एक्स्प्लोर

माझी पण ट्रान्सफर करुन टाका, खडसेंकडून सरकारची फिरकी

सिव्हिल हॉस्पिटल वैद्यकीय शिक्षणाकडे ट्रान्सफर केलं असं सांगतात, आता आम्हाला पण कुठेतरी ट्रान्सफर करा म्हणजे झालं, असं एकनाथ खडसे विधानसभेत म्हणाले.

मुंबई : माझी पण ट्रान्सफर करुन टाका, असं म्हणत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा सरकारची फिरकी घेतली. विधानसभेत आरोग्य विभागाच्या पुरवण्या मागण्यांवरील चर्चेदरम्यान एकनाथ खडसेंनी सरकारवर चौफेर फटकेबाजी केली. पक्षाला घरचा आहेर देण्याची परंपरा खडसेंनी कायम ठेवली. सिव्हिल हॉस्पिटल वैद्यकीय शिक्षणाकडे ट्रान्सफर केलं असं सांगतात, आता आम्हाला पण कुठेतरी ट्रान्सफर करा म्हणजे झालं, असं एकनाथ खडसे म्हणाले. गिरीश महाजन यांना टोला आरोग्य सेवा द्यायची नसेल तर हॉस्पिटलला कुलूप ठोका. समारंभपूर्वक बंद करण्याचा कार्यक्रम करु. नुसती लाखांची आरोग्य शिबिरं घायची आणि उपचारासाठी या मुंबईला असं करुन चालत नाही, असं म्हणत एकनाथ खडसे यांचा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांना टोला मारला. काही दिवसांपूर्वी गिरीश महाजन यांनी विक्रमी आरोग्य शिबीर घेतलं होतं. मला सरकारकडून आजच्या आज उत्तर हवं, अशी मागणी एकनाथ खडसेंनी केली. जिल्हा ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने जनता त्रस्त आहे. MBBS नसतील, तर BAMS चे डॉक्टर्स द्या, अशी मागणी खडसेंनी केली. नातेवाईक जेव्हा एखाद्याचा मृतदेह आमदारांच्या दारावर आणून ठेवतात, तेव्हा आम्ही काय करायचं? असा प्रश्न खडसेंनी उपस्थित केला. आरोग्य मंत्र्यांशी फोनवर चर्चा केली, तर डॉक्टर पाठवतो म्हणतात, त्याला लागतात चार तास. तोपर्यंत 10 जणांचे 100 होतात. हातात दगड घेऊन असतात, आम्ही काय करायचं? असा प्रश्नही खडसेंनी विचारला. डॉक्टर नाहीत, टेक्निशियन नाही, मग नर्सेसला पगार कशाला द्यायचा? असा सवाल खडसेंनी विचारला. जळगाव मेडिकल कॉलेजला एक रुपयाची तरतूद नाही. गेल्या चार दिवसात झालेले दोन मृत्यू डॉक्टरांच्या अभावी झाल्याचा दावाही खडसेंनी केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election 2024 : शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
Kailas Patil : कैलास पाटील उद्धव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
कैलास पाटील उद्धव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :14 नोव्हेंबर  2024 : ABP MAJHAShyam Rajput Nashik : अहिराणी भाषेत राजपूत यांचं मतदारांना आवाहन; सीमा हिरेंसाठी मैदानातAjit Pawar Modi Sabha :  मुंबईत मोदींची सभा, अजित पवारांची पाठ?ABP Majha Headlines :  9 AM : 14 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election 2024 : शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
Kailas Patil : कैलास पाटील उद्धव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
कैलास पाटील उद्धव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
Dhananjay Munde: पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
MNS Sandeep Deshpande: मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
Pankaja Munde: माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
Embed widget