एक्स्प्लोर

Last Rites Of Cyrus Mistry : टाटा उद्योग समूहाचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

Cyrus Mistry Last Rites : टाटा उद्योग समूहाचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Cyrus Mistry Death in Car Accident : टाटा उद्योग (Tata Sons) समूहाचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचं पालघरमध्ये (Palghar) अपघाती निधन झालं आहे. त्यांच्या पार्थिवावर आज (मंगळवारी) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. वरळी येथील स्मशानभूमीत सकाळी 11 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. 

दरम्यान मिस्त्री यांच्या अपघाताची चौकशी होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पोलीस महासंचालकांना याबाबतचे आदेश दिले आहेत. अहमदाबादहून मुंबईकडे येत असताना पालघरच्या चारोटीजवळ मिस्त्री यांच्या मर्सिडीज कारला अपघात झाला. दुभाजकाला धडक दिल्यानं हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान अतिवेगानं गाडी चालवल्यानं हा अपघात झाल्याचा दावा प्रत्यक्षदर्शीनं केला आहे. दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करताना हा अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनं दिली आहे. 

मुंबईतील जे. जे. रुग्णालयात सायरस मिस्त्रींच्या पार्थिवाचं पोस्टमॉर्टम 

उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच निधनानंतर त्यांचे पार्थिव मुंबईतील जे. जे रूग्णालयात आणण्यात आलं होतं. पालघरमधील चारोटी येथे झालेल्या या अपघातात गाडी चालक आणि सायरस मिस्त्री या दोघांचं पार्थिव शनिवारी रात्री मुंबईत दाखल झालं होतं. त्यानंतर त्यांच्या पार्थिवाचं पोस्टमार्टम रात्री अडीच वाजता पार पडलं. त्यानंतर त्यांचं पार्थिव जे. जे रुग्णालयात ठेवण्यात आलं. सायरस मिस्त्री यांचे भाऊ आणि मुलं काल रात्री मुंबईत आल्यानंतर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 

नेमका कसा झाला अपघात? 

54 वर्षी सायरस मिस्त्री यांचा अपघात झाला असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. परवा (रविवारी) दुपारी सव्वा तीनच्या सुमारास अहमदाबादवरुन ते मुंबईला येत होते. पालघरमधील चारोटी येथे मिस्त्री यांच्या मर्सिडिस कारचा अपघात झाला. डिव्हायरला गाडी धडकल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती पालघर पोलीस अधिक्षकांनी दिली आहे. या संदर्भात अधिकचा तपास पोलीस करत असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. अपघात झाल्यानंतर तात्काळ दोघांचा मृत्यू झाला. तर इतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सायरस मिस्त्रींच्या अपघाती निधनाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. 

54 वर्षीय सायरस मिस्त्री यांचा रविवारी महाराष्ट्रातील पालघर येथे झालेल्या अपघातात मृत्यू झाला. मिस्त्री हे अहमदाबादहून मुंबईला मर्सिडीज कारमधून परतत असताना दुपारी साडेतीनच्या सुमारास मुंबईला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यात त्यांची कार डिव्हायडरला आदळली, तेव्हा हा अपघात झाला. कारमध्ये 4 लोक होते, ज्यामध्ये 2 जणांचा जागीच मृत्यू झाला. महिला कार चालवत होती, सध्या ती जखमी असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिस्त्री यांच्याशिवाय जहांगीर दिनशा पंडोल नावाच्या व्यक्तीचाही अपघातात मृत्यू झाला आहे. जखमींमध्ये अनायता पांडोळे (महिला चालक) आणि दारियस पांडोळे यांचा समावेश आहे. त्यांच्यावर गुजरातमधील वापी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

अपघात झाला तेव्हा सिकंदर गाडीतच होता, आता तो नेमका कुठे? वस्ताद अस्लम काझी यांनी दिली महत्वाची माहिती 
अपघात झाला तेव्हा सिकंदर गाडीतच होता, आता तो नेमका कुठे? वस्ताद अस्लम काझी यांनी दिली महत्वाची माहिती 
Jitendra Awhad and Prajkta Mali: 'सावित्रीबाई फुले...' मालिका बंद पडताना नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, प्राजक्ता माळींनी बोलायला हवं होतं, पण... जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल
'सावित्रीबाई फुले...' मालिका बंद पडताना नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, प्राजक्ता माळींनी बोलायला हवं होतं, पण... जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल
NCP Sharad Pawar Camp Vardhapan Din 2026: 'आमची सत्ता आल्यावर हिशेब चुकता केल्याशिवाय शांत बसणार नाही'; शरद पवारांच्या युवा शिलेदारांची घणाघाती भाषणं, राष्ट्रवादीचा वर्धापन दिन सोहळा गाजवला
'आमची सत्ता आल्यावर हिशेब चुकता केल्याशिवाय शांत बसणार नाही'; शरद पवारांच्या युवा शिलेदारांची घणाघाती भाषणं, राष्ट्रवादीचा वर्धापन दिन सोहळा गाजवला
London Marathi family Death : लंडनमध्ये भारतीय कुटुंबाचा दुर्दैवी अंत; 36व्या मजल्यावरून दाम्पत्यासह मुलानं झोकून दिलं, तपासात धक्कादायक माहिती समोर
लंडनमध्ये भारतीय कुटुंबाचा दुर्दैवी अंत; 36व्या मजल्यावरून दाम्पत्यासह मुलानं झोकून दिलं, तपासात धक्कादायक माहिती समोर

व्हिडीओ

Cab driver attacks senior citizen in Thane : वृद्धाला मारहाण साफ करा ही 'घाण' | Special Report
Vidhan Parishad Drama : विधान परिषदेच्या निवडणुकीचा गोंधळ सुरुच | Special Report
Is Mamata Banerjee merging TMC with Congress : ‘तृणमूल’ होणार‘काँग्रेस’? | Special Report
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli News : सांगली महापालिकेत मोठी कारवाई! 37 कामचुकार कर्मचारी तडकाफडकी निलंबित, आयुक्तांचा दणका
सांगली महापालिकेत मोठी कारवाई! 37 कामचुकार कर्मचारी तडकाफडकी निलंबित, आयुक्तांचा दणका
पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना, पाकिस्तानच्या लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, वैमानिकासह 20 सैनिकांचा मृत्यू
पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना, पाकिस्तानच्या लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, वैमानिकासह 20 सैनिकांचा मृत्यू
West Bengal : TMC च्या फायरब्रँड नेत्या सयानी घोष यांनीही ममतांची साथ सोडली, शत्रुघ्न सिन्हा, युसूफ पठाण यांच्यासह बंडखोर 20 खासदारांची नावे समोर
TMC च्या फायरब्रँड नेत्या सयानी घोष यांनीही ममतांची साथ सोडली, शत्रुघ्न सिन्हा, युसूफ पठाण यांच्यासह बंडखोर 20 खासदारांची नावे समोर
ममता बॅनर्जींच्या तृणमुलचे सत्ता जाताच दोन तुकडे; आता अखिलेश यादवांनी केलेल्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
ममता बॅनर्जींच्या तृणमुलचे सत्ता जाताच दोन तुकडे; आता अखिलेश यादवांनी केलेल्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
पहाटे दोन वाजता सर्वेक्षण का करताय? राजू शेट्टींचा प्रांताधिकाऱ्यांना सवाल; शक्तीपीठ महामार्गाविरोधात विटा तहसिल कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा
पहाटे दोन वाजता सर्वेक्षण का करताय? राजू शेट्टींचा प्रांताधिकाऱ्यांना सवाल; शक्तीपीठ महामार्गाविरोधात विटा तहसिल कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा
Kolhapur Crime FDA Raid: कोल्हापूरमध्ये FDA ची धाड, घाणेरड्या पनीरने भरलेल्या पिशव्यांचा साठा सापडला
कोल्हापूरमध्ये FDA ची धाड, घाणेरड्या पनीरने भरलेल्या पिशव्यांचा साठा सापडला
नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला, नेहरू कुटुंबाचा त्याग कुणीच विसरू शकत नाही, नेहरू आणि मोदी स्पर्धा लावली जातेय ती तुलना होऊ शकते का? शरद पवारांनी फटकारलं
नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला, नेहरू कुटुंबाचा त्याग कुणीच विसरू शकत नाही, नेहरू आणि मोदी स्पर्धा लावली जातेय ती तुलना होऊ शकते का? शरद पवारांनी फटकारलं
Satej Patil: 'तर दुसऱ्या भावाला खतच मिळत नाही, खत निवडण्याचा सुद्धा पर्याय नाही; अॅप सुद्धा असं तयार केलंय की..' सतेज पाटलांकडून ऑनलाईन खत खरेदी ॲपची पोलखोल
Video: 'तर दुसऱ्या भावाला खतच मिळत नाही, खत निवडण्याचा सुद्धा पर्याय नाही; अॅप सुद्धा असं तयार केलंय की..' सतेज पाटलांकडून ऑनलाईन खत खरेदी ॲपची पोलखोल
Embed widget