एक्स्प्लोर
बदलापूरमध्ये मद्यपी वाहनचालकाची 7 गाड्यांना धडक, 2 पादचारी जखमी
बदलापूर: मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगात गाडी चालवणाऱ्या वाहनचालकानं बदलापूरमध्ये तब्बल सात गाड्यांना धडक दिल्याची घटना घडली आहे. काल (मंगळवार) रात्री 9 ते 10च्या दरम्यान हा अपघात झाला. या गाडीच्या धडकेत 2 पादचारीही जखमी झाले आहेत.
बदलापूर पश्चिमेच्या मार्केट परिसरात ही घटना घडली. नुकसान झालेल्या वाहनचालकांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी मद्यपी वाहनचालकाला अटक केली आहे.
फर्नांडीस असं या वाहनचालकाचं नाव असून तो बदलापूरचाच रहिवासी असल्याची माहिती समजते आहे. मंगळवारी रात्री १०च्या सुमारास तो त्याची वॅगन आर कार घेऊन मध्यधुंद अवस्थेत बदलापूर रेल्वे स्थानक परिसरातून जात होता. यावेळी त्याचं गाडीवरील नियंत्रण अचानक सुटलं आणि त्याने समोरच्या एका रिक्षाला जोरदार धडक दिली.
यानंतर पुढे जाऊन त्याने अशाच प्रकारे तब्बल ७ वाहनांना धडक दिली. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत याला ताब्यात घेतलं. सध्या त्याला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement