथील रहिवासी आहेत.

रिव्हॉल्वर दाखवणारे 'ते' शिवसैनिक नव्हते, शंभुराज देसाईंचा खुलासा 

नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीतून वाट काढण्यासाठी म्हणून एका कारमध्ये असणाऱ्या काही इसमांनी भर रस्त्यात बंदुकीचा धाक दाखवला. त्यांच्या कारवर शिवसेनेबाबतचा एक स्टीकर लावल्याचं दिसून आलं. ज्यानंतर ते शिवसैनिक असल्याच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. सदर प्रकरणाची माहिती मिळताच बंदुकीचा धाक दाखवणाऱ्या त्या इसमांवर तातडीनं कारवाई करण्यात आली. सदर प्रकरणी तपास होऊन दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल आणि सत्य उघड होईल अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. तर, रिव्हॉल्वर दाखवणाऱ्यांपैकी कोणी शिवसैनिक नसून त्यांना ताब्यात घेण्यात आलं असल्याही माहिती गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली. कारमधून प्रवास करणारे पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांच्याकडे असणाऱ्या रिव्हॉल्वरपैकी एक बनावट असून, दुसऱ्या रिव्हॉल्वरबाबत चौकशी सुरु आहे. दरम्यान, सदर प्रकरणामध्ये राजकीय मंडळींनी चुकीच्या पद्धतीने आरोप केल्याचंही देसाई म्हणाले.

Viral Video | वाहनासाठी वाट काढताना मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर काढली पिस्तुल, दोघे ताब्यात

सोशल मीडियावर हा व्हिडीओ एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी शेअर केला होता. ज्यानंतर व्हिडीओ अतिशय झपाट्यानं व्हायरल झाला. संबंधित यंत्रणांना याची माहिती मिळताच त्यांनी तातडीनं पावलं उचलत गुन्हा दाखल करण्यात आला. आर्म ऍक्ट 325 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून विकास गजानन कांबळे, विजय प्रकाश, सिताराम मिश्रा, राम मनोज यादव या मुंबईत राहणाऱ्या चौघांना खोपोली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

इम्तियाज जलील यांनी ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये एक कार चालक आणि त्याच्यासोबत असणारा एक व्यक्ती भर रस्त्यात, वाहनांच्या गर्दीत रिव्हॉल्वरची भीती दाखवून त्यांच्या कारसाठी वाट काढताना दिसत आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ही दृश्य असून, त्यांनी रिव्हॉल्वर दाखवणाऱ्यांच्या कारवर असणारा लोगोच सर्वकाही सांगत असल्याची बाब जलील यांनी अधोरेखित केली. राज्याचे गृहमंत्री आणि पोलीस महानिरीक्षक या घटनेची दखल घेणार का, असा प्रश्नही त्यांनी व्हिडीओ पोस्ट करत उपस्थित केला होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget