एक्स्प्लोर

पीएम केअर्स फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर्स देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटलांनी चालू करुन दाखवावे, काँग्रेसच्या सचिन सावंतांचं आव्हान

औरंगाबाद शासकीय वैद्यकीय कॉलेजच्या 17 मे रोजीच्या वस्तूस्थितीदर्शक अहवालाने केंद्र सरकारचा गुजरात भाजप नेत्यांच्या जवळच्या ज्योती सीएनसी कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न उघडा पडला आहे, असं सचिन सावंत यांनी म्हटलं.

मुंबई : पीएम केअर्स फंडातून महाराष्ट्राला केंद्र सरकारने दिलेले ज्योती सीएनसी कंपनीचे व्हेंटिलेटर पूर्णतः तकलादू असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान मोदींची प्रतिमा जनतेच्या जीवापेक्षा महत्वाची मानणाऱ्या देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी हे तकलादू व्हेंटिलेटर चालू करुन दाखवावे, असं आव्हान काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिलं आहे. 

औरंगाबाद शासकीय वैद्यकीय कॉलेजच्या 17 मे रोजीच्या वस्तूस्थितीदर्शक अहवालाने केंद्र सरकारचा गुजरात भाजप नेत्यांच्या जवळच्या ज्योती सीएनसी कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न उघडा पडला आहे. कंपनीचे 58 व्हेंटिलेटर तकलादू निघाल्याने इतर 37 व्हेंटिलेटर खोलण्याचे या कंपनीचे धैर्यच झाले नाही. 14 मे ोजी केंद्र सरकारने केलेली सारवासारव खोटी होती, असं सचिन सावंत यांनी म्हटलं.  

ज्योती सीएनसीचे व्हेंटिलेटर 12 एप्रिलला आले. केंद्र सरकारने 19 एप्रिल सांगितले, हे खोटं आहे. 12 एप्रिललाच जिल्हाधिकाऱ्यांना हे वापरण्यासारखे नाही असा अहवाल दिला आहे. 18 एप्रिलला ज्योती कंपनीच्या सहदेव मुचकुंद व कल्पेश या तंत्रज्ञांनी 25 धामण-3 हे व्हेंटिलेटर इन्स्टॉल केले. जे 20 तारखेपर्यंत गंभीर त्रुटींमुळे परत आले. 23 एप्रिलाला पुन्हा तंत्रज्ञांना बोलवले पण त्यांनी दुरुस्त केलेले 2 व्हेंटिलेटर पुन्हा बिघडले. त्यानंतर या तंत्रज्ञांनी तोंड दाखवलं नाही, असं सचिन सावंत यांनी सांगितलं. 

पुढे सचिन सावंत यांनी म्हटलं की, 6 मे रोजी व 10 मे रोजी या संदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या तांत्रिक समितीने तसा अहवाल दिला आहे. यानंतर महाराष्ट्र काँग्रेसने बोंबाबोंब केल्यावर 13 व 14 मे रोजी राजेश रॉय व आशुतोष गाडगीळ हे तंत्रज्ञ आले. त्यांनी दुरुस्त केलेले 2 व्हेंटिलेटर पुन्हा बिघडले. नंतर त्यांनी पळ काढला आहे. खाजगी रुग्णालयांना उसनवारीने व्हेंटिलेटर दिले व व्हेंटिलेटरसाठी रुग्णांकडून शुल्क घेऊ नये ही अट टाकली त्यात चूक काय? खाजगी रुग्णालयेही ती वापरत नाहीत. 

तकलादू व्हेंटिलेटर देऊन मोदी सरकारने जनतेच्या पैशाचा अपव्यय व जनतेच्या जीवाशी खेळ केला आहे. म्हणून या केंद्र सरकारच्या 14 मे रोजी केलेल्या कांगाव्याला उत्तर देणाऱ्या या अहवालाने केंद्राचा हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आहे हे स्पष्ट झाले. तसेच आमची केंद्र व राज्य सरकारने एकत्रित लेखापरीक्षण करावे ही व राज्य सरकारकडे केलेली चौकशीची मागणी पूर्णपणे योग्य आहे हे सिद्ध झाले, असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Kapoor : पहिल्या चित्रपटासाठी नोकराकडून कर्ज, लता मंगेशकर म्हणाल्या होत्या, मी राज कपूरसाठी कधीही गाणार नाही! काय होता तो प्रसंग?
पहिल्या चित्रपटासाठी नोकराकडून कर्ज, लता मंगेशकर म्हणाल्या होत्या, मी राज कपूरसाठी कधीही गाणार नाही! काय होता तो प्रसंग?
Nana Patole : काँग्रेसमधील अंतर्गत वाद अन् राजीनाम्यावर नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले,  'त्याची चर्चा करण्याची गरज...'
काँग्रेसमधील अंतर्गत वाद अन् राजीनाम्यावर नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले 'त्याची चर्चा करण्याची गरज...'
Delhi Farmer Protest : शेतकऱ्यांचा शंभू सीमेवरून दिल्लीकडे मोर्चा; पोलिसांनी रॉकेट लाँचरमधून बॉम्ब अन् गोळ्या झाडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
शेतकऱ्यांचा शंभू सीमेवरून दिल्लीकडे मोर्चा; पोलिसांनी रॉकेट लाँचरमधून बॉम्ब अन् गोळ्या झाडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
Beed Crime: मोठी बातमी! बीड शहरातील गोळीबार प्रकरणात एकाला अटक, विशेष पथक तैनात
मोठी बातमी! बीड शहरातील गोळीबार प्रकरणात एकाला अटक, विशेष पथक तैनात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Allu Arjun PC After Bail '  अटक... जेल...जामीन...पुष्पाची पहिली पत्रकार परिषदNana Patole PC : मलाईदार खात्यांसाठी महायुतीत भांडण, नाना पटोलेंचा हल्लाबोलDadar Hanuman Mandir : मोठी बातमी! दादरमधील हनुमान मंदिर  हटवण्याच्या निर्णयाला स्थगितीTop 60 News : City 60 News : Maharashtra News : 14 Dec 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Kapoor : पहिल्या चित्रपटासाठी नोकराकडून कर्ज, लता मंगेशकर म्हणाल्या होत्या, मी राज कपूरसाठी कधीही गाणार नाही! काय होता तो प्रसंग?
पहिल्या चित्रपटासाठी नोकराकडून कर्ज, लता मंगेशकर म्हणाल्या होत्या, मी राज कपूरसाठी कधीही गाणार नाही! काय होता तो प्रसंग?
Nana Patole : काँग्रेसमधील अंतर्गत वाद अन् राजीनाम्यावर नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले,  'त्याची चर्चा करण्याची गरज...'
काँग्रेसमधील अंतर्गत वाद अन् राजीनाम्यावर नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले 'त्याची चर्चा करण्याची गरज...'
Delhi Farmer Protest : शेतकऱ्यांचा शंभू सीमेवरून दिल्लीकडे मोर्चा; पोलिसांनी रॉकेट लाँचरमधून बॉम्ब अन् गोळ्या झाडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
शेतकऱ्यांचा शंभू सीमेवरून दिल्लीकडे मोर्चा; पोलिसांनी रॉकेट लाँचरमधून बॉम्ब अन् गोळ्या झाडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
Beed Crime: मोठी बातमी! बीड शहरातील गोळीबार प्रकरणात एकाला अटक, विशेष पथक तैनात
मोठी बातमी! बीड शहरातील गोळीबार प्रकरणात एकाला अटक, विशेष पथक तैनात
2019 मध्ये भारताने पाकिस्तानला दणका दिला, आता स्वित्झर्लंडचा भारताला तगडा झटका! आशियामधील चौथा सर्वात मोठा पार्टनर असूनही घेतला निर्णय
2019 मध्ये भारताने पाकिस्तानला दणका दिला, आता स्वित्झर्लंडचा भारताला तगडा झटका!
Smita Patil : सुपरस्टारच्या प्रेमात पडताच सौंदर्यावर टोमणे, तरीही बंडखोर राहिली; मृत्यूनंतर विवाहित वधूसारखी सजली
सुपरस्टारच्या प्रेमात पडताच सौंदर्यावर टोमणे, तरीही बंडखोर राहिली; मृत्यूनंतर विवाहित वधूसारखी सजली
दादरच्या हनुमान मंदिरावरून राजकारण तापलं, आज आदित्य ठाकरे महाआरती करणार; रवी राणाही भेट देणार
दादरच्या हनुमान मंदिरावरून राजकारण तापलं, आज आदित्य ठाकरे महाआरती करणार; रवी राणाही भेट देणार
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांनी थेट बेडरुममधून उचललं; सीएम रेवंत रेड्डींच्या प्रतिक्रियेनं सुद्धा भूवया उंचावल्या! दोघांमध्ये वाद का वाढला?
अल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांनी थेट बेडरुममधून उचललं; सीएम रेवंत रेड्डींच्या प्रतिक्रियेनं सुद्धा भूवया उंचावल्या! दोघांमध्ये वाद का वाढला?
Embed widget