एक्स्प्लोर

Sanjay Raut : संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी, धमकीचे दोन फोन

Death Threats to Sanjay Raut : शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत यांनी धमकीचे फोन (Death Threats Calls) आल्याची माहिती समोर येत आहे.

Death Threats to Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी धमकीचे फोन (Threats Calls) आल्याची माहिती समोर येत आहे. बुधवारी दिवसभरात राऊतांना धमकीचे दोन फोन (Death Threats Calls) आले. फोनवरून राऊतांना जीवे मारण्याची धमकी (Death Threats to Sanjay Raut Calls) दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिंदे गटाचे (Shinde Group) नेते शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या पत्रकार परिषदेनंतर राऊतांना धमकीचे फोन आल्याची प्राथमिक माहिती सुत्रांकडून समोर येत आहे. हे धमकीचे फोन कन्नड रक्षण वेदिका (Kannada Rakshana Vedika) संघटनेकडून आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

संजय राऊतांना फोनवरून धमकी

शिंदे गटाचे (Shinde Group) नेते शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून शंभूराज यांनी राऊतांवर हल्लाबोल केला. राऊतांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून टीका केली होती. हे सरकार नामर्द असल्याचं राऊतांनी म्हटलं होतं. यानंतर राऊतांनी आपलं तोंड आवरावं, असा इशारा शंभूराज देसाई यांनी दिला. संजय राऊतांना सीमावादावर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांनी वादग्रस्त वक्तव्य करणं थांबवावं, नाहीतर त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, असं शंभूराजे यांनी म्हटलं होतं. या पत्रकार परिषदेनंतर राऊतांना धमकीचे फोन आल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे.

हे सरकार नामर्दच : संजय राऊत

सध्या राज्यात महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न पेटलेला दिसत आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. संजय राऊतांनी शिंदे गट आणि भाजपवर हल्ला चढवत हे सरकार नामर्दच असल्याचं वक्तव्य केलं होतं. तसेच मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत, अशी मागणीही राऊतांनी केली होती. शिंदे-फडणवीस सरकार हे दिल्लीच्या दारातील पायपुसणं आहे, असं म्हणत राऊतांनी शिंदे गट आणि भाजपवल निशाणा साधला होता.

पाहा व्हिडीओ : महाराष्ट्र सरकार दिल्लीच्या दारातलं पायपुसणं : संजय राऊत

सामना अग्रलेखातून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा

शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर (Maharashtra Karnataka Border Dispute) आजच्या सामनातून शिंदे गट (Shinde Group) आणि भाजपवर (BJP) जोरदार टीका करण्यात आली आहे. कर्नाटकचे (Karnataka) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) महाराष्ट्राकडे पाहून पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे भुंकत आहेत आणि स्वत:ला 'भाऊ' म्हणवून घेणारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांच्या नांगी टाकतायत, असं सामनामध्ये लिहिलं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Akole Speech : तिजोरीची चावी माझ्या हातात.. अकोल्यात अजितदादांची टोलेबाजीABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Embed widget