एक्स्प्लोर

मुंबई आणखी सुस्साट, मेट्रोच्या 12000 कोटी रुपयांच्या 19 टेंडर्संना मंजुरी; वाहतूक व्यवस्थेच्या दिशेने मोठे पाऊल

मेट्रो विस्तार आणि स्मार्ट वाहतूक यंत्रणेला गती देण्यासाठी 19 महत्त्वाच्या कंत्राटांना मंजुरी

मुंबई : राजधानी मुंबईच्या (mumbai) शहर वाहतूक व्यवस्थेचा कायापालट साध्य करण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल उचलत, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ने आज ₹12,0000 कोटींहून अधिक किमतीच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (अध्यक्ष, एमएमआरडीए) यांच्या नेतृत्वाखाली आणि एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या सक्रिय पुढाकाराने ही महत्त्वाची पावले उचलण्यात आली. या बैठकीत मेट्रो (Metro) विस्तार आणि स्मार्ट वाहतूक यंत्रणेला गती देण्यासाठी 19 महत्त्वाच्या कंत्राटांना मंजुरी देण्यात आली आहे. 

मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या 284 व्या कार्यकारी समितीच्या बैठकीत, अतिरिक्त मुख्य सचिव (1) श्री असीमकुमार गुप्ता, बीएमसी आयुक्त भूषण गगराणी आणि एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, भाप्रसे यांच्या उपस्थितीत मेट्रो मार्ग आणि अटल सेतूसह विविध महत्त्वाच्या कामांतील कत्राटांरांच्या नेमणुकीसाठी मंजुरी देण्यात आली. या कंत्राटांत प्रणाली, रोलिंग स्टॉक, नागरी कामे, ट्रॅक्शन पॉवर, एएफसी प्रणाली, डेपो पायाभूत सुविधा आणि मल्टी-मोडल इंटिग्रेशन (एमएमआय) यांचा समावेश आहे.

प्रमुख प्रकल्प व मंजूर कंत्राटांची यादी

1. ₹4,788 कोटी – मेट्रो लाईन 4 आणि 4A
Larsen & Toubro Ltd. ला एकात्मिक प्रणाली—रोलिंग स्टॉक, CBTC सिग्नलिंग, दूरसंचार, प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर्स (PSD) आणि डेपो उपकरणांसह—पुरवठा व 5 वर्षांच्या म सर्वसमावेशक देखभालीसाठी कंत्राट मंजूर.

2. ₹557.55 कोटी (सुधारित) – मेट्रो लाईन 4A
गव्हाणपाडा आणि गायमुख स्थानकांसाठी सिव्हिल कामांमध्ये सुधारित डिझाईन आणि स्थळ-आधारित बदलांसह सुधारित कंत्राट मूल्य मंजूर.

3. ₹188.59 कोटी – मेट्रो लाईन 4
L&T ला भक्ती पार्क ते मुलुंड अग्निशमन केंद्र दरम्यान बॉलस्टलेस ट्रॅक व पॉकेट ट्रॅकसह काम मंजूर, हे मूळ अंदाजापेक्षा 15.72% नी कमी दरात मंजूर.

4. ₹668.15 कोटी – मेट्रो लाईन 6
IRCON International Ltd. ला स्वामी समर्थ नगर ते ईस्टर्न एक्सप्रेस हायवे (EEH) मार्गासाठी पॉवर सप्लाय, ट्रॅक्शन, E&M प्रणाली, लिफ्ट आणि एस्केलेटर यांची रचना व स्थापनेसाठी आणि 5 वर्षांच्या सर्वसमावेशक देखभालीसाठी कंत्राट मंजूर.

5. ₹551.41 कोटी (सुधारित) – एमटीएचएल पॅकेज 4
ITS प्रणाली, टोल व्यवस्थापन, प्रगत वाहतूक नियंत्रण प्रणाली (ATMS), स्ट्रीट लाईटिंग, प्रशासकीय इमारती आणि सेंट्रल कंट्रोल सेंटरसाठी सुधारित कंत्राट मंजूर.

6. ₹2,269.66 कोटी – मेट्रो लाईन 6
NCC Ltd. ला रोलिंग स्टॉक, सिग्नलिंग, टेलिकॉम प्रणाली, PSDs आणि डेपो यंत्रणा पुरवठा व स्थापनेसाठी व 5 वर्षांच्या देखभालीसाठी कंत्राट.

7. ₹104.66 कोटी (सुधारित) – मेट्रो लाईन 6
सामान्य सल्लागार (General Consultant ) साठी 680 दिवसांची मुदतवाढ व 39.61% खर्चवाढ मंजूर.

8. ₹535.08 कोटी – मेट्रो लाईन 4 व 4A साठी मल्टी-मोडल इंटिग्रेशन (MMI)
32 स्थानकांवरील MMI कामे 4 पॅकेजमध्ये मंजूर:
o पॅकेज 1: N A Construction – J. Kumar JV (₹139.71 कोटी)
o पॅकेज 2: Dev Engineers – PRS Infra JV (₹128.84 कोटी)
o पॅकेज 3: N A Construction (₹140.25 कोटी)
o पॅकेज 4: N A Construction – SARE JV (₹126.26 कोटी)

9. ₹432.63 कोटी (सुधारित) – मेट्रो लाईन 2A
DMRC ला ‘Deposit Work’ अटींनुसार विस्तारलेल्या कालावधीसाठी अंमलबजावणीसाठी अतिरिक्त सल्लागार शुल्क मंजूर.

10. ₹118.28 कोटी – मेट्रो लाईन 9 व 7A
Leena Powertech–Umesh Brothers JV ला उत्तर-दक्षिण मेट्रो मार्गासाठी OHE, केबल, विद्युत वितरण व SCADA प्रणाली स्थापनेसाठी कंत्राट मंजूर.

11. ₹249.97 कोटी – मेट्रो लाईन 4 व 4A
Aurionpro Solutions Ltd. ला AFC प्रणालीसाठी कंत्राट मंजूर, वडाळा ते गायमुख मार्गासाठी व 5 वर्षांच्या सर्वसमावेशक देखभालीसह.

12. USD 7.59 मिलियन + ₹14.29 कोटी – एकाधिक लाईन्ससाठी रेल पुरवठा
Mitsui & Co., Nippon Steel, Mitsui India यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे 1080 ग्रेडचे 6,900 मेट्रिक टन हेड हार्डन केलेले रेल पुरवले जाणार.

13. ₹99.99 कोटी – मेट्रो लाईन 2B
Paras Railtech Pvt. Ltd. ला अंधेरी वेस्ट ते आयटीओ स्टेशन दरम्यान बॉलस्टलेस ट्रॅकच्या कामासाठी कंत्राट मंजूर (मूळ खर्चाच्या 17.82% खाली).

14. ₹114.98 कोटी – पायाभूत सुविधा डिजिटल निरीक्षण प्रणाली (IDDP)
Censys Technologies Pvt. Ltd. ही प्रणाली एकत्रीकरणासाठी निवडण्यात आली, जी पायाभूत कामांचे रिअल टाइम निरीक्षण सुनिश्चित करेल.

15. ₹497.46 कोटी – मेट्रो लाईन 5 (कशेळी डेपो सहित)
IRCON International Ltd. ला 220kV RSS, OHE, SCADA, E&M कामांसह डेपो सुविधांसाठी 5 वर्षांच्या सर्वसमावेशक देखभालीसह कंत्राट मंजूर.

16. ₹79.37 कोटी – मेट्रो लाईन 2B व 7
DMRC ला रोलिंग स्टॉक व सिग्नलिंग व्यवस्थापन कामासाठी ऑगस्ट 2026 पर्यंत मुदतवाढ मंजूर.

17. ₹70 कोटी – मेट्रो लाईन 9 व 7A
L&T Technology Services – Amnex JV ला AFC प्रणाली कंत्राट मंजूर, दोन वर्षांच्या दोष अधिसूचना कालावधीसह.

18. ₹77.38 कोटी – मेट्रो लाईन 4 व 4A (पॅकेज 1)
KBA Infrastructure – Shree Manglam Buildcon JV ला कॅडबरी व माजिवडा स्थानकांवर फूट ओव्हरब्रिज बांधकामासाठी कंत्राट मंजूर.

19. ₹129.04 कोटी – मेट्रो लाईन 4 व 4A (पॅकेज 2)
J Kumar – PRS JV ला पंतनगर, विक्रोळी, भांडुप व विजय गार्डन मेट्रो स्थानकांवरील फूट ओव्हरब्रिजसाठी कंत्राट मंजूर.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले:
“महाराष्ट्र शासन केवळ आजच्या गरजा पूर्ण करणाऱ्या नव्हे तर भविष्यातील मागण्यांची पूर्वकल्पना घेतलेली पायाभूत सुविधा निर्माण करण्यास कटिबद्ध आहे. एमएमआरडीएकडून मंजूर झालेली ही ₹१२,००० कोटींपेक्षा अधिक किमतीची गुंतवणूक मुंबईच्या एकात्मिक आणि समावेशक वाहतूक व्यवस्थेच्या दिशेने मोठे पाऊल आहे. या प्रकल्पामुळे आर्थिक गती, शहरी गतिशीलता आणि नागरिकांचे जीवनमान सुधारेल.”

उपमुख्यमंत्री व एमएमआरडीए अध्यक्ष एकनाथ शिंदे म्हणाले:
“एमएमआरडीएकडून झालेली ही ऐतिहासिक मंजूरी महाराष्ट्र सरकारच्या जागतिक दर्जाच्या वाहतूक पायाभूत सुविधेच्या बांधणीसाठीच्या कटिबद्धतेचा पुरावा आहे. ₹१२,००० कोटींपेक्षा अधिक गुंतवणुकीद्वारे आम्ही एक समतोल, शाश्वत आणि आधुनिक मेट्रो नेटवर्क घडवत आहोत.”

डॉ. संजय मुखर्जी, आयएएस, आयुक्त, एमएमआरडीए म्हणाले:
“आज मंजूर झालेले प्रत्येक प्रकल्प हे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेच्या एकात्मिक विकासात मोलाचा वाटा उचलेल याची खात्री करून घेतली आहे. सिस्टम्स इंटिग्रेशन, रोलिंग स्टॉक, ट्रॅक्शन पॉवर, AFC व मल्टी-मोडल इंटिग्रेशन या सर्व घटकांना जोडणारी ही कंत्राटे आम्ही ऑपरेशनल रेडिनेस लक्षात घेऊन मंजूर केली आहेत. शेवटच्या टप्प्याच्या जोडणीवर आमचा भर असून, प्रवाशांसाठी सहज, गतीशील आणि एकात्मिक वाहतूक संरचना निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.”

हेही वाचा

मी आईच्या भावनेने रागावले; ये झिपरे म्हणत झोडपणाऱ्या महिला कॉन्स्टेबल हात जोडले, माफी मागितली

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Home Loan : घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले; स्टेट बँकेनं देखील दिली मोठी अपडेट
घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले, SBI कडूनही मोठी अपडेट
Election Rules Maharashtra : EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं

व्हिडीओ

Elon Musk : श्रीमंतीचा नंबर, मस्कच 'एक' नंबर; मस्क यांची एकूण संपत्ती किती? Special Report
Sikh procession in New Zealand : न्यूझीलंडमध्ये वारी शीखांची, मुजोरी स्थानिकांची Special Report
Manikrao Kokate : आमदारकीचा दिलासा किंचित पण अधिकारांपासून वंचित Special Report
Nashik NCP BJP Alliance : नाशिकमधल्या रस्त्यावरचा 'राजकीय पिक्चर' पाहिला? Special Report
Thackeray Brother Yuti : उद्याचा मुहूर्त, साधणार की हुकणार?  युतीची घोषणा करणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Home Loan : घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले; स्टेट बँकेनं देखील दिली मोठी अपडेट
घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, 'या' हाऊसिंग फायनान्स कंपनीनं व्याज दर घटवले, SBI कडूनही मोठी अपडेट
Election Rules Maharashtra : EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
EVM वर आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार, नंतर प्रादेशिक पक्ष अन् शेवटी अपक्ष; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
भाजपने तिकीट नाकारलं, घरही नसलेला जांभा अपक्ष लढला; मंत्री संजय राठोडांच्या खास माणसाला पाडला
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
संभोग करताना घरात रंगेहाथ सापडले, बायकोचे दोन बाॅयफ्रेंड एकाचवेळी आले, तिघांनी नवऱ्याचं हातोड्यानं डोकं फोडलं, हात पाय तोडून मिक्सरमध्ये तुकडे, डोकं नदीत फेकलं
BMC Election : मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं, मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेचं जमलं, मुंबई जिंकण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
राज्यातील तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; ठाणेकन्या डॉ.कश्मीरा संखेंना नाशिकमध्ये खास जबाबदारी
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
मनोज्वं मारुत्तुल्यवेगम... देवाभाऊ हनुमान भक्तीत लीन; मुख्यमंत्री अर्धा तास कथा ऐकण्यात मंत्रमुग्ध
अहो आश्चर्यम... कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर
कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय 1.50 कोटींचा फ्लॅट, योजनेचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या सविस्तर
Embed widget