एक्स्प्लोर
‘घनवाद’ शैलीतील चित्रं
कोल्हापुरातील चित्रकार दिनकर कुंभार यांच्या खास चित्रांचं प्रदर्शन मुंबईतील नेहरु सेंटर, वरळी इथं सुरु आहे. 10 ते 16 एप्रिलदरम्यान हे चित्रप्रदर्शन सुरु राहिल.
मुंबई: कोल्हापुरातील चित्रकार दिनकर कुंभार यांच्या खास चित्रांचं प्रदर्शन मुंबईतील नेहरु सेंटर, वरळी इथं सुरु आहे. 10 ते 16 एप्रिलदरम्यान हे चित्रप्रदर्शन सुरु राहिल.
त्यांच्या ‘घनवाद’ या शैलीतील चित्रं एक विशेष संदेश देणारी आहेत.
जागतिक कलाक्षेत्रात क्युबिझम अर्थात घनवाद महत्त्वपर्ण मानला जातो. फ्रेंच आर्टिस्टने 1906 साली ‘घनवाद’ या शैलीवर काम केलं होतं. त्या शैलीवर अभ्यास करुन दिनकर कुंभार यांनी पदवी मिळवली. 1991 पासून त्यांचं या शैलीवर काम सुरु आहे.
मानवाचं धावतं जग, यातून सुटण्याची धडपड आणि धडपडीतून पुन्हा त्याच विळख्यात सापडलेलं त्याचं चिंतनशील मन याबद्दलची अनुभूती त्यांच्या ‘रनर’ आणि ‘ह्यूमन रेस’ या चित्रांमधून दिसते.
या चित्रांमधील अनेक प्रकार नेहरु सेंटरमधील प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement