(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Datta Dalvi : मोठी बातमी, दत्ता दळवी यांची गाडी फोडली, सुनील राऊत म्हणाले, 24 तासात जशास तसं उत्तर देऊ!
Datta Dalvi : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह टीका केल्यानंतर त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे.
मुंबई : मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी (Datta Dalvi car) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर, ठाकरे आणि शिंदे गटात वादाची ठिणगी पडली आहे. दत्ता दळवी यांना अटक केल्यानंतर, त्यांना न्यायालयाने कोठडी सुनावली. त्यानंतर आता दत्ता दळवी यांच्या गाडीची तोडफोड झाली आहे. चार तरुणांनी येऊन दत्ता दळवी यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. या तोडफोडीनंतर ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत (Sunil Raut) यांनी आक्रमक पवित्रा घेतला. तोडफोड करणाऱ्यांची नावं आम्हाला समजली आहेत, येत्या 24 तासात आम्हीही जशास तसं उत्तर देऊ, असं सुनील राऊत म्हणाले.
ठाकरे गटाचे उपनेते दत्ता दळवींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीची तोडफोड करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आता ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत म्हणाले की, "हे काम शिंदे गटाचे आहे. त्यांच्यात समोर येण्याची धमक नसल्याने मागून असा भ्याड हल्ला केला आहे. या लोकांची ओळख पटली असून त्यांच्यावर जर पोलिसांनी कारवाई केली नाहीत तर येत्या 24 तासात त्यांना उत्तर देऊ. गाडी फोडणाऱ्यांच्या घराच्या काचाही शिल्लक राहणार नाहीत."
दत्ता दळवी यांचं वक्तव्य (Datta Dalvi Statement On Eknath Shinde0
भांडुपमध्ये रविवारी 26 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा कोकण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात माजी महापौर आणि उपनेते दत्ता दळवी यांचं भाषण झालं. यावेळी दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं. स्वत:ला हिंदूहृदयसम्राट म्हणून घेतात, अरे भोसxx तुला हिंदूहृदयसम्राटचा अर्थ माहिती आहे का? आज आनंद दिघे असते तर एकनाथ शिंदे यांना चाबकाने फोडून काढलं असतं, असं दत्ता दळवी म्हणाले होते.
दत्ता दळवी यांना पोलीस कोठडी
दत्ता दळवी यांच्या वक्तव्यानंतर त्यांना बुधवारी 29 नोव्हेंबरला सकाळी आठ वाजता भांडुप पोलिसांनी विक्रोळी येथील राहत्या घरातून अटक केली.भूषण पलांडे यांच्या तक्रारीनंतर भांडुप पोलिसांनी माजी महापौर दत्ता दळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यांना कोर्टात हजर केलं असता कोर्टाने दत्ता दळवी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनवली.
ही बातमी वाचा: