सुशांतला ड्रग्जचं व्यसन कोणी लावलं? एनसीबीच्या तपासात माहिती समोर
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज घेत असल्याचा खुलासा काही दिवसांपूर्वी झाला होता. आता सुशांतला ड्रग्जची सवय कशी लागली होती, यामागे कोणाचा हात होता, याचा खुलासा एनसीबीने केला आहे.
मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)ने मंगळवारी रात्री उशीरा सुशांत सिंह राजपूतचा माजी असिस्टंट डायरेक्टर ऋषिकेश पवारला गांजा सप्लाय करण्याच्या आरोपात अटक केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 30 लोकांना अटक करण्यात आली आहे. याच प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि शौविक चक्रवर्तीलाही अटक करण्यात आली होती.
एनसीबीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2018 ते 2019 मध्ये ऋषिकेश पवार सुशांतसोबत त्याच्या ड्रिम प्रोजेक्टवर असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत होता. परंतु, सुशांतने ऋषिकेशच्या चुकीच्या वागणूकीमुळे त्याला कामावरुन काढून टाकलं होतं. एनसीबीच्या एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "ऋषिकेश पवारच सुशांतला गांजाचा सप्लाय करत होता आणि त्याला गांजाची सवय लावण्यातही ऋषिकेश पवारचाच मोठा हात होता."
लॉकडाऊन दरम्यान, सुशांतला गांजा घेण्यासाठी ऋषिकेश पवारचीच मदत घ्यावी लागली होती. परंतु, सुशांतने त्याला कामावरुन काढून टाकलं होतं. त्यामुळे सुशांतने त्याच्याकडे थेट मदत न मागता आपल्या नोकराची मदत घेतली होती. सुशांतच्या सांगण्यावरुन त्याचा नोकर दीपेश सावंत, ऋषिकेश पवारशी संपर्क साधत होता आणि त्यानंतर पवार दीपेशला गांजा आणून देत होता.
ऋषिकेश पवारला एनसीबीने बुधवारी किला कोर्टात सादर केलं होतं. जिथे कोर्टात त्याला 2 दिवस एनसीबीच्या कोठडीत पाठवण्यात आलं होतं. एनसीबी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिक तपासासाठी एनसीबीने ऋषिकेश पवारचा लॅपटॉप जप्त केला होता. या लॅपटॉपची तपासणी करण्यात आली होती. या लॅपटॉपमध्ये एनसीबीला ड्रग्ज संबंधित अनेक फोटोही मिळाले आहेत.
दरम्यान, या प्रकरणात एनसीबी आता साहिस्ता फर्निचरवाला, तिची बहिण राहिला फर्निचरवाला आणि ब्रिटीश नागरिक करण सजनानी यांचीही चौकशी करत आहे. या प्रकरणाशी या तिघांचाही संबंध असल्याचा एनसीबीला संशय आहे. दरम्यान, एनसीबीकडून याप्रकरणी अद्याप तपास सुरु आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Sushant Singh Death Case: सीबीआयकडून तपासाचा अहवाल मागण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, याचिका रद्द