एक्स्प्लोर

राज्यातील हॉटेल्स सुरु करण्यासंदर्भात लवकरच निर्णय, कार्यपद्धती निश्चित करणे सुरु : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पर्यटन व्यवसायातील महत्वाचा उद्योग असलेली हॉटेल्स तसेच लॉजेस सुरु करण्यापूर्वी खूप काळजी घेऊन परवानगी द्यावी लागेल. आपली जबाबदारी दुहेरी आहे. हॉटेल्समध्ये येणारा प्रत्येक अभ्यागत, प्रवाशी निरोगी असेल यासाठी त्यांची वैद्यकीय तपासणी करावी लागेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

मुंबई : मिशन बिगीन अगेनमध्ये राज्यात आपण उद्योग व्यवसाय सुरु केले आहेत. महाराष्ट्रात पर्यटन व्यवसायात हॉटेल उद्योगाचे मोठे स्थान आहे. हे लक्षात घेऊन हा उद्योग परत कसा सुरु करता येईल यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक कार्यपद्धती तयार केली असून ती लवकरच अंतिम झाल्यावर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरु करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आज ते राज्यातील हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकारी यांच्यासमवेत व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये बोलत होते. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, पर्यटन प्रधान सचिव वल्सा नायर सिंह सहभागी होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी हॉटेल व्यवस्थापनांनी आपल्या कामगार व कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू नये असंही सांगितले. मुंबई व शहरांतील सर्व हॉटेल्स या कोरोना युद्धात आमच्याबरोबर आहेत त्यासाठी त्यांचे अभिनंदन. पर्यटन व्यवसायातील महत्वाचा उद्योग असलेली हॉटेल्स तसेच लॉजेस सुरु करण्यापूर्वी खूप काळजी घेऊन परवानगी द्यावी लागेल. आपली जबाबदारी दुहेरी आहे. हॉटेल्समध्ये येणारा प्रत्येक अभ्यागत, प्रवाशी निरोगी असेल यासाठी त्यांची वैद्यकीय तपासणी करावी लागेल. कारण एक कोविड पॉझिटिव्ह व्यक्ती हॉटेलमध्ये आला तरी सर्व हॉटेल व कर्मचारी आजारी पडू शकतात. आत्ता आत्ता आपण सलूनला परवानगी दिली आहे ती सुद्धा फक्त केस कापणे व हेअर डायसाठी. जिम देखील बंदच ठेवले आहे कारण आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

हॉटेल्स सुरु करायला काही अडचण नाही मात्र राज्य शासनाने आखून दिलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे आपल्याला नियमांचे पालन करावे लागणार आहे. आज स्थानिक जे कामगार , कर्मचारी आपल्या हॉटेल्समध्ये आहेत त्यांना काढू नका. यात आपण काहीतरी मार्ग निश्चितपणे काढू, या संकट समयी कामगार संघटना देखील अवाजवी मागण्या करणार नाहीत असंही मुख्यमंत्री म्हणाले.

स्वयंशिस्तही महत्वाची - आदित्य ठाकरे

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की हॉटेल उद्योग हा पर्यटन व्यवसायासाठी खूप महत्वाचा आहे. नाईट लाईफला देखील आपण प्रोत्साहन दिले कारण . पर्यटन व्यवसाय हा राज्याच्या विकासाला उत्तेजन देऊ शकतो हे आपल्याला माहित आहे. मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद व इतर मोठ्या श्हरांत आम्ही सगळे व्यवहार सुरु करतांना भविष्यातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन जम्बो सुविधा वाढवण्यावर भर दिला आहे. या सगळ्या प्रयत्नांत हॉटेल्सनी आमच्या वैद्यकीय तसेच शासकीय यंत्रणांसाठी खूप मदत केली कोरोनानंतर हा हॉटेल उद्योग परत जोमाने पायावर उभा राहिला पाहिजे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या उद्योगाने स्वयंशिस्तीसाठी स्वत:ला नियम घालणे महत्वाचे आहे.

Lockdown 6.0 | कोरोनामुळे आंबोलीमधील पर्यटन ठप्प; वर्षा पर्यटनावर बंदी, व्यावसायिक संकटात

महत्त्वाच्या बातम्या

लोकल ट्रेनमध्ये महिलांची सुरक्षा वाऱ्यावर, धावत्या ट्रेनमध्ये मद्यपीचा धिंगाणा, विठ्ठलवाडी स्थानकातील धक्कादायक प्रकार
लोकल ट्रेनमध्ये महिलांची सुरक्षा वाऱ्यावर, धावत्या ट्रेनमध्ये मद्यपीचा धिंगाणा, विठ्ठलवाडी स्थानकातील धक्कादायक प्रकार
Mumbai : धक्कादायक! उंदराने कुरतडलेली फळं ग्राहकांना विकली, बोरिवली स्टेशन बाहेरील फळविक्रेत्याचा व्हिडीओ व्हायरल
धक्कादायक! उंदराने कुरतडलेली फळं ग्राहकांना विकली, बोरिवली स्टेशन बाहेरील फळविक्रेत्याचा व्हिडीओ व्हायरल
Aaditya Thackeray : 'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
Uddhav Thackeray : लष्कराची सेवा करणारे सोनम वांगचुक देशद्रोही कसे? उद्धव ठाकरेंचा थेट मोहन भागवतांना सवाल, संघाच्या 'हिंदू राष्ट्रा'वरही सवाल
लष्कराची सेवा करणारे सोनम वांगचुक देशद्रोही कसे? उद्धव ठाकरेंचा थेट मोहन भागवतांना सवाल, संघाच्या 'हिंदू राष्ट्रा'वरही सवाल

व्हिडीओ

Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wardha Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेने कार पेटली, पाच जणांचा मृत्यू
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेने कार पेटली, पाच जणांचा मृत्यू
Nagpur FDA Raid: नागपूरच्या अशोका रेस्टॉरंटमध्ये सूपमध्ये झुरळ सापडलं, एफडीएने धाड टाकली, फ्रिजमधील मांस पाहून लायसन्स सस्पेंड
नागपूरच्या अशोका रेस्टॉरंटमध्ये सूपमध्ये झुरळ सापडलं, एफडीएने धाड टाकली, फ्रिजमधील मांस पाहून लायसन्स सस्पेंड
Beed Crime: बीडमधील बनावट ट्रस्टचं 'पाकिस्तानी कनेक्शन' समोर आलं, पाच बँक अकाऊंट, कोट्यवधींचे व्यवहार अन्...; ATS च्या तपासात धक्कादायक माहिती
बीडमधील बनावट ट्रस्टचं 'पाकिस्तानी कनेक्शन' समोर आलं, पाच बँक अकाऊंट, कोट्यवधींचे व्यवहार अन्...; ATS च्या तपासात धक्कादायक माहिती
Sonam Wangchuk Jantar Mantar Protest: 'मी आजच आमरण उपोषण मागे घेतो पण....'; सोनम वांगचूक यांच्या केंद्र सरकारसमोर 'या' तीन अटी
'मी आजच आमरण उपोषण मागे घेतो पण....'; सोनम वांगचूक यांच्या केंद्र सरकारसमोर 'या' तीन अटी
FIFA World Cup 2026 : स्पेन पुन्हा ठरला जगज्जेता! तब्बल 16 वर्षांनी स्पेननं कोरलं विश्वचषकावर नाव; GOAT मेस्सीच्या अर्जेन्टिनाचं सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंगलं
तब्बल 16 वर्षांनी स्पेन पुन्हा ठरला जगज्जेता! फिफा विश्वचषकावर दुसऱ्यांदा कोरलं नाव; GOAT मेस्सीच्या अर्जेन्टिनाचं सलग दुसऱ्यांदा जेतेपदाचं स्वप्न भंगलं
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Maharashtra Live blog updates: मुंबईत जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस, तलावांमधील पाण्याचा साठा वाढला
Maharashtra Live blog updates: मुंबईत जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस, तलावांमधील पाण्याचा साठा वाढला
Girish Mahajan Fake AI Photo : मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
Embed widget