एक्स्प्लोर
कल्याणमधील खडवलीत तब्बल 205 जणांना अतिसाराची लागण
खडवली (कल्याण): कल्याणच्या खडवली पश्चिममध्ये दूषित पाण्यामुळे नागरिकांना अतिसाराची लागण झाली आहे. सुमारे 205 नागरिकांना अतिसाराची लागण झाल्याची माहिती मिळते आहे.
भातसा नदी पात्रात वासिंद येथील कंपनीचे दूषित पाणी सोडल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. त्यामुळंच नागरिकांना अतिसाराची लागण झाल्याचं बोललं जातं आहे.
दरम्यान, आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्यांची संख्या वाढली असून आत्तापर्यंत 205 जणांवर उपचार झाल्याची माहिती मिळते आहे. या घटनांमुळे खडवलीसह लगतच्या गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी नागरिकांना सतर्क करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement