एक्स्प्लोर

एकही वीट न रचलेल्या नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावरुन वाद

पण अजून एकही वीट रचली न गेलेल्या विमानतळाच्या नामकरणावरुन चांगलाच वाद सुरू झाला आहे.

नवी मुंबई : अजून अस्तित्त्वातही न आलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला कोणाचं नाव द्यायचं यावरुन सध्या वाद सुरु आहेत. रायगड जिल्ह्यातील हद्दीत विमानतळ उभं राहत असल्याने आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, आगरी-कोळी समाजासाठी आयुष्य वेचलेले दि बा पाटील तर माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांची नावं देण्यात यावीत, अशी मागणी केली जात  आहे. सिडकोच्या माध्यमातून पनवेल येथे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी करण्यात येत आहे. 2300 हेक्टर जागेवर हे विमानतळ उभं राहत असून यासाठी 15 हजार कोटींवर खर्च अपेक्षित आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने विमानतळाच्या उभारणीसाठी युद्ध पातळीवर काम हाती घेतले आहे. पण अजून एकही वीट रचली न गेलेल्या विमानतळाच्या नामकरणावरुन चांगलाच वाद सुरू झाला आहे. सिडको, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान कार्यालयात विविध नावांची मागणी करणारे पत्र देण्यात आली आहेत. नवी मुंबई वसवण्यासाठी इथल्या आगरी-कोळी लोकांच्या जमिनी सिडकोने घेतल्या. मात्र त्यांना कोणताही मोबदला न दिल्याने दि बा पाटील यांनी रक्तरंजित लढा उभारुन प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून दिला. त्यामुळे त्यांचं नाव विमानतळाला द्यावं, अशी मागणी आगरी-कोळी युथ फाऊंडेशनने केली आहे . दुसरीकडे रायगडचे लोकसभा-राज्यसभा खासदार, आमदार आणि माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांचं नाव विमानतळाला देण्याची मागणीही करण्यात आली आहे. तर महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव विमानतळाला द्यावं, यासाठी शिवसेना आग्रही आहे. मात्र त्याआधी विमानतळबाधित प्रकल्पग्रस्तांना पहिला न्याय द्यावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Somnath Suryawanshi case: सरकारचे 10 लाख नाकारणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशीच्या आईला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर रडू कोसळलं, म्हणाल्या....
सरकारचे 10 लाख नाकारणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशीच्या आईला सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर रडू कोसळलं, म्हणाल्या....
'तुमचं कंटिन्यू डबऱ्यात घाला, माझा 72 दिवसांचा रिचार्ज अंबानीला दान करा' शिरोळ तालुक्यातून ग्राहकांचा जिओवर बहिष्कार; सिम कार्ड बंद करण्याची मोहीम!
'तुमचं कंटिन्यू डबऱ्यात घाला, माझा 72 दिवसांचा रिचार्ज अंबानीला दान करा' शिरोळ तालुक्यातून ग्राहकांचा जिओवर बहिष्कार; सिम कार्ड बंद करण्याची मोहीम!
PM Kisan : मेसेजची रिंगटोन वाजली की समजा पैसे आले, पीएम किसानचे 2000 रुपये 'या' दिवशी येणार, सरकारकडून मोठी अपडेट
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, पीएम किसानचे 2000 रुपये 'या' दिवशी येणार, सरकारकडून मोठी अपडेट
Beed Crime: वाल्मिक कराडचा चेला गोट्या गित्तेचं अघोरी कृत्य, 'राम नाम सत्य है' म्हणत रात्री दाराबाहेर ठेवायचा नैवेद्य अन्...
वाल्मिक कराडचा चेला गोट्या गित्तेचं अघोरी कृत्य, 'राम नाम सत्य है' म्हणत रात्री दाराबाहेर ठेवायचा नैवेद्य अन्...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

PM Narendra Modiपाकिस्तानच्या DGMO चा फोन, विनवणी केली, आता हल्ले बस करा,पाकिस्तान याचना करु लागला
PM Narendra Modi : कोणत्याही देशानं भारताला कारवाई करण्यापासून रोखलं नाही,मोदींची मोठी माहिती
Amit Shah Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव'ची इनसाईड स्टोरी, अमित शाहांनी सगळं सांगितलं
Manikrao Kokate Controversy | मंत्रीपदाची खुर्ची शाबूत, अजित पवारांनी सुनावलं
Pothole Protests | कल्याण पश्चिममध्ये KDMCC दुर्लक्ष, ठाकरे गटाचं अनोखं आंदोलन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Somnath Suryawanshi case: सरकारचे 10 लाख नाकारणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशीच्या आईला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर रडू कोसळलं, म्हणाल्या....
सरकारचे 10 लाख नाकारणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशीच्या आईला सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर रडू कोसळलं, म्हणाल्या....
'तुमचं कंटिन्यू डबऱ्यात घाला, माझा 72 दिवसांचा रिचार्ज अंबानीला दान करा' शिरोळ तालुक्यातून ग्राहकांचा जिओवर बहिष्कार; सिम कार्ड बंद करण्याची मोहीम!
'तुमचं कंटिन्यू डबऱ्यात घाला, माझा 72 दिवसांचा रिचार्ज अंबानीला दान करा' शिरोळ तालुक्यातून ग्राहकांचा जिओवर बहिष्कार; सिम कार्ड बंद करण्याची मोहीम!
PM Kisan : मेसेजची रिंगटोन वाजली की समजा पैसे आले, पीएम किसानचे 2000 रुपये 'या' दिवशी येणार, सरकारकडून मोठी अपडेट
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, पीएम किसानचे 2000 रुपये 'या' दिवशी येणार, सरकारकडून मोठी अपडेट
Beed Crime: वाल्मिक कराडचा चेला गोट्या गित्तेचं अघोरी कृत्य, 'राम नाम सत्य है' म्हणत रात्री दाराबाहेर ठेवायचा नैवेद्य अन्...
वाल्मिक कराडचा चेला गोट्या गित्तेचं अघोरी कृत्य, 'राम नाम सत्य है' म्हणत रात्री दाराबाहेर ठेवायचा नैवेद्य अन्...
Raju Shetti: नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला वनविभागानं घेऊन जावं, सात वर्षांपूर्वीचं राजू शेट्टीचे 'ते पत्र सोशल मीडियात व्हायरल; आता शेट्टींनीच केला वस्तुस्थितीचा खुलासा!
नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला वनविभागानं घेऊन जावं, सात वर्षांपूर्वीचं राजू शेट्टीचे 'ते पत्र सोशल मीडियात व्हायरल; आता शेट्टींनीच केला वस्तुस्थितीचा खुलासा!
Shashikant Shinde on Devendra Fadnavis: त्यामुळे राष्ट्रवादी मंत्र्यांचा राजीनामा नाही, सरकार चालवायचं असल्यानं मुख्यमंत्री हतबल; शशिकांत शिंदेंची बोचरी टीका
त्यामुळे राष्ट्रवादी मंत्र्यांचा राजीनामा नाही, सरकार चालवायचं असल्यानं मुख्यमंत्री हतबल; शशिकांत शिंदेंची बोचरी टीका
वाल्मिक कराडला दोषमुक्त का करत नाही? बीड विशेष मकोका न्यायालयाचं महत्त्वाचं निरीक्षण, 'संतोष देशमुख प्रकरणात...
वाल्मिक कराडला दोषमुक्त का करत नाही? बीड विशेष मकोका न्यायालयाचं महत्त्वाचं निरीक्षण, 'संतोष देशमुख प्रकरणात...
Video: मोदी संसदेत म्हणाले, कोणत्याच जागतिक नेत्याचा दबाव नव्हता, आता 15 तासही होत नाहीत तोपर्यंत ट्रम्प पुन्हा म्हणाले, मी सांगताच पाकिस्तानशी युद्ध संपवलं!
Video: मोदी संसदेत म्हणाले, कोणत्याच जागतिक नेत्याचा दबाव नव्हता, आता 15 तासही होत नाहीत तोपर्यंत ट्रम्प पुन्हा म्हणाले, मी सांगताच पाकिस्तानशी युद्ध संपवलं!
Embed widget