एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शिवसेनेच्या सवतीच्या वागणुकीमुळे राणेंना भाजपमध्ये घेतलं: मुख्यमंत्री
शिवसेना नेते संजय राऊता यांनी लोकमतच्या महाराष्ट्रीय ‘ऑफ द इयर’ या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली.
मुंबई: शिवसेना भाजपशी सवतीप्रमाणे वागत असल्याने नारायण राणेंना सोबत घेतलं, असा चिमटा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला काढला.
शिवसेना नेते संजय राऊता यांनी लोकमतच्या महाराष्ट्रीय ‘ऑफ द इयर’ या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली.
भाजप-शिवसेनेची युती झाली तर भाजपसोबत नसेन असं खासदार नारायण राणे यांनी एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात सांगितलं होतं.
मुख्यमंत्र्यांची मेगामुलाखत जशीच्या तशी...
राणेंच्या या भूमीकेचा संदर्भ घेत संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला.
काँग्रेस नेते नारायण राणे एका मुलाखतीत म्हणाले, शिवसेना-भाजप युती झाली तर मी युतीतून बाहेर पडेन, याबाबत तुमचं म्हणणं काय, असा प्रश्न राऊत यांनी विचारला.
त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, “मी ती मुलाखत पाहिली नाही. पण याचं तुम्ही आत्मपरिक्षण करायला पाहिजे. तुम्ही आमच्याशी जर सवतीप्रमाणे वागला नसता तर आम्हाला त्यांना घेण्याची वेळ आली नसती. तुम्ही रोजच आमच्याशी सवतीप्रमाणे वागता, त्यामुळे आम्हाला त्यांना घ्यावं लागतं”.
भाजप-शिवसेना युती झाल्यास मी भाजपमध्ये नसेन : राणे
2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती झाली तर मी भाजपमध्ये नसेन, असं राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी जाहीर केलं. 'एबीपी माझा'च्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात राणे बोलत होते.
"महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात माझ्या येण्याला शिवसेनेचा आक्षेप होता. माझा मंत्रिमंडळात समावेश झाला तर ते सत्तेतून बाहेर पडणार होते. त्यामुळे शिवसेना-भाजप युती होणार असेल तर माझ्या भाजपमध्ये राहण्याला अर्थ नाही," असं नारायण राणे म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement