एक्स्प्लोर
एल्फिन्स्टन चेंगराचेंगरी : मृतांचे कुटुंबीय, जखमींना रेल्वेची मदत
एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी आठ लाख, गंभीर जखमींना सात लाख तर किरकोळ जखमींना दोन लाख रुपये रेल्वेतर्फे देण्यात आले.
मुंबई : मुंबईतील एल्फिन्स्टन रोड स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीतील पीडितांना अखेर रेल्वेकडून आर्थिक मदत मिळाली आहे.
मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी आठ लाख, गंभीर जखमींना सात लाख तर किरकोळ जखमींना दोन लाख रुपये देण्यात आले.
29 ऑगस्टला एल्फिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरीत 23 जणांचा बळी गेला होता. त्यानंतर एल्फिन्स्टन पुलाचं बांधकाम लष्कराकडे सोपवण्यात आलं. लष्कराकडून तीन महिन्यांमध्ये हा पूल बांधून प्रवाशांसाठी सुरु करण्यात आला.
साडेसहा महिन्यांनंतर रेल्वेकडून मदतीचा हात देण्यात आला. 17 मृत आणि 19 जखमी अशा 36 पीडितांना ही आर्थिक मदत करण्यात आली.
विशेष केस म्हणून एल्फिन्स्टन दुर्घटनेची सुनावणी सहा महिन्यांत पूर्ण करण्यात आली. मोदी सरकारकडून या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना चार ऐवजी आठ लाख, गंभीर जखमींना चार ऐवजी सात लाख तर किरकोळ जखमींना दोन लाख रुपये देण्यात आले आहेत.
संबंधित बातम्या :
एल्फिन्स्टन दुर्घटनेतील मृतांच्या कपाळावर नंबर टाकणं चुकीचं : हायकोर्ट
एलफिन्स्टन चेंगराचेंगरी: पोलिसांनी कारण शोधलं, निष्कर्ष काढला!
एलफिन्स्टन चेंगराचेंगरी म्हणजे घातपात, जनहित याचिकेत दावा
एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : मृतांचा आकडा 23 वर
एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : महिलेच्या मृतदेहावरील दागिने ओरबाडले
एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : 61 वर्षीय आलेक्स कोरीयांचा गुदमरुन मृत्यू
एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : ... तर ही दुर्घटना टाळता आली असती!
चेंगराचेंगरीत मुलगा गमावलेल्या कुटुंबाच्या मदतीसाठी स्तुत्य उपक्रम
मुंबईकरांनो, मयुरेशसाठी 'इथला' एक तरी वडा-पाव विकत घ्या!
एलफिन्स्टन दुर्घटना : हळदणकर कुटुंबियांना शिवसेना आमदाराकडून मदत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement