एक्स्प्लोर
मुंबईत एक्साईज ऑफिसरची बंदुकीच्या धाकाने शेजाऱ्याला धमकी
मुंबई : मुंबईतल्या अंधेरीमध्ये एक्साईज ऑफिसरनं शेजारी राहणाऱ्या युवकाला बंदुकीच्या धाकाने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप होत आहे. पीडित युवकाने या घटनेचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करुन पंतप्रधान कार्यालय आणि पोलिसांना मेन्शन केलं आहे.
प्रदीप्ता संत्रा नामक युवकाने शेजारी धमकावत असतानाचा व्हिडिओ चित्रीत केला. त्यामध्ये शेजाऱ्याकडून शिवीगाळ होत असल्याचं ऐकू येत आहे. या घटनेचा व्हिडिओ पीडित तरुणाने ट्विटरवर पोस्ट केला आणि मुंबई पोलिस, मुंबई पोलिस आयुक्त, त्याचप्रमाणे पंतप्रधान कार्यालयाला मेन्शन केलं आहे. आम्ही आमच्याच घरात बंदिस्त झाल्याचं त्याने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
पोलिसांनी तातडीनं कारवाई करत या एक्साईज ऑफिसरविरुद्ध डीएन नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मात्र त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. मात्र तरुणाने तत्परतेने मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत.
आरोपी एक्साईज ऑफिसर घरं दाखवणाऱ्या पार्ट टाईम एजंटचं कामही करतो. एक फ्लॅट दाखवण्याच्या कारणावरुन त्यानं या तरुणाला मारहाण केल्याचा आरोप आहे.
(ट्वीट केलेल्या व्हिडिओमधील तपशील आक्षेपार्ह असल्यामुळे मूळ ट्वीट बातमीत पोस्ट केलेला नाही)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement