एक्स्प्लोर
Advertisement
शिवसेनेने भाजपच्या अंतर्गत विषयांमध्ये लुडबूड करु नये: भाजप
मुंबई : महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन चौकशीला सामोरं जावं, असा सल्ला देणाऱ्या शिवसेनेला भाजपने खरमरित उत्तर दिलं आहे. शिवसेनेने भाजपच्या अंतर्गत विषयांमध्ये लुडबूड करु नये, असा सल्ला भाजपने शिवसेनेला दिला आहे.
“एकनाथ खडसेंबाबत भाजपने काय करावं, हे शिवसनेने सांगू नये. भाजपच्या अंतर्गत विषयांत शिवसेनेने लुडबूड करु नये. आमचं नेतृत्त्व निर्णय घ्यायला सक्षम आहे.”, असे भाजपने शिवसेनेला उत्तर दिलं आहे.
एकनाथ खडसेंनी त्यांच्यावर असलेल्या आरोपांची चौकशी होईपर्यंत पद सोडावं, निर्दोषत्व सिद्ध करुन सन्मानाने मंत्रिमंडळात यावं, ही महाराष्ट्राची परंपरा आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यानंतर भाजपने संजय राऊत यांच्या वक्तव्यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
शिवाय, खडसे यांच्याविरोधात लाचखोरी, जमीन लाटल्याच्या प्रकरणासह इतर गंभीर आरोप आहेत. अशावेळी पारदर्शक कारभाराचा हवाला देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी तातडीनं त्यांचा राजीनामा घ्यावा असेही संजय राऊत म्हणाले होते.
सेनेने त्यांच्या पक्षाचं पाहावं, आमचं आम्ही पाहू : दानवे
रावसाहेब दानवेंनीही खडसे प्रकरणावरुन शिवसेनेवर घणाघात केला आहे. "खडसे प्रकरण आमची पक्षांतर्गत बाब असून, दुसऱ्यांनी यात लुडबूड करु नये." असे दानवे म्हणाले. शिवाय, "शिवसेनेने त्यांच्या पक्षाचं पाहावं, आम्ही आमच्या पक्षाचं पाहू." अशी टीकाही रावसाहेब दानवेंनी केली आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या मागणीनंतर एकनाथ खडसे यांनी याप्रकरणी काहीही बोलण्यास नकार दिला होता. मला काहीही बोलायचं नाही, पक्षाचे अध्यक्ष बोलतील, असं खडसे म्हणाले होते.
खडसेंवरील आरोप :
- कथित पीए गजानन पाटीलकडून खडसेंच्या नावे 30 कोटी लाच मागितल्याचा आरोप, गजानन पाटीलला अटक
- जावयाची लिमोझिन कार बेकायदा असल्याचा आरोप
- दाऊदच्या कॉलर लिस्टमध्ये खडसेंचा नंबर असल्याचा हॅकरचा दावा
- भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी वाद
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement