एक्स्प्लोर

उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंना सुरक्षा न देण्याच्या कोणत्याही सूचना नव्हत्या : दिलीप वळसे पाटील

मविआकडून (Maha Vikas Aghadi) एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) सुरक्षा पुरवण्यात आली नाही असा आरोप शिंदे गटातील आमदारांनी केला. त्याला माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील उत्तर दिलं आहे. 

Dilip Walse Patil On Eknath Shinde Security : नक्षलवाद्यांकडून धमकी मिळाल्यानंतरही तत्कालीन राज्य सरकार म्हणजेच मविआकडून (Maha Vikas Aghadi) एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) सुरक्षा पुरवण्यात आली नाही असा आरोप शिंदे गटातील आमदारांनी केला. त्याला माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील उत्तर दिलं आहे. 

वळसे पाटील यांनी म्हटलं आहे की, एकनाथ शिंदेंना पुरेशी सुरक्षा देण्यात आली होती. त्यांच्या मुलाने पत्र लिहून झेड प्लस सुरक्षा मागितली होती. पण एकनाथ शिंदेंकडून स्वतः कधीच सुरक्षेची मागणी करण्यात आली नव्हती.  शिंदेंना आलेल्या  धमकीच्या पत्रानंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली होती. तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडून एकनाथ शिंदेंना सुरक्षा देऊ नका अशा कोणत्याही सूचना नव्हत्या, असं वळसे पाटलांनी म्हटलं आहे. 

दिलीप वळसे पाटील म्हणाले की, सुरक्षा देण्याचा निर्णय तज्ञ समिती घेत असते. सार्वजनिक जीवनात काम करत असताना अशा धमक्या येत असतात. एकनाथ शिंदेंच्या चिरंजीवांनी पत्र दिल्यानंतर जेवढी सुरक्षा तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना होती तेवढीच एकनाथ शिंदेंना होती. एकनाथ शिदे आणि शंभुराजे देसाई एकाच गटाचे आहेत म्हणून ते आरोप करत आहेत, असं त्यांनी म्हटलं

वळसे पाटील पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात नोंद गुन्ह्यांचा तपास या सरकारने जरी केंद्रीय तपास यंत्रणांकडे दिला तरी योग्य तपास होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयांना या सरकारने स्थगिती दिलीय हे दुर्दैवी आहे, असंही ते म्हणाले. 

नक्षल्यांकडून आलेली धमकी आणि सुरक्षा वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं होतं की, अशा धमक्या आणि सुरक्षेबाबत गृहविभाग निर्णय घेतं असतं. नक्षलवाद्यांच्या धमकीनंतर एकनाथ शिंदे यांची झेड सुरक्षा का नाकारली? असा सवाल माजी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केला होता. तसेच आमदार सुहास कांदे यांनी देखील शिंदे यांच्या सुरक्षेबाबत वक्तव्य केलं होतं. 

इतर महत्वाच्या बातम्या

Shiv Sena : एकनाथ शिंदेंची शिवसेना पक्षप्रमुखपदाकडे वाटचाल सुरु झालीय का?

तुम्ही कितीही यात्रा काढा, कितीही संभ्रम निर्माण करा; आमचीच शिवसेना खरी : दीपक केसरकर 

Shiv Sena : आम्हाला हिनवले तर आणखी स्फोट होतील, शंभूराज देसाई यांचा ठाकरेंना इशारा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बार्शीत सोपल की राऊत, जरागें फॅक्टर लक्षवेधी ठरणार का; विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी?
बार्शीत सोपल की राऊत, जरागें फॅक्टर लक्षवेधी ठरणार का; विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी?
लातूरमधून देशमुख बंधू, सोलापुरात एकच उमेदवार; नागपुरातून 4, फडणवीसांविरुद्ध ठरला उमेदवार
लातूरमधून देशमुख बंधू, सोलापुरात एकच उमेदवार; नागपुरातून 4, फडणवीसांविरुद्ध ठरला उमेदवार
Congress Candidate List : काँग्रेसची पहिली 48 उमेदवारांची पहिली यादी, 5 एसटी, 2 SC अन् दिग्गजांना संधी; पुन्हा दिसली घराणेशाही
काँग्रेसची पहिली 48 उमेदवारांची पहिली यादी, 5 एसटी, 2 SC अन् दिग्गजांना संधी; पुन्हा दिसली घराणेशाही
रायगडमध्ये जमीन, मुंबईत गाळे, लॅव्हिश कार, दागिने, बँकेत 2 कोटी; आदित्य ठाकरेंची संपत्ती किती?
रायगडमध्ये जमीन, मुंबईत गाळे, लॅव्हिश कार, दागिने, बँकेत 2 कोटी; आदित्य ठाकरेंची संपत्ती किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : अर्ज नेत्यांचा, त्रास जनतेला; शक्तिप्रदर्शनामुळे वाहतूक कोंडीDevendra Fadnavis Nagpur : उद्यापर्यंत भाजपची दुसरी यादी जाहीर करणार : देवेंद्र फडणवीसRajkiya Sholay : दिल्लीत अमित शाहांच्या उपस्थितीत महायुतीची खलबतं, बैठकीची इनसाईड स्टोरीZero Hour : लोकसभेच्या स्ट्राईक रेटनुसार मुख्यमंत्र्यांची शाहांसमोर अधिक जागांची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बार्शीत सोपल की राऊत, जरागें फॅक्टर लक्षवेधी ठरणार का; विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी?
बार्शीत सोपल की राऊत, जरागें फॅक्टर लक्षवेधी ठरणार का; विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी?
लातूरमधून देशमुख बंधू, सोलापुरात एकच उमेदवार; नागपुरातून 4, फडणवीसांविरुद्ध ठरला उमेदवार
लातूरमधून देशमुख बंधू, सोलापुरात एकच उमेदवार; नागपुरातून 4, फडणवीसांविरुद्ध ठरला उमेदवार
Congress Candidate List : काँग्रेसची पहिली 48 उमेदवारांची पहिली यादी, 5 एसटी, 2 SC अन् दिग्गजांना संधी; पुन्हा दिसली घराणेशाही
काँग्रेसची पहिली 48 उमेदवारांची पहिली यादी, 5 एसटी, 2 SC अन् दिग्गजांना संधी; पुन्हा दिसली घराणेशाही
रायगडमध्ये जमीन, मुंबईत गाळे, लॅव्हिश कार, दागिने, बँकेत 2 कोटी; आदित्य ठाकरेंची संपत्ती किती?
रायगडमध्ये जमीन, मुंबईत गाळे, लॅव्हिश कार, दागिने, बँकेत 2 कोटी; आदित्य ठाकरेंची संपत्ती किती?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विदर्भामधील मोजक्या जागांवर तिढा कायम; सुनील केदार आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीत नेमकं काय झालं?
विदर्भामधील मोजक्या जागांवर तिढा कायम; सुनील केदार आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीत नेमकं काय झालं?
Ajit Pawar Vs Yugendra Pawar In Baramati : बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध तगडी फाईट होणार; अजितदादांना घरातच घेरण्याची पुन्हा एकदा तयारी!
बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध तगडी फाईट होणार; अजितदादांना घरातच घेरण्याची पुन्हा एकदा तयारी!
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विदर्भात 7 उमेदवार जाहीर; नव्या चेहऱ्यांना संधी, ही आहेत वैशिष्टे
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विदर्भात 7 उमेदवार जाहीर; नव्या चेहऱ्यांना संधी, ही आहेत वैशिष्टे
Raju Shetti : सावकार मादनाईक ऊस परिषदेला येणार की नाहीत? राजू शेट्टी यांनी केला खुलासा!
सावकार मादनाईक ऊस परिषदेला येणार की नाहीत? राजू शेट्टी यांनी केला खुलासा!
Embed widget