एक्स्प्लोर

'मी गोपीनाथ मुंडे बोलतोय, तुम्ही उदयनराजेंना अटक केलीय का?'

उदयनराजे भोसले यांना झालेली अटक आणि सुटका चांगलीच गाजली. मात्र उदयनराजेंना 1999 मध्येही अटक झाली होती. त्यावेळी त्यांना खुनाच्या आरोपात अटक करण्यात आली होती. त्यावेळी सुरेश खोपडे या आयपीएस अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली होती. त्यावेळी नेमकं काय घडलं होतं, हे स्वत: खोपडे यांनी सांगितलं आहे.

मुंबई: साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांना तीन दिवसांपूर्वीच अटक आणि सुटका झाली.  सातारा जिल्हा सत्र न्यायालयाकडून उदयनराजेंना जामीन मंजूर करण्यात आला. मात्र यानिमित्ताने 1999 साली उदयनराजेंना अटक करणारे तत्कालीन आयपीएस अधिकारी  सुरेश खोपडे यांनी काही आठवणी शेअर केल्या आहेत. सुरेश खोपडे यांनी फेसबुक पोस्ट लिहून, 1999 मध्येही उदयनराजेंना अटक झाल्यानंतर, त्यावेळीही कशी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता, याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्यावेळी उदयनराजेंना अटक करु नये, असा फोन तत्कालीन गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी फोन केल्याचा उल्लेखही खोपडे यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे.  सुरेश खोपडे यांची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी उदयन राजेंची अटक. खा.श्री उदयन राजेंना अटक व सुटका हि बातमी वाचली न पोलीस अधीक्षक असतानाची मला ती सातारा मधील पहाट आठवली. 11 सप्टेंबर 1999 रोजी विधानसभा निवडणुकीच्या मतदाना दिवशी देशभर खळबळ उडवून देणारी घटना घडली ...... ती घटना माझे पुस्तक "नवी दिशा -पोलीस प्रशासनाची "(२००३) मध्ये सविस्तरपणे प्रकाशित झालेली आहे .तिचा आशय पुढील प्रमाणे ---त्या पहाटे एक फिर्याद माझ्या हातात देन्यात आली .होती नव्हती ती झोप उडाली .नगरसेवक शरद लेवे यांचा खून झाल्याचे व युती सरकार मधील एक राज्य मंत्री व छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज श्री उदयन राजे हे त्यात प्रमुख आरोपी दाखवले होते .एवढी मुद्देसूद ,संक्षिप्त,व परिपूर्ण फिर्याद मी उभ्या नोकरीत पहिली नाही.नंतर समजले की ती 11 वकिलांनी एकत्र बसून बनवली होती . त्यानंतर बातमी मिळाली की श्री अभयसिंह राजे (श्री उदयन राजेंचे चुलते ) यांचे नेतृत्त्वाखाली हजारेक लोकांचा जमाव जमला असून आरोपी उदयन राजेंना अटक केली नाही तर सातारा पेटेल अशी धमकी दिली जात आहे .त्याच वेळी दुसरी बातमी धडकली कि राणी साहेब(श्री उदयन राजेंची आई ) यांचे सोबत मोठा जमाव जमलाय व राजेंना अटक केली तर शहर पेटेल अशा घोषणा देतोय .प्रचंड तणाव वाढला .तीन तासानंतर मतदान सुरु होणार होते . मोठीच गँभिर परिस्थिती होती . मग मी खुर्चीवर डोळे मिटून बसलो .शहर पटलेलं,लाठीमार, अश्रूधुर, गोळीबार... मग दंगलीची न्यायालयीन चौकशी।... त्या मध्ये मी पिंजऱ्यात उभा.तिथं पोलिसदल,सातारा पोलिस व माझा बचाव करतोय ...हे डोळ्या पुढून सरकले ,आणि उत्तर सापडले!!अटक केली तरी दंगल होणार नाही केली तरी दंगल होणार .अटक करून दंगल झाली तर कायद्याचे पालन केल्याचे श्रेय मिळणार होते नाही तर कर्तव्य च्युतीचा ठपका आला असता. Dy s p मुत्याल, इन्स्पेक्टर सुर्वेना सूचना दिल्या .उदयन राजे हजर झाले ."why have u called me here ?"आल्या बरोबर त्यांनी प्रश्न केला .मी फिर्याद वाचून दाखवली."हे सर्व साफ खोटं आहे एसपी साहेब.तुम्ही नवीन आहात .हे कुभांड माझे चुलते अभयसिंह राजेंनी रचलेले आहे.आमचा जुना वाद चालू आहे ...वगैरे."आम्ही गोळा केलेला पुरावा त्यांना सांगितला. झुंजूमुंजू होई पर्यंत वाद चालला ."मी निर्दोष आहे.मी निघालो"असे ते म्हणाले. मग मी बजावले "Mr Udayan Raje you cannot go, now you are under arrest ! त्यांना क्राईम ब्रँच मध्ये ठेवणात आले .राणी साहेब मोठा मोर्चा घेऊन आल्या.राणी साहेब फार कडक व आक्रमक स्वभावाच्या आहेत अशी माहिती पुरविण्यात आली होती .राणी साहेबांची सर्व बाजू ऐकून घेतली .आमचे लोक बघून घेतील ...वगैर असा त्यांचा आक्रमक पवित्रा होता.मीही माझी बाजू सांगितली. तुमच्या लोकांनी गडबड केली तर ते गुन्हे तुम्ही व तुमच्या मुलाने घडविले असे आरोप होतील.तुमच्या अडचणी वाढतील तुमच्या लोकांना घरी जाऊन शांत रहायला सांगा .मधेच फोन वाजत होते .प्रदिर्घ चर्चेनंतर राणी साहेबा मधील एक आई जागृत झाल्याचे मला जाणवले. पुन्हा फोन खनानला " मी महाराष्ट्राचा गृह मंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलतोय "पलीकडून आवाज आला."गुड मॉर्निंग सर "मी. खोपडे तुम्ही उदयन राजेंना अटक केली हे खरे आहे का? " . "होय सर" मी . "का? " फिर्यादी मध्ये त्यांचे नाव आहे त्या शिवाय ........ "उद्या फिर्यादी मध्ये माझे नाव टाकले तर मलाही अटक करणार का? " शिवाय तीन प्रत्यक्ष साक्षीदार आहेत,हिंसक जमावा मध्ये ते होते अशी आमची खात्री पटलेली आहे .........उद्या माझ्या विरुद्ध खोटे साक्षीदार उभे केले तर मलाही अटक करणार का? यू आर अल्व्हेज अगेन्स्ट मी अँड माय पार्टी " (नांदेड एसपी असताना आमची वादावादी झाली होती.मुंडे साहेब हे खरे तर एक उमदा व मोठ्या मनाचा माणूस होते पण अधिकाऱ्यांशी वागण्याची त्यांची एक स्टाईल होती ) खोपडे मला माहित आहे तुम्ही बारामतीचे आहात व राष्ट्रवादीचे बगलबच्चे आहात" पलीकडून फोन आपटल्याचा आवाज आला .मीडिया,डिजिपी ऑफिस,राजकारणी यांचेफोन,राणी साहेब इतरांशी चर्चा चालू असता एक स्पेशल ड्युटी शिपाई कानाजवळ कुजबुजला "सर लोकांच्या मध्ये चर्चा आहे की राजाला दोन खून माफ असतात इथे तर एकच खून झालाय ! एव्हाना मतदान सुरु झाले होते .शरद लेवेंची प्रेत यात्रा दोन हजारावर लोकांसह तणावात सुरु झाली.स्मशानात जाण्याऐवजी प्रेत माझ्या कार्यालयाच्या दारात ठेवले.अभयसिह राजेंनी जमावा पुढे भाषण केले की "मुख्य आरोपीला अद्याप अटक केलेली नाही व केली असल्यास आरोपीला बेड्या घातलेल्या अवस्थेत जमावाला दाखवा त्या शिवाय आम्ही प्रेत हलविणार नाही !" मग मी जमाव पुढे भाषण केले "मुख्य आरोपीला आम्ही अटक केलेली आहे.पाच जणांचे शिष्टमंडल येऊन खात्री करू शकते.पण बेड्या घातलेल्या अवस्थेत आरोपीला दाखविण्याची प्रथा नाही व मी दाखवणार नाही " त्यावर अभयसिंह राजेनीं भाषण केले "बेड्या घातलेल्या अवस्थेत आरोपी दाखविल्या शिवाय आम्ही प्रेत हलविणार नाही .सुरेश खोपडे हे एसपी बीजेपी व शिवसेना धार्जिणे आहेत .आमचे सरकार आल्यावर त्यांच्याकडे बघून घेऊ !" मतदान पार पडले .एक मंत्री व छत्रपतींचे वारसांना अटक करून कोणताही अनुचित प्रकार घडला नाही हे पाहून युपी व बिहारच्या निवडणूक निरीक्षकांनी मला मिठी मारली .पण रात्रीच्या बातम्यात निवडणूक आयोगान कलेक्टर सातारचे अभिनंदन केले . युतीचा सरकार जाऊन आघाडीचे सरकार आले .आमच्या बारामतीचे श्री अजित पवार सातारचे पालक मंत्री बनले.सुरेश खोपडे हा शिवसेना बीजेपी चा माणूस आहे असे ठरवून निवडणुकी नंतर 3 महिन्यात व एकूण नोकरी 7 महिन्यात माझी सातारा मधून उचल बांगडी झाली .बदली का केली याचे उत्तर ना सरकाने दिले ना इलेक्शन कमिशनने ! सातारा पोलीस दलाने निरोप दिला . त्यातील दोन शेरे आजही लक्षात आहेत .एकजण म्हटला "साहेब दीड दिवस तुम्ही एकाच खुर्चीवर बसून होता पण तुम्ही एकदाही कुणावर रागावला नाही . दुसरा म्हणाला "एवढं काम केल्यावर तुमची बदली व्हायला नको होती . तरी पण एस पी ला पाठीचा कणा असतो हे तुम्ही दाखवून दिलेत .निवृत्ती वेतना इतकेच ते शेरे महत्वाचे वाटतात !
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget