एक्स्प्लोर
एकाला 95, तर दुसऱ्याला 87 टक्के, डोंबिवलीतील अंध विद्यार्थ्यांचं यश
डोंबिवलीतून दोन विद्यार्थ्यांचं एक असं उदाहरण समोर आलं आहे, ज्यांनी शारीरिक परिस्थितीवर मात करत यशाला गवसणी घातली.

डोंबिवलीत : दहावीच्या परीक्षेत हलाखीच्या परिस्थितीवर मात करुन घवघवीत यश मिळवलेली अनेक उदाहरणं समोर आली. मात्र डोंबिवलीतून दोन विद्यार्थ्यांचं एक असं उदाहरण समोर आलं आहे, ज्यांनी शारीरिक परिस्थितीवर मात करत यशाला गवसणी घातली. सिद्धांत सावंत आणि आर्यन जोशी हे दोघेही डोंबिवलीच्या आयईएस पाटकर शाळेचे विद्यार्थी असून ते अंध आहेत. यंदाच्या वर्षी दोघांनीही दहावीची परीक्षा दिली आणि त्यात त्यांना घवघवीत यश मिळालं. सिद्धांतला या परीक्षेत 95 टक्के, तर आर्यनला 87 टक्के मिळाले आहेत. विशेष म्हणजे सिद्धांत हा नॅशनल स्वीमर, संगीतकार आणि कलाकार आहे. राष्ट्रपती पदक विजेता असलेल्या सिद्धांतच्या विक्रमाची लिम्का बुकनेही नोंद घेतली आहे. दुसरीकडे आर्यनसुद्धा जागतिक पातळीचा बुद्धीबळ खेळाडू आणि स्वीमर आहे. यंदा भारताच्या बुद्धिबळ संघातही त्याची निवड झालेली आहे. या दोघांच्याही उत्तुंग यशाने डोंबिवलीतून त्यांचं मोठं कौतुक होत आहे. संबंधित बातम्या : आईने चहा पावडर विकून शिकवलं, पोरीने दहावीत 99.20 टक्के मिळवले! मृत्यूवर मात करुन घवघवीत यश, दहावीत 97 टक्के गुण!
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण























