एक्स्प्लोर
काँग्रेस नेते बाबा सिद्दीकींच्या घरावर ईडीचे छापे

मुंबई: काँग्रेस नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या मुंबईतील विविध ठिकाणांवर ईडीने छापेमारी केली आहे. वांद्रे येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत 100 कोटींच्या घोटाळ्यात बाबा सिद्दीकी आणि त्यांच्या एक सहकारी बिल्डर रफीक मकबूल कुरेशी यांचा हात असल्याचा आरोप आहे. त्यावरुनच ही छापेमारी झाली आहे. बाबा सिद्दीकी आणि रफीक कुरेशी यांच्या मिळून 5 ठिकाणांवर ही छापेमारी करण्यात आली आहे. वांद्रे येथील झोपडपट्टी विकासाच्या नावाखाली सुमारे 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप, बाबा सिद्दीकी आणि रफीक कुरेश यांच्यावर आहे. बनावट दस्तऐवज बनवून पैसे लाटल्याचा आरोप आहे. नियमानुसार वांद्रे परिसरातील झोपडपट्टी विकास करायचा असेल, तर त्यातील एक भाग झोपडपट्टीधारकांसाठी ठेवावा लागतो. मात्र बनावट कागदपत्रं बनवून हा घोटाळा केल्याचा ठपका बाबा सिद्दीकी आणि रफीक कुरेशींवर आहे. या छापेमारी दरम्यान बिल्डर रफीक कुरेशी यांच्या कंपनीने बाबा सिद्दीकींच्या कंपनीला पैसे दिल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे बाबा सिद्दीकींच्या अडचणी वाढल्या आहेत. कोण आहेत बाबा सिद्दीकी? बाबा सिद्दीकी हे काँग्रेसचे माजी आमदार आहेत. ते वांद्रे पश्चिम मतदारसंघातून तीनवेळा निवडून आले होते. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी त्यांचा जवळपास 26 हजार मतांनी पराभव केला. बाबा सिद्दीकी हे इफ्तार पार्टी आयोजनासाठी प्रसिद्ध आहेत. बॉलिवूडमंडळी विशेषत: सलमान खान आणि शाहरुख खान यांना इफ्तार पार्टीच्या निमित्ताने एकत्र आणण्याचं काम बाबा सिद्दीकी यांनी अनेकवेळा केलं आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























