एक्स्प्लोर

Dasara Melava 2022 : बीकेसीच्या दुसऱ्या मैदानासाठी केलेला ठाकरेंचा अर्ज फेटाळला; शिंदे गटाला परवानगी

दसरा मेळाव्यासाठी मैदान मिळवण्याकरिता शिंदे (EKnath Shinde) आणि ठाकरे गटात (Uddhav Thackeray) रस्सीखेच सुरु असताना शिंदे गटाला बीकेसी मैदानावर सभा घेण्याची परवानगी एमएमआरडीएनं दिलीय.

Dasara Melava 2022 : दसरा मेळाव्यासाठी मैदान मिळवण्याकरिता शिंदे (EKnath Shinde) आणि ठाकरे गटात (Uddhav Thackeray) रस्सीखेच सुरु असताना शिंदे गटाला बीकेसी मैदानावर सभा घेण्याची परवानगी एमएमआरडीएनं दिलीय. तर बीकेसीतील दुसऱ्या मैदानात सभेच्या परवानगीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं केलेला अर्ज एमएमआरडीएनं फेटाळला आहे. दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाला वांद्रे-कुर्ला संकुलातील (BKC Ground) बीकेसी मैदानावर परवानगी देण्यात आली आहे.  बीकेसीच्या दुसऱ्या मैदानासाठी उद्धव ठाकरेंच्या सभेसाठीचा करण्यात आलेला अर्ज फेटाळण्यात आल्याची माहिती आहे.  शिंदेंचा मेळावा बीकेसी मैदानात होणार असल्याचं आता स्पष्ट झालंय तर दुसरीकडे मात्र उद्धव ठाकरेंचा मेळावा कुठे होणार? असा सवाल उपस्थित होत आहे. 

शिंदे गटाला वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानात दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळाली आहे. दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गटाचा अर्ज एमएमआरडीने स्वीकारल्याची माहिती मिळाली आहे.  दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाला दसरा मेळावा घेण्यासाठी ज्या मैदानाची परवानगी मागितली होती तो अर्ज फेटाळण्यात आली आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील दोन मैदाने कार्यक्रमांसाठी भाड्याने देण्यात येतात. यापैकी एका मैदानासाठी शिंदे गटाने, तर दुसऱ्या मैदानासाठी शिवसेनेने अर्ज केला होता. शिंदे गटाने ज्या मैदानासाठी अर्ज केला होता ते आरक्षित नव्हते, त्यामुळे त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला, तर शिवसेनेने अर्ज केलेले मैदान एका खासगी कंपनीने आरक्षित केले आहे, त्यामुळे शिवसेनेचा अर्ज फेटाळण्यात आला.

खासदार अरविंद सावंत म्हणाले की, शिवसेनेच्या वतीनं आम्ही अर्ज केला होता. MMRDA नं त्यांना परवानगी दिली आहे. पहिले आले म्हणून त्यांना परवानगी दिली. याच नियमाने शिवाजी पार्कवर आम्हाला परवानगी मिळायला हवी. आम्ही शिवाजी पार्कवरील सभेसाठी आधी परवानगी मागितली आहे. शिवसेनेची ही परंपरा आहे, ही परंपरा कधी थांबली नाही, असं सावंत म्हणाले.  

शिवसेना आणि शिंदे गटात चढाओढ?
शिवाजी पार्कवर परवानगी मिळाली नाही तर दुसरा कोणता पर्याय असू शकतो, याची चाचपणी शिवसेना आणि शिंदे गट यांच्याकडून सुरु होती. शिवाजी पार्क मैदानावरील मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेने परवानगी न दिल्यास शिवसेनेने पर्यायांचा शोध सुरु केला होता. शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी एमएमआरडीएला पत्र लिहित बीकेसीतील मैदानाची मागणी केली होती. तर शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंनी वांद्रा कुर्ला संकुलाच्या मैदानासाठी अर्ज केला होता.  यात चढाओढीत अखेर शिंदे गटानं बाजी मारली आहे. 

आता शिवाजी पार्कवर सभेसाठी नेमकी कुणाला परवानगी मिळते याकडे लक्ष लागून आहे. 

संबंधित बातम्या

ShivSena Dasara Melava : दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेचा 'प्लान B'? शिवतीर्थ न मिळाल्यास 'या' जागेचा पर्याय

Eknath Shinde : तुम्ही तयारीला लागा, यंदाचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Tukaram Mundhe FDA : तुमच्याकडे तलवार आहे, पण त्याने डास मारता, अधिकारांचं प्रदर्शन करता; हॉटेलवरील धाडीवरून कोर्टाने FDAला फटकारलं
तुमच्याकडे तलवार आहे, पण त्याने डास मारता, अधिकारांचं प्रदर्शन करता; हॉटेलवरील धाडीवरून कोर्टाने FDAला फटकारलं
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget