एक्स्प्लोर
Advertisement
औषधांचं अतिसेवन, प्रियकरासोबत लॉजवर गेलेल्या तरुणीचा मृत्यू
भिवंडीतील ही घटना आहे. या तरुणीने घेतलेल्या औषधांना महाराष्ट्रात बंदी आहे. तरीही याची खुलेआम विक्री होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या औषधांच्या अति सेवनाने हायपरटेन्शनने सर्कुलेटरी फेल्युअर होऊन व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
ठाणे : हॉटेलमध्ये प्रियकरासोबत गेलेल्या तरुणीने नशेच्या औषधांचं अतिसेवन केल्याने तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भिवंडीतील ही घटना आहे. या तरुणीने घेतलेल्या औषधांना महाराष्ट्रात बंदी आहे. तरीही याची खुलेआम विक्री होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या औषधांच्या अतिसेवनाने हायपरटेन्शनने सर्कुलेटरी फेल्युअर होऊन व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
सेक्स पॉवरच्या इंजेक्शनचा ओव्हरडोस झाल्यामुळेच या तरुणीचा मृत्यू झाल्याचं सुरुवातीला सांगण्यात आलं होतं. मात्र तिचा मृत्यू नशेच्या औषधाचं अतिसेवन केल्याने झाल्याची प्राथमिक माहिती शांतीनगर पोलिसांनी दिली.
दरम्यान, या तरुणीच्या प्रियकराची चौकशी करुन त्याला सोडून देण्यात आलं. ही 29 वर्षीय तरुणी मुंब्रा येथील अमृतनगरमधल्या रशीद कंपाऊंडमध्ये राहते. 8 एप्रिल रोजी ती कल्याणमध्ये राहणाऱ्या तिच्या प्रियकरासोबत भिवंडीच्या कल्याण नाक्यावरील अशोका हॉटेलमध्ये आली होती.
हॉटेलमध्ये आल्यानंतर तरुणीने काही नशेची औषधं घेतली होती. त्यामुळे तिची प्रकृती बिघडली. हे पाहून तिच्या प्रियकराने हॉटेलमधून काढता पाय घेतला. काही वेळाने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडून पाहिलं तेव्हा ही तरुणी बेशुद्धावस्थेत आढळून आली. यानंतर तिला आयजीएमच्या उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. प्राथमिक उपचारानंतर ती शुद्धीत आली. मात्र नंतर तिचा मृत्यू झाला. त्यानंतर डॉक्टरांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.
या प्रकरणी शांतीनगर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तरुणीने उत्तेजक औषधांचं सेवन केल्याने तिचा मृत्यू झाला असल्याचं निदान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नोंदवलं. मात्र सुरक्षित रासायनिक चाचणीनंतरच या तरुणीने उत्तेजक औषधांचं सेवन केलं होतं, की नशेची औषधं घेतली होती, याबाबत स्पष्ट होईल, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
म्युच्युअल फंड्स
ठाणे
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement