एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

ED Raids : फेअर प्ले प्रकरणी ईडीचे मुंबई पुण्यात छापे, कोट्यवधींची मालमत्ता जप्त, विदेशी बेनामी कंपन्यांचं कनेक्शन समोर

ED Raids : ईडीनं मुंबई आणि पुण्यात 19 ठिकाणी फेअर प्ले प्रकरणात छापेमारी केली आहे. या प्रकरणात 8 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मुंबई : ईडीने (ED) फेअर प्ले (Fair Play) प्रकरणी 12 जून रोजी मुंबई आणि पुण्यातील 19 ठिकाणी छापे टाकले आहेत.  फेअर प्ले ॲपने आयपीएल क्रिकेट सामन्याचे बेकायदेशीरपणे प्रसारण केल्याचा आरोप आहे. तसेच नुकत्याच झालेल्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दरम्यान  या ॲपचा बेटींगसाठी वापर केल्याचे आढळून आले असल्यानं ईडीनं ही कारवाई केली.  झडतीदरम्यान ईडीने,बँक फंड, डीमॅट खातंसह लक्झरी घड्याळ अशी एकूण 8 कोटीची मालमत्ता जप्त केली आहे, अशी माहिती ईडीच्या मुंबई विभागीय कार्यालयाकडून देण्यात आली आहे. या प्रकरणात चौकशी आणि तपास सुरु असल्याची माहिती ईडीकडन देण्यात आली आहे. 

वायकॉम 18 मीडिया प्रायवेट लिमिटेडनं नोडल सायबर पोलीस, मुंबई यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. आयपीसी 1860, माहित तंत्रज्ञान कायदा,2000 आणि कॉपीराईट कायदा 1957  नुसार फेअर प्ले स्पोर्ट एलएलसी आणि इतरांविरोधात 100 कोटी रुपयांच्या नुकसान प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवरुन ईडीनं कारवाई केली आहे.  

ईडीने तपासा दरम्यान सर्व बँक खाती गोठवली असून ईडीला अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणेही सापडली आहेत.फेअर प्लेने दुबई आणि कुराकाओ येथील परदेशी संस्थांद्वारे सेलिब्रिटींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतीय एजन्सींसोबत करार केले असल्याचेही उघड झाले.

 फेअर प्लेने गोळा केलेला निधी अनेक बोगस आणि बेनामी बँक खात्यांमधून घेण्यात आला होता असा आरोप आहे. ईडीनं केलेल्या तपासात आढळून आलं की यामध्ये शेल कंपन्यांच्या कॉम्प्लेक्स वेब ऑफ बँक अकाऊंटचा वापर करण्यात आला. 

ईडीनं केलेल्या तपासात आढळून आलं की परदेशातील शेल कंपन्यांनी पैसा पाठवला होता. यामध्ये हाँगकॉग, चीन आणि दुबईतील बेनामी कंपन्यांचा समावेश होता. या प्रकरणात बेनामी आस्थापनांच्या 400 हून अधिक खात्यांचा वापर करण्यात आल्याचं  समोर आलं आहे. फेअर प्लेनं नेमक्या कशा प्रकारे पैसा गोळा केला याची चौकशी सुरु असल्याचं ईडीकडून सांगण्यात आलं आहे. 

आयपीएलचं बेकायदा प्रसारण, लोकसभा निवडणुकीदरम्यान बेटिंग

आयपीएलच्या सामन्यांच्या मोबाईल आणि वेबसाईटवरील प्रसारणाचे हक्क जिओ सिनेमाकडे आहेत. मात्र, फेअर प्लेनं बेकायदेशीरपणे त्या सामन्यांचं प्रसारण केल्याची तक्रार सायबर पोलिसांकडे देण्यात आली होती. याशिवाय या फेअरप्लेवरुन लोकसभा निवडणुकीच्या निकाला दरम्यान ऑनलाईन बेटींग करण्यात आल्याचं समोर आलं आहे. 

दरम्यान, फेअर प्ले प्रकरणात ईडीकडून अधिक चौकशी आणि तपास सुरु असल्याचं सांगण्यात आलं आहे.  

संबंधित बातम्या : 

Mahadev App : महादेव बेटिंग अॅप प्रकरणात ईडीला मोठे यश, रवी उप्पलला दुबईतून भारतात आणले जाणार

 प्रफुल्ल पटेलांना मंत्री व्हायचंय म्हणूनच मिरचीची प्रॉपर्टी सोडवली, संजय राऊतांचा हल्लाबोल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Maharashtra Exit Poll 2024 | मुंबईत बिग फाईट, मविआला 18-19 तर महायुतीला 17-18 जागाMaharashtra Politics Rada | नेत्यांचे 'राडे' राजकीय संस्कृतीचे 'धिंडवडे' Special ReportBaramati Vidhan Sabha | विधानसभा निवडणुकीसाठी बारामतीत राजकारण आणि भावनांचा खेळ Special ReportDevendra Fadnavis : जेव्हा मतदानाचा टक्का वाढतो तेव्हा भाजपला फायदा होतो:फडणवीस ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Embed widget