कर्जबुडव्या मल्ल्याला फरार घोषित करा : ईडी
मद्यसम्राट विजय मल्ल्याला फ्युगिटीव्ह इकॉनॉमिक ऑफेन्डर ऑर्डिनन्सनुसार (फरारी आर्थिक गुन्हेगार अध्यादेश) फरार घोषित करावं, अशी मागणी अमंलबजावणी संचालनालयानं (ईडी) केली आहे. ईडीनं विशेष पीएमएलए कोर्टात याबाबत याचिका दाखल केली आहे.
मुंबई : भारतातील एकूण १७ बँकांना ९ हजार कोटींचा चुना लावून फरार झालेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्याला फ्युगिटीव्ह इकॉनॉमिक ऑफेन्डर ऑर्डिनन्सनुसार (फरारी आर्थिक गुन्हेगार अध्यादेश) फरार घोषित करावं, अशी मागणी अमंलबजावणी संचालनालयानं (ईडी) केली आहे. ईडीनं विशेष पीएमएलए कोर्टात याबाबत याचिका दाखल केली आहे. ईडीची मागणी मान्य झाल्यास मल्ल्याची देश आणि विदेशातील मालमत्ता विकून बँकांची थकबाकी वसूल करता येणार आहे.
कोर्टानं मल्लाला फरार घोषित केल्यास कर्जबुडव्यांबाबत काढलेल्या नव्या अध्यादेशानुसार फरार घोषित करण्यात आलेला मल्ल्या पहिला आरोपी असेल. कोर्ट मल्ल्याला आपली बाजू मांडण्याची संधी देईल. मात्र योग्य प्रतिसाद न दिल्यास त्याला फरारी घोषित करण्यात येईल. त्यामुळे कोर्टाच्या निर्णयाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे.
कोट्यवधीचं कर्ज बुडवलं किंगफिशर प्रकरणात विजय मल्ल्यावर कोट्यवधींचं कर्ज आहे. बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याचा मल्ल्यावर आरोप आहे. मल्ल्याकडून एसबीआय बँकेला 6 हजार 963 कोटींची किंमत येणं अपेक्षित आहे. यापूर्वी आयडीबीआय बँकेचं कर्ज चुकवण्यासाठी ईडीने 1411 कोटींची संपत्ती जप्त केली होती.
विजय मल्ल्यावर कोणत्या बँकेचं किती कर्ज?
स्टेट बँक ऑफ इंडिया – 1600 कोटी
पंजाब नॅशनल बँक – 800 कोटी
आयडीबीआय बँक – 800 कोटी
बँक ऑफ इंडिया – 650 कोटी
बँक ऑफ बड़ोदा – 550 कोटी
यूनायटेड बँक ऑफ इंडिया – 430 कोटी
सेंट्रल बँक ऑफ इंडिया – 410 कोटी
यूको बँक – 320 कोटी
कॉर्पोरेशन बँक ऑफ इंडिया – 310 कोटी
सेंट्रल बँक ऑफ म्हैसूर – 150 कोटी
इंडियन ओव्हरसीज़ बँक – 140 कोटी
फेडरल बँक – 90 कोटी
पंजाब सिंध बँक – 60 कोटी
अॅक्सिस बँक – 50 कोटी