मराठा समाजाच्या आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीस यांचाही सल्ला घेणार : अशोक चव्हाण
मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे यापुढे आता मराठा समाजाला आरक्षण कशा पद्धतीने देता येईल यासंदर्भात आज वर्षा बंगल्यावर एक महत्वाची बैठक पार पडली.
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचाही सल्ला घेणार असल्याची माहिती मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिलेली आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मराठा आरक्षणा संदर्भात एक महत्वाची बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे यापुढे आता मराठा समाजाला आरक्षण कशा पद्धतीने देता येईल यासंदर्भात आज वर्षा बंगल्यावर एक महत्वाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यात आली. या बैठकीला विविध विभागाचे अधिकारी आणि तज्ञांचा सल्ला, कायदेशीर बाबी समजून घेण्यात आल्या.
'मराठा बांधवांनो, सरकार तुमच्यासोबतच, आंदोलनं करु नका', मुख्यमंत्र्यांचं आवाहन
मराठा आरक्षणासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकत्र काम करत आहेत. 15 तारखेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुंबईत आल्यानंतर त्यांच्यासोबत ही मराठा आरक्षण संदर्भात बैठक होणार आहे. आम्हाला कोणताही राजकीय वाद करायचा नाही, सामंजस्याने यावर तोडगा काढायचा आहे, असं अशोक चव्हाण यांनी सांगितले. मराठा समाजासोबत संपूर्ण राज्य सरकार आहे. त्यामुळे वादाचा कोणताही मुद्दा नाही. पुन्हा सर्व कायदेशीर बाबी तपासल्या जात आहेत. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ यांचे सल्ला घेण्यात येत आहे, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.
य़ा बैठकीत सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायद्यास दिलेल्या अंतरिम स्थगितीमुळे राज्यातील विविध अभ्यासक्रमांचे प्रवेश यांच्यासह, भरती प्रक्रीया यांच्या अनुषंगाने झालेल्या परिणामाबाबत विस्ताराने आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांचे आणि उमेदवारांचे कोणत्याही परिस्थितीत नुकसान होऊ नये यासाठी समन्वयाने प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
#MarathaReservation नाशिकमध्ये मराठा समाजाच्या बैठकीत गोंधळ, भाजप आमदार देवयानी फरांदेंचं भाषण रोखलं