Shiv Sena : आम्हाला हिनवले तर आणखी स्फोट होतील, शंभूराज देसाई यांचा ठाकरेंना इशारा
Shambhuraj desai : आम्हाला हिनवले तर आणखी स्फोट होतील. आमच्या मनात आणखी खूप काही आहे, असा इशारा माजी राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
Shambhuraj desai : आम्हाला हिनवले तर आणखी स्फोट होतील. आमच्या मनात आणखी खूप काही आहे, असा इशारा माजी राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. नक्षलवाद्यांच्या धमकीनंतर एकनाथ शिंदे यांची झेड सुरक्षा का नाकारली? असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. शिंदे गटातील सर्वच आमदारांच्या आणि खासदारांच्या मनात खूप काही आहे, असेही देसाई म्हणाले.
माऊवादी चळवळीला मोडीत काढण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांनी केले. त्याचा परिणाम म्हणून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यांना धमकीचे पत्रही दिले. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुलाला मारण्याचा पत्रात उघड उल्लेख होता. मी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात झेड सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला. उध्दव साहेबांनी दोन वेळा सांगितले की, तुम्हाला त्यांची सुरक्षा वाढवता येणार नाही. मी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मी एकनाथ शिंदे यांनाही सांगितले, असे शंभूराज देसाई म्हणाले.
आणखी काही गोष्टी आहेत त्या आम्ही उघडपनाने बोलू नये, असे शिंदे साहेबांचे आम्हाला आदेश आहेत. अडीच वर्षात खूप काही साठले आहे. तुम्ही आम्हाला गद्दार म्हणताय, रेडे म्हणताय, गटरातले पाणी म्हणताय, कीडे म्हणताय, महिला आमदारांना आश्लिल शब्द वापरताय म्हणून नाईलाजाने हे थोड बाहेर आले आहे, असे शंभूराज देसाई म्हणाले. आमच्या मनात साठवून ठेवायची काही मर्यादा आहेत. जर मर्यादा संपली, तर पन्नास आमदार आणि बारा खासदार यांच्या मनातल्या व्यथा साठलेले कटू अनूभव आम्हाला उघड करावे लागतील. जानीवपूर्वक आम्हाला खिजवन्याचा अवहेलना करण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला समाजासमोर उघड करावे लागेल, असा इशाराच देसाई यांनी दिलाय.
आदित्य ठाकरे हे पहिल्या टर्मचे आमदार आहेत. आमच्या सारख्या तीन तीन टर्म आमदार राहिलेल्या पक्ष संघटनेचे काम केलेल्यांना जर गद्दार म्हणत असतील तर दुर्दैव आहे. त्यांनी संजय राऊत यांची भाषा बोलू नये, तुम्ही सुसंस्कृत भाषा बोला. त्यांना संजय राऊतांचा सहवास असल्यामुळे.... हे एकायला आम्हाला वाईट वाटते, असा टोला देसाई यांनी लगावला. उध्दव ठाकरे यांनी मोठ्या मनाने आमच्या सरकारला आशिर्वाद द्यावा. उध्दव ठाकरे यांनी फडणविसांना फोन केला की नाही हे माहिती नाही. रविवारी फडणविसांची भेट घेणार आहे. मंत्रीपदासाठी, खातेवाटपासाठी रस्सीखेच नाही, आमच्यात चढाओढ नाही. लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार होईल, आधिवेशन तोंडावर आहे, त्यामुळे त्याच्या पूर्वीच याचा निर्णय होईल, असेही देसाई म्हणाले.