एक्स्प्लोर
Advertisement
राणेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा आणि नितेश राणेंचा व्हॉट्सअॅप डीपी!
एकीकडे नारायण राणे भाजप प्रवेश करणार अशी चर्चा सुरु असताना दुसरीकडे त्याच वेळी नितेश राणेंनी आपला व्हॉटअअॅप डीपी बदलल्यानं आता नवी चर्चा सुरु झाली आहे.
मुंबई : काँग्रेस नेते नारायण राणे हे 27 ऑगस्टला भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा सुरु असताना दुसरीकडे आता नितेश राणेही काँग्रेसला रामराम करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. नारायण राणे यांचा भाजप प्रवेश 27 ऑगस्टला ठरला असून आता फक्त औपचारिकता बाकी असल्याचं सुत्रांकडून समजतं आहे.
एकीकडे राणे भाजपमध्ये जाणार या चर्चेला उधाण आलेलं असताना दुसरीकडे त्यांचा पुत्र आणि काँग्रेस आमदार नितेश राणे यांनीही आपला व्हॉट्सअॅप डीपी बदलला आहे. 'नारायण राणे हाच आमचा पक्ष' असा आशय असलेला नारायण राणेंचा एक फोटो असून त्यामागे फक्त भगव्या रंगाची एक छटाही आहे. त्यामुळे नारायण राणे ज्या पक्षात जाणार तिथेच नितेश राणेही जाणार हे स्पष्टच होतं
राणेंच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा असताना दुसरीकडे नितेश राणेंनी ऐनवेळी बदलेल्या व्हॉटसअप डीपीमुळे बरंचसं चित्र आता स्पष्ट होऊ लागलं आहे. मात्र, असं असलं तरीही राणे भाजपात जाणार याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा कुणाकडूनही करण्यात आलेली नाही.
नितीश राणेंनी फक्त आपला व्हॉट्सअप डीपीच बदलेला नाही तर आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर देखील हाच फोटो ट्वीट केला आहे. त्यामुळे चर्चेला आणखी ऊत आला आहे.
— nitesh rane (@NiteshNRane) August 19, 2017दरम्यान, राणे भाजपामध्ये गेल्यास त्यांच्यासोबत कोण-कोण जाणार याचीही चर्चा आता दबक्या आवाजात सुरु झाली आहे.
नारायण राणेंचा भाजप प्रवेश 27 ऑगस्टला?
गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस नेते नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना ऊत आला आहे. मात्र, ही अटकळ आता लवकरच खरी ठरणार असल्याची शक्यता ‘माझा’च्या सूत्रांकडून समजते आहे. 27 ऑगस्टला अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यावेळी नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जाती आहे. त्यामुळे नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाची केवळ औपचारिकताच बाकी असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. काँग्रेसी वातावरणाला कंटाळलेल्या आणि नितेश तसंच निलेश राणेंच्या राजकीय भवितव्याची तरतूद म्हणून राणेंसाठी भाजप हाच सर्वोत्तम पर्याय असल्याचं सध्या बोललं जात आहे. अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यावेळीच राणेंचा पक्षप्रवेश होणार? सुत्रांच्या माहितीनुसार, अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यामुळे राणेंचा पक्षप्रवेश लांबला आहे. त्यामुळे येत्या 27 ऑगस्टला अमित शाह यांच्या उपस्थितीत राणेंचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. तसेच राणेंचा पक्षप्रवेश लांबण्याची इतरही काही कारणं होती. राणे भाजपमध्ये आल्यास त्याचा भाजपला किती फायदा होईल याचीही चाचपणी भाजपकडून गेले काही दिवस सुरु होती. …म्हणून आशिष शेलारांचा दिल्ली दौरा? दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी आशिष शेलार दिल्लीत गेले होते त्यामागे राणेंचा भाजप प्रवेश हेच प्रमुख कारण असल्याचं समजतं आहे. राणेंमुळे भाजपला कोकणात काय फायदा होईल याचीही चर्चा शाहा आणि शेलार यांच्यात चर्चा झाल्याचं समजतं आहे. नारायण राणे केंद्रात जाणार? दुसरीकडे राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की. भाजप प्रवेशानंतर नारायण राणे यांना राज्यसभेत जाण्याची इच्छा आहे. त्यामुळे राणेंना आता राज्यातील नव्हे तर केंद्रातील राजकारणात रस असल्याचं म्हटलं जात आहे. राणे भाजपमध्ये आल्यास त्यांचं स्वागतच आहे : चंद्रकांत पाटील दरम्यान, कालच (शुक्रवार) महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘नारायण राणे भाजपमध्ये आल्यास त्यांचं स्वागतच आहे.’ असं सूचक वक्तव्य केलं होतं. नारायण राणे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा गेल्या काही दिवस सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांचं हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे. नारायण राणेंची अहमदाबादवारी काही दिवसांपूर्वीच नारायण राणेंची अहमदाबादमध्ये अमित शाह यांची भेट झाली होती. तेव्हा राणेंच्या पक्षप्रवेशाची जोरदार चर्चाही झाली होती. मात्र, आपण अमित शाह यांना भेटलोच नसल्याचं त्यावेळी राणेंनी म्हटलं होतं. संबंधित बातम्या : नारायण राणेंचा भाजप प्रवेश 27 ऑगस्टला?गडकरींवर स्तुतिसुमनं, नारायण राणे भाजपच्या वाटेवर?
अहमदाबादमध्ये अमित शाह-मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा, राणेही अहमदाबादमध्येच?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
मुंबई
राजकारण
धाराशिव
Advertisement