एक्स्प्लोर

PM Kisan : मेसेजची रिंगटोन वाजली की समजा पैसे आले, पीएम किसानचे 2000 रुपये 'या' दिवशी येणार, सरकारकडून मोठी अपडेट

PM Kisan : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात कधी पाठवणार हे सरकारनं जाहीर केलं आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना होती. अखेर पीएम किसानच्या 20 व्या हप्त्याचे 2000 रुपये 2 ऑगस्टला शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जाणार आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत एक्स खात्यावरुन याबाबत घोषणा करण्यात आली आहे. 

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत एक्स खात्यावरुन घोषणा 

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्स वरुन 20 व्या हप्त्याबाब घोषणा करण्यात आली आहे. आता अधिक वेळ वाट पाहावी लागणार नाही. पीएम किसानच्या 20 व्या हप्त्याची रक्कम 2 ऑगस्ट 2025 ला वाराणसी,उत्तर प्रदेश येथील कार्यक्रमातून शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवली जाईल. मेसेज टोन वाजताच तुमच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधीची रक्कम पोहोचली, असं समजा, अशी माहिती देण्यात आली आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजना कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय यांच्याकडून चालवली जाते. या योजनेची सुरुवात फेब्रुवारी 2019 ला करण्यात आली होती. तेव्हापासून पात्र शेतकऱ्यांना 19 हप्त्यांची रक्कम देण्यात आली आहे. 19 व्या हप्त्याची रक्कम बिहारमध्ये कार्यक्रम आयोजित करुन जारी करण्यात आली होती. त्यापूर्वी 18 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना महाराष्ट्रात वाशिम येथे कार्यक्रम आयोजित करुन देण्यात आली होती. 

शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार

देशभरातील सुमारे 10 कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीची रक्कम 19 व्या हप्त्याद्वारे देण्यात आली होती. पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना एका आर्थिक वर्षात 6000 रुपयांची मदत केली जाते. दोन हप्त्यांमध्ये साधारणपणे चार महिन्यांचा वेळ असतो. 19 व्या हप्त्याची रक्कम 24 फेब्रुवारी 2025 ला शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आली होती. आता 20 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात 2 ऑगस्टला पाठवली जाणार आहे. महाराष्ट्रातील   9325774 लाभार्थ्यांना 19 व्या हप्त्याची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. 

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधीची प्रतीक्षा 

केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु केली होती. त्या योजनेतून देखील शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये दिले जातात. या योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. 

दरम्यान, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अपडेटसाठी योजनेची वेबसाईट आणि  एक्स वरील योजनेचं अधिकृत खातं याशिवाय सोशल मीडियातून पसरवल्या जाणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन करण्यात आलं आहे. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

RBI : बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु,दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
Donald Trump : रशियासोबत डिझेल खरेदीची डील करताच ट्रम्प यांचा यूटर्न, भारत आणि चीनवरील 100 टक्के टॅरिफचं संकट टळलं, अमेरिकेचा मोठा निर्णय
भारत आणि चीनवरील 100 टक्के टॅरिफचं संकट टळलं, डोनाल्ड ट्रम्प यांचा यूटर्न, अमेरिकेचा मोठा निर्णय 
साखरेच्या वाढत्या किंमतीमुळं सरकारनं घेतला मोठा निर्णय, इथेनॉलमध्ये साखरेच्या वापरावर बंदी, आता इथेनॉलचे उत्पादन कसे होणार?
साखरेच्या वाढत्या किंमतीमुळं सरकारनं घेतला मोठा निर्णय, इथेनॉलमध्ये साखरेच्या वापरावर बंदी, आता इथेनॉलचे उत्पादन कसे होणार?
RBI चा मोठा निर्णय! बँकांसाठी नवीन नियम लागू, तुमच्या खात्यावर परिणाम होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
RBI चा मोठा निर्णय! बँकांसाठी नवीन नियम लागू, तुमच्या खात्यावर परिणाम होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Annapurti ATM : अन्नपूर्ति ATM मधून 24 तासात कधीही धान्य मिळणार, रेशनिंग वितरणात नाशिकमधून नवी सुरुवात, छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण
छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिकमध्ये अन्नपूर्ति ATM चं लोकार्पण, लाभार्थ्यांसाठी सुविधा 24 तास सुरु राहणार
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
Kushal Badrike On Atharv Sudame: अथर्व सुदामेकडून घरी बोलावून अपमान, कलाकारांना वाईट अनुभव; कुशल बद्रिकेचा संताप, VIDEO
अथर्व सुदामेकडून घरी बोलावून अपमान, कलाकारांना वाईट अनुभव; कुशल बद्रिकेचा संताप, VIDEO
Shivsena Eknath Shinde: एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
Pune Crime News: पुण्यात अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा; मनपा अभ्यासिका-ग्रंथालयाची तोडफोड आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
पुण्यात अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा; मनपा अभ्यासिका-ग्रंथालयाची तोडफोड आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
Chhatrapati Sambhajinagar : दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
Pune Teacher Election : पुणे शिक्षकमध्ये पहिल्या फेरीत 25 हजारापेक्षा जास्त मतं घेऊन विजयी होणार, माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी थेट आकडेवारी मांडत विजयाचं गणित सांगितलं
पुणे शिक्षकमध्ये भाजप-सेनेचे स्वतंत्र उमदेवार रिंगणात,  माजी आमदार दत्तात्रय सावंत प्रचंड आशावादी, पहिल्या फेरीत विजयाचा दावा 
Embed widget