एक्स्प्लोर

बाळासाहेबांचीही सभा मोठी व्हायची, आंबेडकर-ओवेसींवर आठवलेंचा निशाणा

प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या वंचित विकास आघाडीचा विशेष परिणाम होणार नाही, याउलट त्याचा आम्हाला फायदाच होईल, असा दावा रामदास आठवले यांनी केला.

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीही पण सभा मोठी व्हायची, पण त्यांना तितकी मतं मिळायची नाही. त्याप्रमाणेच प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या बहुजन वंचित विकास आघाडीलाही मतं मिळणार नाहीत, अशी प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. ते एबीपी माझाशी बोलत होते. प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या भारिप-एमआयएमच्या बहुजन वंचित विकास आघाडीची पहिली सभा काल औरंगाबादेत पार पडली. त्या सभेला प्रचंड गर्दी होती.  त्याबाबत बोलताना आठवले म्हणाले, "प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या वंचित विकास आघाडीचा विशेष परिणाम होणार नाही, याउलट त्याचा आम्हाला फायदाच होईल. डॉ. प्रकाश आंबेडकरांना फायदा झालाच तर अकोल्यात होईल, त्याबाहेर होणार नाही" “प्रकाश आंबेडकरांसोबत नेते असतील, पण कार्यकर्ते आणि जनता आमच्याबरोबर आहे. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीही पण सभा मोठी व्हायची, पण त्यांना तितकी मतं मिळायची नाहीत, असं म्हणत आठवलेंनी कालच्या गर्दीच्या प्रश्नावर उत्तर दिलं. सगळी मुस्लिम मतं त्यांना आंबेडकर-ओवेसींना मिळतील असं काही नाही. आम्हाला पण मतं मिळतील. ओवेसी भाजपला मदत करतात हा त्यांच्यावर ठपका आहे. काँग्रेसनेही मुस्लिम समाजासाठी काही केलं नाही, त्यामुळे ही मतं आम्हाला मिळावी म्हणून आम्ही रणनीती आखू, असं आठवलेंनी नमूद केलं. बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या उंचीबाबत प्रतिक्रिया डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथील स्मारक पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या स्मारकातील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची कमी करण्यात आल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे. मात्र रामदास आठवले यांनी हा आरोप फेटाळला आहे. पुतळ्याची उंची ही चौथऱ्यापासून मोजायची असते. आनंदराज आंबेडकर यांना रस्त्यावर उतरण्याची गरज नाही. पुतळ्याची उंची वाढवणासाठी काही करता येईल, त्यासाठी प्रयत्न करु. याचं राजकारण करू नये, असं आठवले म्हणाले. इंधन दरवाढीवर नाराजी यावेळी रामदास आठवले यांनी पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतीवर नाराजी व्यक्त केली. इंधन दरवाढीमुळे सामान्य माणसाला त्रास होत आहे. इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे इतर वस्तूंच्या किंमती वाढत आहे. मी स्वतःपंतप्रधानां बोलेन,पेट्रोल, डिझेल, जीएसटीच्या कक्षेत आलं पाहिजे, अशी भूमिका एनडीएच्या बैठकीत मांडणार असल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली. संबंधित बातम्या मुस्लिम-बहुजनांनो, अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एक व्हा : ओवेसी   औरंगाबादमध्ये अनुसुचित जाती-मुस्लीम ऐक्याचा एल्गार  

महत्त्वाच्या बातम्या

Mankhurd Chawl Collapse : धोकादायक चाळ रिकामी करण्यासाठी सामान आवरायला गेले, पण पावसाने घात केला; मानखुर्दमध्ये सहा मुलं, एक महिलेसह आठ जण ढिगाऱ्याखाली गाडले
धोकादायक चाळ रिकामी करण्यासाठी सामान आवरायला गेले, पण पावसाने घात केला; मानखुर्दमध्ये सहा मुलं, एक महिलेसह आठ जण ढिगाऱ्याखाली गाडले
मानखुर्द परिसरात झोपडपट्टी कोसळली, ढिगाऱ्याखाली सापडलेल्या सहा जणांचा मृत्यू, तर काहीजण जखमी
मानखुर्द परिसरात झोपडपट्टी कोसळली, ढिगाऱ्याखाली सापडलेल्या सहा जणांचा मृत्यू, तर काहीजण जखमी
वादळी वाऱ्यासह मुसळधार पावासाचा इशारा, मुंबईसह ठाण्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन 
वादळी वाऱ्यासह मुसळधार पावासाचा इशारा, मुंबईसह ठाण्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन 
धक्कादायक! कचरा फेकण्यासाठी गेला, पाय घसरुन नदीत पडला, भिवंडीत कामवारी नदीत बुडून 10 वर्षीय मुलाचा मृत्यू
धक्कादायक! कचरा फेकण्यासाठी गेला, पाय घसरुन नदीत पडला, भिवंडीत कामवारी नदीत बुडून 10 वर्षीय मुलाचा मृत्यू

व्हिडीओ

Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report
Mumbai Rain Tree Fall | मुंबईच्या रस्त्यांवर मृत्यूच्या झाडांचं 'जाळं' | ABP Majha Special Report
Dr. Budhajirao Mulik On Majha Katta :शेतकरी राजा कधी होईल? कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mutual Fund : गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
Raigad Palghar Rain Alert : रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
Ram Mandir: राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांची पाच दिवसात 1 लाख कोटींची कमाई, भारती एअरटेलला सर्वाधिक फायदा तर एल अँड टी आणि रिलायन्सला फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचे गुंतवणकदार मालामाल, 1 लाख कोटींची कमाई, चार कंपन्यांना फटका
Ayatollah Ali Khamenei: इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
Bhiwandi Rain : भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
Nashik Crime News: कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
Embed widget